Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

एमपीएससी मुख्य परीक्षा स्टॅटेजी - 2017
महेश शिंदे
Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

 एमपीएससी मुख्य परीक्षा स्टॅटेजी - 2017

1. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मागील चार वर्षीच्या प्रश्नपत्रिका वाचून काढाव्यात. या प्रश्‍नपत्रिकांतील सर्वसाधारण दहा टक्के प्रश्‍न हे रिपीट होतात. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 15 प्रश्न, याचा अर्थ एकूण 60 प्रश्न. जर तुमचे 60 प्रश्न बरोबर येत असतील तर निगेटीव्हचे 20 मार्क वाचतील, म्हणजे नेट बेनेफिट 80 मार्क्‍स. म्हणजे एकही पुस्तक न वाचता तुमच्या हातात 80 मार्क्‍स आहेत. (यासाठी ज्ञानदीप विश्‍लेषण भाग 1,2,3 वाचावे)

2. राज्यसेवा मुख्यच्या अभ्यासक्रमाची दोन भागात विभागणी करावी.(MPSC MAINSच्या syllabus ला दोन पार्टमध्ये divide करणे)
A. CONVENTIONAL GS
B. NON CONVENTIONAL GS
3.CONVENTIONAL GS म्हणजे जो भाग आपण पूर्वच्या वेळेस अभ्यासला असल्यामुळे हा भाग थोडा मागे ठेवावा.
4. मुख्यचा अभ्यास करताना NON CONVENTIONAL GS- या भागावर अधिक लक्ष द्यावे. यामध्ये
समाज सुधारक, कृषी, कायदे, तंत्रज्ञान, कृषी व अर्थशास्त्र HRD & HR POLITY PART -2 व्यापाराच्या सिद्धांत व इतर हा भाग प्राधान्याने वाचावा.

5. राज्यसेवा मुख्यही MCQ BASED EXAMINATION आहे. यामुळे अभ्यास करताना सत्तर टक्के वेळ हा वाचनाला द्यावा आणि पंचवीस टक्के वेळ MCQ सोडवण्यासाठी द्यावा. जेवढे जास्त MCQ सोडवाल तेवढे जास्त यश मिळेल.

5. वर्तमानपत्रांबरोबर मॅगझीन वाचण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा. चालू-घडामोडींवरील प्रश्न
विचारले जात आहेत. यामुळे सकाळ इयर बुक नक्की वाचावे.

6. आपण दुर्लक्षित केला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी आणि इंग्रजी.
दोन्ही विषयांच्या व्याकरणाचे क्‍लास लावा. या विषयांचा चांगला सराव करावा.
MCQ ENGLISH ध्ये तुम्हाला 75 ते 80 गुण पडायलाच हवेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिखाणाचा सराव करावा.

7. जास्तीत जास्त MCQ सोडावा
8. सूक्ष्म नोट्‌स काढण्याचा प्रयत्न करा.
9. पुस्तकांची यादी

1 इतिहास
- ग्रोव्हर आणि बेल्हेकर
- महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ
- 6 वी आणि 11 वी चा इतिहास

2. भूगोल
- प्राकृतिक भूगोल ( सुमंत सोळंके IFS)
- 6 वी ते 12 वी state बोर्ड बुक्‍स
- महाराष्ट्राचा भूगोल- खतीब
- G. C. LEONG
- XI च्या 2 NCERT

3. कृषी
कृषी आणि भूगोल- महेश गारगोटे सर
4. राज्य व्यवस्था
- laxmikant polity ध्ये उपलब्ध आहे के - सागर प्रकाशन
- पंचायत राज - किशोर लवटे
- युनिक ऍकॅडमी खंड-2

5. HRD आणि HR
ज्ञानदीप प्रकाशन- लेखक-आनंद बोबडे
-Synergy प्रकाशन- गणेश हाके
यासोबतच इंटरनेटचा वापर जास्तीत जास्त करणे.

6. अर्थव्यवस्था
- रंजन कोळंबे सर
किंवा
किरण देसले सर यांचे भाग- 1 आणि भाग- 2
- निवडक दत्त सुंदराम
- भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी

6. तंत्रज्ञान
- जैवतंत्रज्ञान- सचिन भस्के
-अन्न आणि पोषण आहार- सचिन भस्के
-इतर तंत्रज्ञान भाग - रंजन कोळंबे सर
- सगळ्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमाचा आढावा येण्यासाठी के- सागर प्रकाशन यांचे प्रमोद जोगळेकर सर लिखित पुस्तक वाचावे.
- जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करावा.

7. सरावासाठी प्रश्नसंच
- पॉलिटी प्रश्नसंच- संदीप भस्के
- इतिहास प्रश्नसंच- प्रियांका शिंदे
-अर्थशास्त्र प्रश्नसंच- संग्राम भोसले
- भूगोल प्रश्नसंच- हर्षदा म्हात्रे
व इतर सर्व classesche जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत...
समाजसुधारक - विपूल थोरमोटे
कोणतीही एक चांगली टेस्ट सीरिज लावावी 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: