Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

क्वीझ - 17
मुकुल रणभोर
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

क्वीझ - 17

1)आंध्रप्रदेशामध्ये उत्पादन घेतले जाणाऱ्या कोणत्या जातीच्या आंब्याला 'G7' हे मानांकन देण्यात आले आहे?
अ. वगानपल्ले ब. केसर क. किशन भोग ड. आम्रपाली

2)अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठातील संशोधकांना केवळ 10.5 प्रकाशवर्ष दूर आपल्या सूर्यमालेसमान एक सूर्यमाला आढळली आहे?
अ. ऍरिझोना विद्यापीठ ब. फ्लोरिडा विद्यापीठ क. टेक्‍सास अँड एम विद्यापीठ ड. कोलंबिया विद्यापीठ

3)जगातील प्रथम क्वांटम कॉम्प्युटिंग यंत्र कोणत्या देशाने तयार केले आहे?
अ. जपान ब. अमेरिका क़. चीन ड. इंग्लंड

4)सध्या सुरू असलेल्या एप्रिल-मार्च या आर्थिक वर्षाचे स्वरूप बदलून ते आता जानेवारी ते डिसेंबर असे करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
अ. गुजरात ब. मध्यप्रदेश क़. महाराष्ट्र ड. केरळ

5)जागतिक प्रसारमाध्यमे स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतात?
अ. 1 मे ब. 5 मे क. 2 मे ड. 3 मे

6)कार्बन व्यापार ही संकल्पना केव्हापासून रूढ झाली?
अ. वसुंधरा परिषद ब. क्‍योटो करार क. मॉंट्रियल करार ड. बाली करार

7) DDT ने अन्न साखळीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे प्रमाण _________.
अ. वाढत जाते ब. कमी होते. स्थिर राहते ड. यापैकी नाही

8) हवेचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढविल्यास ध्वनीचा हवेतील वेग किती असेल?
अ. 5 मीटर/सेकंद ब. 36 मीटर/सेकंद क़. 9 मी/सेकंद ड. 3 मीटर/सेकंद

9) 'एम' या भ्रमणकक्षेत इलेक्‍ट्रॉनची अधिकतम संख्या किती असते?
अ. 8 ब. 64 क़. 18 ड. 32

10) 'डीएनए' या रेणूमध्ये खालील भाग नसतो.
अ. ऍडनाईनब. थायमीन क . ग्वाईन ड. युरोसील

11)जीवशास्त्रानुसार मृत्यू नेमका केव्हा होतो?
अ. जेव्हा हृदयाचे ठोके बंद पडतात तेव्हा ब. जेव्हा शरीरातील सर्व पेशी मरण पावतात
क़. जेव्हा मेंदू काम करेनासा होतो तेव्हा ड. यापैकी नाही

12)नेत्रदान करते वेळी कोणता भाग दान करतात?
अ. पारपटल ब. श्वेतपटल क़. रंजितपटल ड. यापैकी नाही

13)महाराष्ट्राच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत राज्यातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र कुठे उभे करण्यात आले आहे?
अ. डोंगरगाव ब. माहूर क़. नाशिक ड. नेर

14)लिथियम आयर्न बॅटरीला एक सुरक्षित पर्याय म्हणून शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या बॅटरीमध्ये कोणते पदार्थ वापरले गेले आहेत?
अ. निकेल व लीड ब. निकेल व झिंक क़. झिंक व लीड ड. झिंक व लिथियम

15)वर्ष 2017 मध्ये कोणत्या देशाच्या बाजारपेठेत प्रथमच 'केसर' जातीचा भारतीय आंबा विकला जाणार आहे ?
अ.न्यूझीलंड ब. फ्रान्स क़. ऑस्ट्रेलिया ड. जर्मनी

16) पुढीलपैकी कोणते मुद्रा बाजाराचे साधन नाही ?
अ. राजकोषीय चलन ब. पुर्नखरेदी ठराव क़. कंपनीचे समभाग ड. अनामत रकमेचे प्रमाणपत्र

17) शुल्वसूत्रे कशाशी संबंधित आहेत?
अ. औषधशास्त्र ब. खगोलशास्त्र क़. भौतिकशास्त्र ड. भूमिती

18) संगम काळात प्रचलित असलेला 'पट्टीणी पंथ' कशाशी संबंधित आहे?
अ. पूर्वजांची पूजा ब. पशूपूजा क़. कालीमातेची पूजा ड. कन्नगीची पूजा

19)'तोलका पिय्य्म' हे काय आहे?
अ. तमीळ महाकाव्य ब. तमीळ व्याकरणाचा ग्रंथ क़. पांड्या इतिहासाचे संकलन ड. प्राचीन तमीळ परंपरांचे संकलन

20) भ्रष्टाचार आकलन निर्देशांक (करप्शन परसेप्शन इंडेस्क) कोण प्रकाशित करते?
अ. ट्रान्परन्सी इंटरनॅशनल ब. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल क़. वर्ल्ड इकनॉमिक फोरम ड. वर्ल्ड बॅंक

21) कनिष्क स्तूप कुठे आहे ?
अ. बोधगया ब. सारनाथ क़. पेशावर ड. गंगटोक

22)प्रसिद्ध 'आस्वान' हे शहर कोणत्या देशात आहे?
अ. मोरोक्को ब. इजिप्त क़. अल्जीरिया ड. आर्मेनिया

23)पट्टीसीमा लिफ्ट सिंचन प्रकल्प हा चर्चेत होता, तो कोणत्या दोन नद्यांना जोडणारा प्रकल्प आहे?
अ. महानदी - गोदावरी ब. पेरियार - कृष्णा क़. कृष्णा - महानदी ड. कृष्णा - गोदावरी

24)संयुक्त राष्ट्राने 'शाश्वत पर्यटन विकास वर्ष' म्हणून कोणते वर्ष घोषित केले आहे ?
अ. 2018 ब. 2017 क़. 2019 ड. 2020

25)'एफसी-31' गायर फाल्कन स्टेल्थ फायटर हे विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे?
अ. अमेरिका ब. फ्रान्स क़. भारत ड. चीन
-------------------------------------------
1) अ 2) अ 3) क 4) ब 4) ब 5) ड 6) ब 7) अ 8) ड 9) क 10) ड
11) ब 12) अ 13) अ 14) ब 15) क 16) क 17) ड 18) ड 19) ब 20) अ
21) क 22) ब 23) ड 24) ब 25) ड
-------------------------------------------
 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: