Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 

वेलनेस प्रश्‍नोत्तरे
-
Saturday, July 23, 2011 AT 12:00 AM (IST)
Hormonal Balance किंवा थायरॉईड ग्रंथीचे आजार आहेत, मी काय करावे?
रक्तातील थायरॉईड संप्रेरकांची पातळी मोजून निदान करता येते, त्यासाठी आपल्याला निष्णात डॉक्‍टरांकडे जाणे फार महत्त्वाचे आहे. इंटरनेटवरील माहितीच्या आधारे, जाहिराती पाहून, स्वतःच कोणतेही निष्कर्ष काढून मनाप्रमाणे औषधे घेऊ नका. वजनातील चढ, उतारांवर लक्ष ठेवा. सर्व लक्षणांची नोंद लिहून ठेवा व ती तज्ज्ञ डॉक्‍टरांना वाचून दाखवा. रेडिओ ऍक्‍टिव्ह आयोडीनच्या तपासणीने निदान निश्‍चित केले जाते. काही वेळा काही औषधांचा वापर केला जातो; परंतु आयोडीनच्या वापराने आजार पूर्ण बरा करता येतो. शस्त्रक्रियेची गरज क्वचितच पडते. थायरॉईड संप्रेरकाची गोळी देणे हा प्रभावी उपाय आहे. उपचार करताना अधूनमधून टी. एस. एच. (TSH)ची पातळी मोजून औषधाचा डोस कमी जास्त करावा लागतो. आयोडाईझड (Iodaized) घेण्याने हा धोका टळतो.

- डॉ. नितिन उनकुले.
---------------------------------------

कॅल्शियमसाठी आहारात नाचणी व सोयाबीन घेण्यास सांगितले जाते. गव्हाबरोबर नाचणी व सोयाबीन दळून ते पीठ पोळ्यांकरता वापरले, तर चालते का? त्याचे प्रमाण काय असावे? सोयाबीन पुरुषांसाठी चांगले असले तरी स्त्रियांसाठी मात्र चांगले नाहीत असे ऐकिवात आहे, त्यात किती तथ्य आहे? सोयाबीन estrogen वर विपरीत परिणाम करते का?
- अलका वाकणकर.

कॅल्शिअमसाठी सोयाबीन व नाचणी आहारात सुचवले जातात हे बरोबरच आहे. कारण 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 240 ग्रॅम कॅल्शिअम आहे, तर 100 ग्रॅम नाचणीत 344 ग्रॅम कॅल्शिअम असते. 100 ग्रॅम गव्हाच्या पिठात (साधारण तीन पोळ्या) फक्त 48 ग्रॅम कॅल्शिअम असते. तेव्हा ही तीन पीठे एकत्र करून कॅल्शिअमचे प्रमाण वाढवण्याची सूचना शास्त्रीयदृष्टीने अगदी स्वागतार्ह आहे.

खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
 • नाचणी घातल्याने पोळीचा रंग बदलतो. 
 • नाचणी जास्त झाल्यास पोळी नीट लाटली जात नाही व कडक होते. 
 • काही लोकांना, विशेषतः वृद्‌धांना सोयाबीनने पोटात गॅस होतात किंवा अपचन जाणवते. 
 • पीठ दळताना सोयाबीन थोडे भाजून घ्यावेत; त्यामुळे ते पचायला हलके होतात. 
 • साधारणतः एक किलो गव्हाच्या पिठात 200 ग्रॅम सोयाबीन घालावे व 100 ग्रॅम नाचणी घालावी. पचनासंबंधी तक्‍रार वाटल्यास सोयाबीनचे प्रमाण कमी करावे. 
 • नाचणीला पर्याय म्हणून तीळ वापरता येतील. 100 ग्रॅम तीळामध्ये तब्बल 1450 ग्रॅम कॅल्शिअम आहे. त्यामुळे किलोमागे 50 ग्रॅम तीळ वापरले, तरी प्रत्येक पोळीतील कॅल्शिअमचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त होईल. (एका पोळीत साधारणतः 16 ते 20 ग्रॅम कॅल्शिअम असते.) 
सोयाबीनच्या हार्मोन्सवर होणाऱ्या परिणामासंदर्भात बरीच मतमतांतरे आहेत.
काही प्रमुख निष्कर्ष-

 • सोयाबीनने आशियायी स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. 
 • ज्यांना स्तनाचा कर्करोग झाला आहे किंवा होता अशा स्त्रियांनी सोयाचे पदार्थ खाऊ नयेत. 
 • सोयाबीनने पुरुषांना प्रोस्टेटच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. 
 • सोयाबीनमुळे पुरुषांच्या टेस्टेटेरॉन या हार्मोनवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. 
 • काही मेनोपॉजच्या काळातील स्त्रियांमध्ये, मेनोपॉजची त्रासदायक लक्षणे सोयाबीनमुळे कमी होतात. 
 • मेनोपॉज झालेल्या स्त्रिया जर रोज सोयाबीन खात असतील, तर त्यांचे कोलेस्टेरॉल आटोक्‍यात राहण्यास मदत होते. 
 • सोयाबीनचे वैद्‌यकीय फायदे मिळण्यासाठी रोजच्या आहारात किमान अर्धा कप सोयाबीन, पाव कप सोयापीठ, 250 मिली. सोयादूध किंवा 100 ग्रॅम टोफू यांपैकी कशाचा तरी समावेश करावा लागेल. 

तांबे शरीरासाठी कितपत गरजेचे आहे? ते कोणत्या पदार्थांतून मिळते? 

रक्तातील हिमोग्लोबिन हा महत्त्वाचा घटक तयार होण्याकरिता, शरीरात तांब्याची आवश्‍यकता असते. शरीरातील नसांभोवतीचे आवरण बनण्यासाठीदेखील (nerves sheath) आपल्याला तांब्याची आवश्‍यकता असते. चरबीच्या चयापचयामध्ये (lipid metabolism) तांबे या क्षाराचा सहभाग असतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीदेखील तांब्याचा खूप उपयोग होतो. ज्या पांढऱ्यापेशी (white blood cells) संसर्गाविरोधात लढतात, त्यांची संख्या या क्षारामुळे वाढते.

आपली रोजची तांब्याची गरज निव्वळ 2 मि.ग्रॅम इतकी आहे. आहारातील कॅल्शिअममुळे तांब्याचे शोषण चांगले होते; परंतु पांढऱ्या साखरेच्या अतिरेकी सेवनाने हे शोषण घटते हे ही लक्षात घ्या.

बाजरी, सत्त्व न काढलेले गव्हाचे पीठ, कडधान्ये, काजू, तीळ, कमळदेठ, पडवळ, शेंगभाज्या, शिंपला, खेकडा, कवचाची मासळी (shellfish), व तांब्याच्या भांड्यांचा वापर या सगळ्यातून आपल्याला तांबे हा क्षार मिळतो. काही प्रमाणात चॉकलेटमध्येही तांबे आहे.

- डॉ. सीमा सोनीस


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2011 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: