Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क
महेश शिंदे
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)
राज्य-सेवा मुख्य परीक्षा 2017

मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क

अत्यंत कमी संकल्पना आणि खूप जास्त (डेटा) (Data) आणि (माहिती) (information) असणारा विषय म्हणून ओळखला जातो. या विषयामध्ये गुण मिळण्याची शक्‍यता खूप जास्त असते. मात्र अभ्यास करताना या विषयात रस (interest) येतच नाही. या विषयाची तयारी करताना पूर्ण पुस्तक वाचायचे असा ग्रह नको तर (syllabus) अभ्यासक्रमाचे मुद्दे (point) समजावून घेऊन तयारी करावी.
तयारी ः
1) सर्वांत अगोदर अभ्यासक्रम (syllabus) वाचणे एक ते दोन वेळेस लिहून काढणे.
2) मागच्या 4 ते 5 वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका चाळणे यासाठी मागील प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण असणारे मार्केटमधील पुस्तके वाचणे (success academy) चे विश्‍लेषणाचे पुस्तक ज्ञानदीप ऍकॅडमीचे विश्‍लेषणाचे पुस्तक.
3) वाचनासाठी पायाभूत वाचन (Base reading) म्हणून पुस्तके वाचावीत. गणेशहाळे सर - सिनर्जी प्रकाशन आनंद बोबडे सर (ज्ञानदीप प्रकाशन), रंजन कोळंबे पुस्तक/ युनिक ऍकडमीचे पुस्तक या चार पुस्तकांपैकी कोणतेही एकच पुस्तक वाचावे. मानवी हक्क व जबाबदाऱ्या - नितीन अलकुंटे हे पुस्तक छोटे, crisp आहे आणि revision साठी अत्यंत आवश्‍यक आहे.
4) वरील संदर्भ साहित्य (reference Material base) म्हणून वापरणे, आणि यानंतर इंटरनेटचा (internet) जास्तीत जास्त वापर करावा.
5) पेपर 3 मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळविण्यासाठी इंटरनेट (Internet) चा वापर योग्य पद्धतीने करावयास हवा.
6) यासाठी कोणताही topic घ्या net वर शोधणे.
उदाहरणार्थ - NCERT
a) NCERT मुख्य वेबसाईटवर (Original Website) जावून खालील गोष्टी शोधाव्यात.
- Logo
- Motto
- Objectives
- Policies
- संस्था
- महत्त्वाचे फायदे
- महत्त्वाचे बदल
- महत्त्वाचे करार
- Goals - Long term
Medium term
Short term आणि या सर्वांची माहिती आपल्या Micronotes मध्ये काढून ठेवावी.
7) यासोबत MCQ चा जास्तीत जास्त सोडविणे.
8) पेपर 3 मध्ये जास्त मार्क्‍स मिळविण्यासाठी (Internet) इंटरनेटचा वापर आणि चालू घडामोडींवर update राहणे सर्वांत जास्त अपेक्षित आहे.
9) सोबतच तुमच्या अभ्याला Indian Year book भारताची आणि महाराष्टाची आर्थिक पाहणी सर्व महत्त्वाच्या मंत्रालयांच्या website सोबत सतत update करत राहणे अत्यंत आवश्‍यक आहे.
10) मात्र याचा वापर किती प्रमाणात करावा हे कळविण्यासाठी मागील वर्षांच्या आयोगाच्या प्रश्‍नपत्रिकांचा जास्तीत जास्त तयारी करणे.


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: