Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

रीडिंग कॉर्नर तर हवाच
समृद्धी धायगुडे
Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)
रीडिंग कॉर्नर तर हवाच

वाचनप्रेमींच्या घरात एक असा खास कोपरा असतो. जिथे बसून केवळ ते त्यांच्याच विश्‍वात मग्न राहतात. अशा मंडळींसाठी घराची रचना किंवा एक रीडिंग स्पेस असते. या घरातील खास कोपऱ्याची सजावट कशी करायची हे आज आपण बघूया...
- फ्लॅट संस्कृतीमध्येही बाल्कनी, मोठ्या खिडकीच्या खाली सर्वसाधारणपणे एक वाचनाची जागा असते. या कोपऱ्याला थोडेसे ग्लॅमरस करण्याची जबाबदारी मात्र तुमच्या घरातील क्रिएटिव्ह व्यक्तीची किंवा इंटेरिअर डेकोरेटरची असते.

- घरातील या कोपऱ्याची जागा ही हवेशीर आणि शांत असावी. वाचन करताना अडचणी येणार नाहीत अशी असावी. तुमच्या रीडिंग रूममध्ये तुम्ही विविध प्रकारची क्रिएटिव्ह शेल्फ करून गावभर पसरलेली पुस्तके एका जागेवर ठेवू शकता.

- घर लहान असेल तर एक खास खुर्ची किंवा एक झोका तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. यामुळे जागेचीदेखील बचत होते.

- रीडिंग कॉर्नरची, खोलीची रंगसंगती ही शक्‍यतो लाइट कलरमध्ये असावी. तसेच पुस्तकांची शेल्फ्स, चेअर, या गोष्टी जवळ जवळ असल्यास उत्तम.

- प्रशस्त घरांमध्ये एक खास स्वतंत्र खोली तुम्ही वाचनासाठी राखून ठेवू शकता. अशावेळी खोलीमध्ये तुमच्या आवडीच्या पुस्तकांची पोस्टर, लेखकांची छायाचित्रे लावू शकता.

- घरातल्या घरात एक जिना असल्यास त्याखालील जागेचा वापर तुम्ही तुमचे छोटेसे ग्रंथालय करू शकता. रीडिंग कॉर्नरमध्ये दिव्यांची मांडणीदेखील अत्यंत महत्त्वाची असते.

- बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या, स्टाइलच्या, क्रिएटिव्ह खुर्च्या आल्या आहेत. यापैकी तुमच्या घराला, खोलीला, कॉर्नरला साजेशी एक चेअर तुम्ही खरेदी करू शकता किंवा कार्पेंटरकडून बनवून घेऊ शकता.

- या खोलीत स्वत:ची क्रिएटिव्ही वापरून जुन्या टाकाऊ वस्तूंपासून टेबल, टायरपासून खुर्च्या, शेल्फ असे विविध प्रकार बनवू शकता. यामुळे तुमच्या या रीडिंग कॉर्नर घरातील इतर खोल्यांपेक्षा एकदम उठून दिसेल. 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: