Last Update: 

मुख्य पान प्राणीजगत नितीकथा आरोग्य आरसा
 

गुणकारी हळद
मालविका करकरे
Saturday, August 28, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: aahar,   halad

दररोज स्वयंपाकात चवीसाठी वापरली जाणारी हळद आपल्या शरीरासाठी अत्यंत उपययुक्त आहे. अनेक आजारांसाठी प्रतिबंधात्मक म्हणून हळदीचा वापर होतो. हृदयविकारावरदेखील हळद उपयुक्त आहे. छोटीशी जखम झाली तर रक्तस्त्राव थांबविण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. आयुर्वेदातही हळदीच्या या औषधी गुणधर्मांचा वापर केला आहे. 

स्व यंपाकाला हळदीशिवाय रंग, स्वाद येणे अशक्‍य आहे. हळद वापरली नाही तर जेवणाला चव येत नाही. हरिद्रा, हल्दी, turmeric, Curcuma domestica, मेहघ्नी अशा अनेक नावांनी हळद प्रसिद्ध आहे. देवपूजा करताना ही पवित्र हळद आपण देवाला वाहतो. तर स्त्रीच्या सौभाग्याचे लेणे हळद समजले जाते. आयुर्वेदात प्राचीन काळापासून हळदीच्या औषधी गुणधर्मांचा वापर होतो.

हळदीची उत्पत्ती
भारतामध्ये हळदीची लागवड पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात केली जाते. विसनगरची हळद हळद प्रसिद्ध समजली जात असे. हळदीचे रोप सुगंधी असते. हळदीच्या कंदाला जमिनीत गाठी फुटतात. या गाठी पिवळ्या व चमकदार रंगाच्या असून हळदीला पाण्याची आवश्‍यकता असते. ह्या गाठी म्हणजेच "हळद' होय. हळदीचे दोन प्रकार आढळतात. एक लोखंडी हळद; जी रंग बनविण्यासाठी वापरली जाते. दुसरी म्हणजे मऊ सुगंधी हळद; जी मसाल्यात वापरली जाते. अजून एक हळदीचा प्रकार म्हणजे आंबे हळद. या हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. हळदीच्या गाठी जमिनीतून काढून स्वच्छ करून त्यावर प्रक्रीया केली जाते. त्यानंतर ती सुकवून विकण्यास तयार केली जाते. हळद व चुन्याच्या मिश्रणातून कुंकू बनविले जाते.
आपल्याकडे हळदीला दिलेल्या धार्मिक महत्त्वामुळे हळदीचा वापर हा बऱ्याच ठिकाणी होतो. लग्न समारंभात हळद वापरली जाते. हळदीच्या वर्ण सुधारण्याच्या गुणधर्मांना त्यामुळे आपोआप महत्त्व प्राप्त होते.

पौष्टिक हळद
हळदीमध्ये लोह ( आयर्न), मॅंगेनीज, जीवनसत्त्व "ब6'(b6), फायबर (तंतुयुक्त पदार्थ), जीवनसत्त्व "के' आढळते. तसेच हळदीत काही प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, क्रोमियम आढळते. हळदीचे महत्त्व हे करक्‍युमिन नावाच्या फोटोकेमिकलमुळे जास्त वाढलेले आहे. याचा उपयोग अनेक आजारांसाठी प्रतिबंधात्मक म्हणून होतो.

गुणकारी हळद
हळद अनेक आजारांवर उपयुक्त आहे. हळदीला स्वस्त, गुणकारी व घरगुती औषध मानले गेले आहे. गाठविरोधी (antitumor), अर्थायटिससाठी प्रतिबंध (antioxident antiarthric), हृदयरोग प्रतिबंध (anti-ischemic), सूज प्रतिबंध (inflammatory) अशा विविध आजारांवर हळद गुणकारी आहे.

करक्‍यूमिन
-
हे पॉलिफेनॉल्स असून ह्यामुळे हळदीला पिवळा रंग येतो.
- करक्‍यूमिनचा विसराळूपणा (अल्झायमर्स) सारख्या आजारात उपयोग होतो.
- हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगांवर ती उपयुक्त आहे तसेच कर्करोगाला प्रतिबंधक असल्यासंबंधी संशोधन चालू आहे. जसे, कोलॉन (colon) कर्करोग, मल्टीपल मायलोमा इत्यादी.
- करक्‍यूमिनमुळे मेंदूचे कार्यही सुरळीत राहण्यास मदत होते. ह्यासाठी योग्य प्रमाणात हळद वापरली जावी.
- हळदीला liver detoxifier म्हटले जाते. ज्याचा उपयोग अल्कोहोल, काही टॉक्‍सिन्स, केमिकल्स यांची तीव्रता कमी करण्यास मदत करतात.
- हळद स्निग्ध पदार्थांच्या चयापचयात मदत करते. त्यामुळे वजन योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.
- हळद ही जखम भरून येण्यास मदत करते. एका प्रकारचे "हिलींग'चे काम हळद करते. छोटी जखम झाल्यास हळदीचा उपयोग करून रक्तस्त्राव सहज थांबविता येतो.
- हळदीच्या योग्य सेवनाने पोटाच्या तक्रारी दूर होऊ शकतात व जुलाब होत असतील तर साल्मोनेला, प्रोटोझोआ यांसारख्या बॅक्‍टेरियांना हळद प्रतिबंध करते.
- हळद ही निरूपयोगी कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, यासंबंधी संशोधन सुरू आहे.
- साधारणत: रोजच्या आहारामध्ये दोन ते अडीच ग्रॅम हळद घेतली जावी.
- हळदीमध्ये वातशामक आणि कफशामक गुणधर्म आढळतात. त्यामुळे खोकला, घसादुखी झाली तर की हळद घालून गरम दूध प्यायला दिले जावे.

हळद सर्वांसाठी
हळदीला उपयुक्त अशी औषधी वनस्पती म्हणता येईल. अगदी लहान मुलांपासून, तरूणांच्या तसेच गर्भवती स्त्रियांच्या आहारात हळद वापरली जावी.
लहान बाळाला आंघोळ घालताना मसुराच्या अथवा डाळीच्या पिठात हळद व दूध घालून लावले जावे. यामुळे बाळाची कांती चांगली होते.
हळद प्रतिकारशक्ती वाढविणारी, रक्त शुद्ध करणारी असल्याने हृदयरोग, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ती जरूर वापरावी. एक ग्रॅम हळद, एक ग्रॅम आवळाचूर्ण व एक चमचा मध यांचे मिश्रण जरूर सेवन करावे.

स्तनपान करणाऱ्या व गर्भवती महिलांनी हळदीचा आहारात योग्य त्या प्रमाणात समावेश करावा.

हळदीचे चविष्ट पाचक लोणचे

साहित्य : पावशेर ओली हळद (धुऊन, पुसून, किसून घ्यावी)
दोन इंच आले ( धुऊन, किसून)
आठ लिंबे
मीठ, साखर चवीनुसार
फोडणी : तेल, हिंग, मोहरी, लिंबू लोणचे मसाला - 1 चमचा

कृती : प्रथम एका बरणीत किसलेली हळद व आले एकत्र करावे.
त्यामध्ये लिंबू पिळून घालावे. मीठ, साखर, लोणचे मसाला घालावा.
एकीकडे कढल्यात तेल तापवून हिंग, मोहरी, आरी फोडणी करावी, फोडणी गार होऊ द्यावी.
तयार फोडणी लोणच्यावर घालावी. लोणचे तीन-चार दिवस मुरू द्यावे.
तिखटपणा आवश्‍यक वाटल्यास तिखट अर्धा चमचा घालावे.

मालविका करकरे


 
 
लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: