Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

मुलाखत
लतिफ कुडमेथे
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)
मुलाखत


नाव ः डॉ. स्नेहा अजित चुरी
गाव ः पालघर
पद ः कक्ष अधिकारी
पदवी ः दंतशल्यविशारद
पॅनेल ः श्री. देशमुख सर (1); श्री. कृष्णप्रकाश सर (2) व एक मॅडम (3)

सदस्य-1 ः तुमच्याबद्दल काय सांगाल?
मी ः मी मुंबईत वास्तव्यास असून सध्या स्पर्धा परीक्षा देतानाच; करार तत्त्वावर माहीम येथे खाजगी क्‍लीनिकमध्ये दंतशल्यविशारद म्हणून सराव करत आहे.
1 ः तुमचे पदवी शिक्षण कुठून?
मी ः MUHS अंतर्गतचे नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, बॉम्बे सेंट्रल येथून मआझे पदवी शिक्षण झाले आहे.
1 ः तुमचे 10वी, 12वीचे शिक्षण आणि टक्के?
मी ः माझे 10वी पर्यंतचे शिक्षण Indian Education Society चे न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा येथून झाले आहे. 10वी मध्ये मला 90 टक्के होते. 11वी/ 12वीचे शिक्षण Modern Education Societyचे रूपारेल कॉलेज, माटुंगा येथून झाले आहे. 12वीमध्ये मला 90 टक्के होते.
1 ः तुम्ही शाळेबद्दल IES असे म्हणालात; त्या शाळेचा इतिहास वा वैशिष्ट्य सांगता येईल?
मी ः हो सर... सन 1911 मध्ये (किंग जॉर्ज) 5वा यांनी भारतास भेट दिली. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन; त्यावेळचे (किंग जॉर्ज) शाळेचे संस्थापक श्री. पाटकर, ढमढेरे, हर्णे इ. शिक्षण कार्यात सहभाग घेण्याचे ठरवले. King George यांच्या; Education is the means to widen Horizones या उक्तीतून प्रेरित होऊन वरील शिक्षणमहर्षींनी 1917 मध्ये दादर पूर्व येथे; King George English School ही एक शाळा सुरू केली.
पुढे त्यांचे शिक्षणप्रसाराचे कार्य अविरत वेगात सुरूच राहिले नि त्यातून विविध भाषांमध्ये या शाळेच्या शाखा मुंबई व संलग्न परिसरात अस्तित्वात आल्या. त्यांची नावेही या संस्थापक सरांच्या नावांवरून... पाटकर गुरुजी विद्यालय/ हर्णे गुरुजी विद्यालय इ. ठेवण्यात आली. आता याचा विस्तार माणिक/ Orion अशा ICSE शाळा स्थापन होईपर्यंत झालेला आहे.
1 ः तुम्ही तुमचा व्यवसाय सोडून प्रशासनात का येऊ इच्छिता?
मी ः मी Dental Practise करत असतानाच या क्षेत्राची व्याप्ती मला कळली व त्याच्याशी; माझी सामाजिक मुद्यांसंदर्भातील आवड, कल यांच्याशी साधर्म्य वाटले.
या क्षेत्राची व्याप्ती "क्षेत्रनिहाय' उदा. ः विकासात्मक / म ानवी हक्क संरक्षणार्थ आहेच. पण "व्यक्तिनिहाय'सुद्धा आहे. म्हणजे आपली पोहोच; प्रशासकीय कामकाजातून वंचित, दिव्यांग घटकापर्यंतही पोहोचते; जे मला या सेवेचे विशेष वाटले.
सदस्य 1 ः तुम्ही म्हणालात, तुम्हाला समाजाच्या विकासात्मक बाबीत रस आहे; मग उपजिल्हाधिकारी हा तुमचा पहिला पसंतीक्रम... तर मग त्याची कार्ये सांगू शकता?
मी ः प्रथमतः जिल्हाधिकारी राज्याचा महसूल कारभाराचा प्रमुख असतो.
दुसरं ... (पुन्हा मध्येच अडवून...)
सदस्य-1 ः तर मग यात विकासात्मक काय खरंतर; CEO/ BDO नंतर तुमचा उपजिल्हाधिकारी पसंतीक्रम हवा होता... चुकून दिला का? बदलायचाय का?
मी ः निश्‍चितच सर. CEO/ BDO हे Fieldwork करणारे शिलेदार असतातच परंतु, विकासात्मक प्रशासनाच्या दृष्टीने उपजिल्हाधिकारी हे "जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे' सचित असतात.
दुष्काळ, पूर असा आपत्कालीन परिस्थितीतही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. विकासात्मक रोहयो, IAY इ. योजनांचे पर्यवेक्षण करतात.
मॅडम ः दातांचे प्रकार आणि कार्य सांगा?
मी ः पदार्थ तोडण्यासाठी असलेले समोरचे Upper व Lower असे Incisors. ऊस इ. सारखे तोडण्यासाठी Sharp Canine किंवा Cuspid. नंतर चावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे Bicuspids म्हणजे Premolars व Malars शेवटचे.
मॅडम ः या दातांपैकी कुठले नामशेष होण्याच्या मार्गावर? व का?
मी ः मॅडम या अनुषंगाने; 4 अक्कलदाढा या शरीरविज्ञानदृष्ट्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात; नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्या सर्वच व्यक्तींमध्ये सर्वच्या सर्व 4 नीट उगवतातच असे नाही. व्यक्तिपरत्वे त्यांचा 18 वर्षांतर उगवण्याचा काळ वेगळा असतोच. पण त्यांचे स्थान, येण्याची दिशा भिन्न असते. अशी अक्कलदाढ तिरपी येण्याचे प्रमाण अधिक आहेच पण अर्धवट उगवण्याचे ज्याला आम्ही Partially impacted असे म्हणतो; हे प्रमाणही अधिक आहे. यामुळे आणि तिचे स्थान जबड्याच्या अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्याने; तिचा जेवणा-खाण्यात उपयोग होत नाही. तसेच ती जबड्यात ocdusion मध्ये नसते. म्हणजे Biting Force ती झेलत नाही आणि त्यामुळे ती Functional नसते.
या अनुषंगाने; ज्या अवयवांचे उत्क्रांतीच्या नामशेष होण्याच्या मार्गावर असतात; तसेच अक्कलदाढेचे मला वाटते.
मॅडम ः OK, Good... तुम्ही दात भरण्यासाठी चांदी वापरता का?
मी ः फक्त RCT नंतरचे खूपच मोठे Filling असेल आणि पेशंट दुसरे Material afford करत नसेल तरच कमीत कमी प्रमाणात चांदी भरतो.
मॅडम ः असे का? मग चांदी नाही तर काय?
मी ः चांदीमध्ये Mercurry हा घटक असतो. जो शारीरिकदृष्ट्या विशिष्ट प्रमाणाबाहेर अपायकारक असल्याचे Dental Magazines, Seminar अलीकडे सांगितले जाते. तसेच Mercury आणि Minnamata Disease; जपान याचाही; संदर्भ मॅडम यास देता यीेल.
चांदी वगळता आम्ही बहुतांशी Composite आणि Glass Ioncmer Cement वापरतो.
कृष्णप्रकाश सर ः तुमच्या अवांतर उपक्रमात तुम्ही निबंध व कविता लिहिता आणि बक्षिसपात्र असल्याचे म्हटले आहे. कुठल्या विषयावर "बक्षीसपात्र निबंध' लिहिले आहेत?
मी ः हो सर... सर्वात पहिला... 1) डॉ. आंबेडकर आणि त्यांचे महिला सबलीकरणातील योगदान, 2) हिंदुत्व काल... आज आणि उद्या..., 3) नदीजोडप्रकल्प राबवावा का?, 4) लोक बाबू, बुवा इ. अशा अंधश्रद्धांकडे का वळतात? (मध्येच अडवून)
कृष्णप्रकाश ः या निबंधाचे Highlight Points तुमचे विचार सांगा?
मी ः मी या निबंधात असा प्रवृत्तीवर उपाय सुचविण्याआधी; लोक बाबू, बुवा अशांकडे वळतातच का? याची मीमांसा केली आहे.
पहिलं - 1) जीवनातील अनिश्‍चितता... अनेक प्रश्‍नांची उत्तरे इतिहास वा शास्त्र देऊ शकत नाही.
2) वैद्यकीय यंत्रणेची दुरावस्था. अनेकदा डॉक्‍टरची Appointment सामान्यांना सहज मिळत नाही. मिळालीच तर Sisters / Attendants असे मध्यस्थ सहकार्य दाखवतीलच असे नाही. त्यातूनच सध्याच्या डॉक्‍टर्सची जीवनशैली पाहता ते रुग्णाशी हृद संवाद साधतीलच असे नाही. बाकी उपचार व औषध खर्चाची बातच वेगळी!
या सर्व पार्श्‍वभूमीवर; बाबा, बुवा लोकांना सहज उपलब्धही असतात व त्यांच्या उपचारापेक्षा भले ते जरी अघोरी असतील; तरी त्यांच्या "रसाळ वाणीने' रुग्ण म्हणजे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
3) महिला म्हणून मी येथे; विशेष नमूद करेन; एखादी संकटग्रस्त स्त्री; जर बाबू बुवांकडे गेली तर समाजाला ती सती सावित्री वाटेल.
पण "तीच' विवंचित स्त्री; त्या विंवचनेशी संबंधित अशा व्याख्यानाला गेली किंवा स्वतःच्या मनःस्वास्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना गेली तरी "ती' कलंकित ठरेल. समाज तिला दुषणे लावील आणि तेच जर ती विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी बाबू - बुवांकडे गेली तर ती समाजाच्या दृष्टीने पूज्यनीय ठरेल. अशी आपली पर्यायाने स्त्रीची गत आहे.
कृष्णप्रकाश सर ः बरं... आता दुसरे विषय निबंधाचे सांगा?
मी ः मराठी शाळा व भाषा सद्यःस्थिती व भवितव्य...
कृष्णप्रकाश सर ः याविषयी काय लिहिलेत?
मी ः भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. गांधीजींच्या म्हणण्यानुसारही कुणीही व्यक्ती मातृभाषेत अत्यंत चांगली अभिव्यक्त होते. आपण इंग्रजीला नावे ठेवतो, पण मराठीचा आग्रह धरताना आपण "प्रमाण' मराठीही महाराष्ट्रातील असंख्य -------- वनवासींच्या भाषेवर लादतच आहोत; याचा विचार होत नाही.
भवितव्याच्या दृष्टीने मराठी शाळांत Semi English चा पर्याय असू शकतो. कारण उच्च शिक्षणातील सध्याचे संदर्भसाहित्य हाताळण्यास इंग्रजीवाचून पर्याय नाही.
आणि भाषा टिकविण्यासाठी शाळा टिकवण्यापलीकडेही भाषा ही ज्ञानभाषा, व्यापार आणि व्यवहार भाषा व्हायला हवी. तिचा व्यावहारिकदृष्ट्या उपयोग व्हायला हवा. अशा प्रयत्नांतून अमराठी लोकांना मराठीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.
कृष्णप्रकाश सर ः तुम्ही कविताही लिहिता. कुठल्या भाषेतून?
मी ः फक्त मराठी!
कृष्णप्रकाश सर ः कवितांचे विषय?
मी ः सर मला उत्स्फूर्त सुचलेल्या कविता या मानवी जीवन; त्यातील प्रसंग/ भावनांचे चित्रण आणि जमल्यास त्याची निसर्गाशी सांगड या आशयाच्या असतात.
कृष्णप्रकाश सर ः बरं कवितांची शीर्षके सांगा...
मी ः काळं पांढरं, "तिचा' पट, साडी, एकदंतास; पाऊस...
कृष्णप्रकाश ः तुमच्या या सर्व उपक्रमांतून तुम्ही खूपच Emotional वाटता. त्याचा प्रशासनाला काय उपयोग होईल असं वाटतं?
मी ः सर निश्‍चितच; Emotional Quotient या मानवी पैलू प्रशासनात नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
कृष्णकांत सर ः शेवटचा प्रश्‍न Emotional Quotient ची व्याख्या सांगा? आणि तुम्ही म्हणालात तसे त्याचे प्रशासकीय महत्त्व?
मी ः माणूस हा भावनाप्रधान असतोच. फक्त प्रत्येकाच्या भावना, त्यांची तीव्रता विविध असते. अशा भावनांची हाताळणी; त्यांचे व्यवस्थापन म्हणजे भावनिक बुद्‌ध्यांक... emotional quotient!!! होय.
प्रशासनात मी या पैलुमुळे; आवश्‍यक तेथे मनाचा ओलावा, empathy दाखवू शकेन. माझ्या वरिष्ठांशी आणि जनमानसाशी सुसंवाद साधू शकेन. त्यांच्या गाऱ्हाण्यांच्या पलिकडे; त्यांच्या भावना समजीू शकेन आणि माझ्या सहकाऱ्यांबरोबर; उत्तम सहकार्यभाव प्रस्थापित करू शकेन.


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: