Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 

करंट अफेअर्स
सायली काळे
Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)
करंट अफेअर्स 
राष्ट्रीय
जम्मू-काश्‍मीर राज्यात आयुर्वेद
'सवा रिक्‍पा' नावाची आयुर्वेदिक औषधी संस्था केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीर मधील लेह येथे स्थापन केली आहे.
'सवा रिक्‍पा' ही तिबेटियन आयुर्वेदिक औषधी पद्धती असून भारतात ती लडाख लेह, सिक्कीम, दार्जिलिंग (प. बंगालचा काही भाग) व अरुणाचल प्रदेश मधील काही भागात वापरली जाते.
या प्राचीन औषधी पद्धतीलाच 'आंची' (aanchi) पद्धती असेही म्हटले जाते.
या पद्धतीमध्ये रोगाचा व पर्यावरणातील तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात व आपल्या केंद्र सरकारने या पद्धतीला मान्यता दिली आहे.
-----------------------------
स्थावर मालमत्ता नियामक मंडळ
राज्यानेही स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) नियामक मंडळ स्थापन करावे असे केंद्रशासनाने म्हटले आहे.
भूमी हा विषय राज्य सूचीतील असल्याने स्थावर मालमत्ता नियामक आणि विकास कायदा 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यानेही स्थावर मालमत्ता नियामक मंडळ स्थापन करणे आवश्‍यक आहे.
त्यामुळे राज्यस्तरावर निर्माण होणाऱ्या व्यापारी व गृहक्षेत्रातील विकास प्रकल्पाचे नियमन करणे सोईस्कर होणार आहे.
स्थावर मालमत्ता कायदा व्यापारी आणि गृहक्षेत्रातील 500 चौरस मीटरपेक्षा मोठ्या व स्थावर मालमत्ता नियामक मंडळाकडे नोंदणी केलेल्या प्रकल्पांना बंधनकारक असल्याने कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे.
उत्तरप्रदेश स्थावर मालमत्ता नियामक मंडळ स्थापन करणारे पहिले राज्य आहे.
-------------------------------
अमेरिकेतील भारतीयांना इन्फोसिसचा आधार
इन्फोसिस पुढील दोन वर्षात अमेरिकन कामगारांना अमेरिकेतच रोजगार मिळवून देणार असून त्याकरिता चार ठिकाणी विशेष तंत्रज्ञान हब निर्माण करणार.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हीसाबाबतचे नियम कडक केल्याने अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक भारतीयांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह येणार आहे म्हणून अमेरिकन भारतीयांनाही इन्फोसिसचा हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.
इन्फोसिस ही भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी असून 50हून अधिक देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच उत्पादन, वितरण, मार्केटिंग, वैद्यकीय सुविधा, वित्तीय सेवा ऊर्जा क्षेत्र आणि अशा इतरही क्षेत्रात इन्फोसिस अमेरिकेत अशा सेवा विस्तारून रोजगार निर्माण करणार आहे.
तसेच इन्फोसिस ही कंपनी इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातूनही अनेक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे.
------------------------------------
नवे पाकिस्तानी उच्चायुक्त
भारतातील पाकिस्तानचे सध्याचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या जागी सोहिल महमूद यांची नियुक्ती करण्यात येणार आहे
महमूद हे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असून त्यांनी याआधी अनेक ठिकाणी तणावाच्या परिस्थितीत काम केले आहे.
महमूद हे 1985 मध्ये परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते, 1991-95 या कालावधीत महमूद यांनी तुर्कीचे उच्चायुक्त पद सांभाळले आहे तर 2009-13 या काळात थायलंडमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
--------------------------------------
पर्यावरण
बेलंदूर तलावाजवळ उद्योगबंदी
राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने बेलंदूर तलावाजवळील उद्योगांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
बेलंदूर हा तलाव बेंगळूरू जवळ असून त्यामध्ये तेथील जवळच्या उद्योगधंद्यांचे प्रदूषित पाणी सोडल्याने तलावातील जीवसृष्टी धोक्‍यात आली आहे.
राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने राज्य प्रदूषण नियामक मंडळाला बेलंदूर तलावाच्या परिसरातील जे उद्योग आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाहीत त्यांच्यावर 5 लाखापर्यंत दंड लावण्याचा आदेश दिला आहे.
प्राधिकरणाने तलावाच्या प्रदूषण प्रतिबंधासाठी नेमलेल्या समितीने तलाव महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याची शिफारस केली आहे.
नमा बेंगळूरू फाउंडेशन सामाजिक संस्था या स्वच्छतेकरीता विशेष प्रयत्न करत आहे.
काही दिवसांपूर्वी बेंगळूरू जवळील उल्सुर तलावातदेखील प्रदूषित पाणी मिसळल्याने त्या तलावातील ऑक्‍सिजन पातळी खालावून अनेक मासे मृत्युमुखी पडले होते.
---------------------------------------
विज्ञान-तंत्रज्ञान

GSAT-9चे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 5 मे रोजी दक्षिण आशियायी उपग्रहाचे (GSAT-9) अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोच्या GSLV F-09 या प्रक्षेपकाद्वारे केले प्रक्षेपण.
दक्षिण आशियायी भागातील देशांना दूरसंचार व संकटकाळात मदत मिळावी तसेच परस्पर संपर्क उपलब्ध व्हावा असा या उपग्रहाचा उद्देश आहे.
या उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी 18व्या सार्क परिषदेत मांडल्यापासून 'सार्क उपग्रहाचे' काम सुरू झाले होते.
पाकिस्तानने या प्रकल्पात सहभागी होण्यास नकार दिल्याने सार्क ऐवजी 'दक्षिण आशियायी उपग्रह' असे नामकरण करण्यात आले.
द. आशियातील 7 देश GSAT-9 उपक्रमात सहभागी आहेत : भारत, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि अफगाणिस्तान.
--------------------------------------
आंतरराष्ट्रीय
भूतान BBIN बाहेर
भुतानने BBIN (बांगलादेश, भूतान, इंडिया, नेपाळ) मोटार व्हेईकल या करारातून माघार घेतली.
हा करार 2014 च्या सार्कच्या काठमांडू परिषदेत मांडण्यात आला होता मात्र पाकिस्तानने याला विरोध केल्याने एक वर्ष उशिरा 2015 मध्ये भारताने BBIN कराराची निर्मिती केली आहे.
भारत, बांगलादेश, भूतान व नेपाळ या सार्कमधील पूर्वेकडील देशांना प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी या कराराचा फायदा होणार आहे व यामुळे माल व प्रवासी वाहतूक सुलभ होऊन व्यापार वाढीस मदत होणार आहे.
या प्रकल्पाला 5टर्ज आशियायी विकास बॅंक देणार आहे व 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
मात्र वाहनांच्या प्रदूषणामुळे भूतानमधील पर्यावरणाची हानी होईल असे भूतानचे म्हणणे आहे.
तसेच भूतानमधील लोकांचा या कराराला विरोध आहे व भूतानसरकारने 2018 या वर्षात होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे.
--------------------------------------
फ्रेंच निवडणुका
युरोप समर्थक एन मार्श पक्षाचे संस्थापक, 39 वर्षीय एमन्युएल मक्रोन फ्रान्सचे सर्वांत युवा अध्यक्ष ठरले. (अंदाजे 66.5-66.1 टक्के मते)
नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मेरी ले पेन यांचा पराभव (अंदाजे 33.9- 34.5 टक्के मते)
एमन्युएल मक्रोन यांच्या कारकिर्दीची सुरवात 2004 मध्ये इन्वेस्टमेंट बॅंकर म्हणून झाली.
2013-14 या कालावधीत तत्कालीन राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती
2014-16 याकाळात फ्रान्सचे अर्थमंत्री
ृ---------------------------------------------------
चर्चेतील बेटे
बेट स्थान कारण
मार्शल बेटे
उत्तर प्रशांत महासागर
विषुववृत्ताजवळ
पर्यावरणीय 'किगाली' करारावर स्वाक्षरी करणारे प्रथम राष्ट्र
परासेल बेटे, स्पार्टली बेटे
दक्षिण चीनी समुद्र
चीनचा 9 डॅश सीमेवर दावा, परिसरातील 5 राष्ट्रांशी
सेन्काकू (डायोयु) बेटे
पूर्व चीनी समुद्र
चीन आणि जपान मध्ये बेटावरील हक्कांवरून वाद
कुरील बेटे
प्रशांत महासागर आणि ओखोट्‌स समुद्र यांच्या मध्ये वाद
(रशिया-जपान जोडणारे)
बेटमालिकेतील काही बेटांवरून जपान व रशिया मध्ये वाद
-------------------------------------------------------  


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: