Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
एक भटका दिवस रोहित हरीप -------------------------- बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी स्थळे शोधली जातात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करुन आजूबाजूचा परिसर पिंजून काढला जातो.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

किल्ले , इतिहासाचे  प्रोजेक्‍ट संकलन  भटक्‍यांना डोंगरवाटा तिन्ही त्रिकाळ खुणावत असतात. उन्हाळा असो वा हिवाळा या आडवाटा धुंडाळण्यासाठी सह्याद्रीचे बेलाग कडे कायम साद घालत असतात. या डोंगरवाटांवर भटकंती करायची म्हणजे तयारी मोठी असते.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

एक भटका दिवस रोहित हरीप -------------------------- बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी स्थळे शोधली जातात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करुन आजूबाजूचा परिसर पिंजून काढला जातो.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

शेतकरी जात्यात, ग्राहक सुपात ---------------------------- तुरीच्या बाबतीत तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा आणि तहान भागली की विहीर बुजवायचा ऱ्हस्वदृष्टी खटाटोप सरकार करत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची तर शिकार झालीच आहे, पण या धोरणाचे दुष्परिणाम पुढच्या वर्षापासून ग्राहकांनाही भोगावे लागणार आहेत. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा विक्रमी तूर पिकविलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

  "तार' जुळविणारा मुशाफिर...! आपल्याकडे शास्त्रीय संगीत म्हटले की, विशिष्ट नजरेने त्याकडे पाहिले जाते. त्यातही एखादे वाद्य फारसे परिचित नसेल तर त्याबद्दल आणखीनच निरिच्छ दृष्टिकोन असतो. एखादी गोष्ट लहानपणापासून योग्य पद्धतीने सांगितली तर ती आयुष्यभर लक्षात राहते, हा विचार 38 वर्षे सतारीची साधना करणारा 'मुशाफिर' करत आहे. हा मुशाफिर दहा वर्षांपासून भारतात आणि परदेशात मुलांमध्ये "सतार' या वाद्याबद्दल जागरूकता निर्माण करत आहे.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

विवाह सोहळ्याचे 'संगीत' आपल्या भारतीय समाजात लग्न ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. हल्ली प्रत्येक जाती -धर्माच्या विवाह समारंभात 'संगीत' हा नव्याने रुजू झालेला पण जुनाच ट्रेंड प्रकर्षाने दिसून येतोय. विवाह मग तो महाराष्ट्रीयन समाजातला असो अथवा गुजराती किंवा मारवाडी, बहुतेक विवाह समारंभ त्यातील 'संगीत' या खास विधी म्हणा किंवा कार्यक्रमाशिवाय पूर्ण होत नाहीत.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

विवाह समारंभाची सजावट विवाह समारंभात नेहमी दिसणारी आकर्षक, उंची सजावट कशासाठी असते ? असा प्रश्न एका समाजसेवी -सेवाभावी वृत्ती असणाऱ्या गृहस्थांनी आपल्या खासगी गप्पांच्या मैफलीत केला, तेव्हा त्यांच्या जवळची मित्र मंडळी त्यांना निक्षून म्हणाली, ''पुरे रे बाबा तुझे काटकसरीचे व्याख्यान ! भारतासारख्या तथाकथित गरीब देशांतही लग्न-समारंभ थाटामाटाने करण्याकडे अगदी मध्यमवर्गीयांचादेखील कल आहे.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

प्री-वेडिंग फोटो पूर्वी लग्नाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या विविध गोष्टीमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूटिंगला महत्त्व असायचे. हे फोटो शूट केवळ लग्नातच केले जायचे. आता मात्र या फोटोशूटमध्ये विविध टेंड्रस आलेले पाहायला मिळतात. सध्या सर्वांत जास्त क्रेझ असणाऱ्या प्री-वेडिंग फोटोशूटविषयी... "लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

लगीन "जोडा' सध्या लग्नातील प्रत्येक समारंभात घातल्या जाणाऱ्या पेहरावानुसार त्यावर साजेशी पादत्राणे घेतली जातात. मुलांचा बूटासोबत जूती किंवा कोल्हापूरी चप्पल घेण्याकडे अधिक कल दिसतो. मुलींना पेहरावाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलींकडे वेगवेगळ्या प्रकारचे किमान चार-पाच जोड असतातच. त्याविषयी डिझायनर चप्पल किंवा सॅंडल, जूती, कोल्हापूरी चप्पलची सध्या चलती आहे. लग्न...

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

पारंपरिकतेतील नवा "साज' लग्नामध्ये नवरा- नवरीसाठी परंपरेने ठरलेले सोन्याचेच दागिने तर घेतलेच जातात. याशिवाय लग्नातील विविध विधींच्यावेळी घालण्यासाठी इतरही वैविध्यपूर्ण दागिन्यांचे प्रकार ही बाजारत पहायला मिळतात. सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीमध्ये आलेल्या ट्रेंडविषयी  दागिने खरेदी... सध्या लग्नसराई मुहूर्तामुळे दागिन्यांची खरेदीला लग्न घरातील लोकांची झुंबड उडालेली दिसते.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

  करवलीचा "तोरा'   नवरा-नवरीनंतर लग्नातील प्रमुख आकर्षण म्हणजे करवल्या असतात. आपल्या कपडे आणि दागिन्यांच्या पेहरावाने पाहुण्यांचे लक्ष आकर्षित करणाऱ्या करवलीच्या दागिन्यांविषयी.. "लग्न' ठरताच लगेच तयारी सुरू होते ती खरेदीची. नवरदेव - नवरीबरोबर आता करवल्याही या खरेदीमध्ये मागे राहिलेल्या नाहीत. लग्न समारंभातील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हटके लुक तयार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न या करवल्यांकडून केला जात असतो.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

विवाह विशेषांक ऑनलाइन निमंत्रण काळ बदलला लग्नाचे निमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे अंगवळणी पडले. व्हॉट्‌स ऍप आणि फेसबुकचा वापर करताना मनात आले, की जगभरात असलेल्या सुहृदांशी संपर्क करणे अगदी सहज शक्‍य झाले. मनाच्या वेगाला मागे टाकेल असा हा ई-मार्ग लग्नाच्या सोहळ्यात जवळचा ठरत आहे. स्काइपवरून तर प्रत्यक्ष निमंत्रणाचा आनंद मिळतोच. मने, कुटुंब जोडणाऱ्या या ई कार्डसविषयी...

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

काश्‍मीरप्रश्‍नी नेमके काय चुकते? फरहा खान ही एक काश्‍मिरी विद्यार्थिनी तीन वर्षांपूर्वी सरहद संस्थेत पुण्यात शिकायला आली. "सरहद'मध्ये शिकणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांपैकी ती एक! ती राहायची "सरहद'च्याच वसतिगृहात मात्र मला जॉब करायचा आहे, पुढे स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, कुटुंबाला मदत करायची आहे, या कारणांसाठी तिने बाहेरच्या वसतिगृहात राहण्याची परवानगी मागितली.

Monday, May 01, 2017 AT 12:00 AM (IST)

H1B - अमेरिकेतील सद्यःस्थिती  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने अलीकडेच संपूर्ण H1B उपक्रमाचा नव्याने आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यापासूनच H1B उपक्रमामध्ये काय बदल होतील आणि त्याचे विविध क्षेत्रांवर काय परिणाम होतील याची चर्चा अमेरिकन प्रसारमाध्यमांत होत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने अलीकडेच संपूर्ण H1B उपक्रमाचा नव्याने आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Monday, May 01, 2017 AT 12:00 AM (IST)

डिजीटलायझेशनवर भर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आहे. पाठोपाठ राज्यकर्त्या पक्षाचे अधिवेशनही होऊन गेले आहे. त्यात आर्थिक सुधारणांबरोबर सामाजिक सुधारणावर भर देण्यात आला आहे. या सरकारची तीन वर्षे आता पुरी झाली आहेत. उरलेल्या दोन वर्षांत आणखी सुधारणा करून 2019 ची सार्वत्रिक निवडणूक पुनः जिंकण्याच्या दृष्टीने पुढील पावले पडतील. जुलैपासून लागू होणारा वस्तू सेवाकर जर महसुलात भर घालणारा ठरला, तर खर्चासाठी जास्त रक्कम उपलब्ध होईल.

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

मॅंंगो डेझर्ट्स एप्रिल व मे महिना आला, की आपण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंबा हे फळ असे आहे, की ते सर्व जणांना मनापासून आवडते. परत वर्षातून एकदाच हे फळ चाखायला मिळते. आंब्याचे बरेच गुणधर्म आहेत. तो औषधी आहे. आंबा हे सर्व फळांमध्ये श्रेष्ठ फळ आहे. म्हणूनच त्याला "फळांचा राजा' म्हणतात. औषधाच्या दृष्टीने पाहता कलमी आंब्यापेक्षा देशी आंबा अधिक लाभदायक असतो. आंबट आंब्यापेक्षा गोड आंबे अधिक फायदेशीर असतात.

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

कैरीच्या चटण्या, सॅलॅड, लोणचे - उन्हाळा सुरू झाला की कैरी, आंबा यांचा सीझन सुरू होतो. हिरव्यागार कैऱ्या पाहून तर तोंडाला पाणी सुटते. कैऱ्या पिकल्यानंतर त्याचे आंब्यात रुपांतर होते आणि असा हा "आंबा' फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. अशा या सदाबहार आंब्याच्या व कैरीच्या काही रेसिपी.

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

पुडिंग, पॅनकेक, वॅफल्स - कांचन बापट आंबा विशेष सध्याचा वाढता उन्हाळा कितीही असह्य, त्रासदायक असला तरी तो सुसह्य करण्याची ताकद असलेली, सगळ्यांना आवडणारी एक गोष्ट याच दिवसांत मिळते... ती म्हणजे आंबा... आंबा नुसता रस काढून, फोडी करून किंवा कशाहीबरोबर खाता येतो किंवा त्याचा कंटाळा आला (तो तसा येतच नाही), तर त्याचे अनेक मस्त मस्त पदार्थ बनवून खाता येतो.

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

घारगे, फिरणी, फालुदा उन्हाळ्यातील खास पदार्थ ः कैरी आणि आंबा मार्च महिना उजाडला आणि बाजारात कैरी दिसू लागली की गृहिणींना प्रचंड आनंद होतो. कैरीचे पन्हे, ताजे लोणचे, तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, कैरीची डाळ, कैरी घालून भेळ असे अनेक प्रकार त्यांना सुचू लागतात. नंतर पिकलेले आंबे मिळू लागल्यावर तर जेवणाची लज्जत आखणीनच वाढू लागते. कैरी आंब्याचा सीझन 3-4 महिनेच टिकणारा असल्याने त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा लागतो.

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

अांब्याचे पारंपरिक पदार्थ दाहक उन्हाळा सुसह्य होतो, तो अमृतासमान रुचकर छान पिकलेल्या पिवळ्याधमक सुगंधी आंब्यामुळे. मग फक्त आमरसच नव्हे तर त्या रसाचे अनेक चवदार पदार्थ बनवले जातात. आमरसामुळे अंमळ वजन वाढत असले तरी मंडळी आमरस आणि त्याचे विविध चविष्ट पदार्थ खाण्यात मुळीच हयगय करीत नाहीत. आंबा हे आबालवृद्धांचे अत्यंत आवडीचे फळ आहे. पण आंबा उष्ण प्रवृत्तीचा असल्याने रात्री आंबे पाण्यात घालून ठेवावे.

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

अक्षरातलं स्वातंत्र्य ------------------- उन्हाळा सुरू होणार होता आणि मी आठवीचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो. अभ्यासाच्या खोलीत वडील वाचत असलेला डॉ. श्रीराम लागूंचा "लमाण' पुस्तक टेबलावर दिसलं. उत्सुकता म्हणून पुस्तक चाळू लागलो. पुस्तकाचा साहित्यिक दर्जा समजण्याचा प्रश्नच नसल्याने आपल्या अकलेप्रमाणे आधी छायाचित्र, मग कंटाळल्यावर एक पान उलटले.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

माझी बुक थेरपी -- नेमकं कुठं वाचलं होतं ते आठवत नाही पण शांताबाईच्या एका मुलाखतीतलं एक वाक्‍य कायम लक्षात राहिलं. वाचनाविषयी बोलताना त्या सांगत होत्या, की हातात येईल ते वाचायचे आणि ते वाचल्यानंतर मगच ते चांगलं की वाईट हे आपली सदसद्विवेकबुद्धी वापरून ठरवायचं, हा नियम त्यांनी घालून घेतला होता. त्यामुळे त्यांची "वाट्टेल ते वाईट वाईट वाचते' अशी प्रतिमा निर्माण झाल्याचं सांगून त्या दिलखुलास हसल्या होत्या.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

पुस्तकांचे गाव पश्‍चिम महाराष्ट्रातील थंड हवेची पर्यटनस्थळे म्हणून महाबळेश्‍वर- पाचगणी शहरे प्रसिद्ध आहेत. या शहरांच्या मध्यात वसलेले भिलार गाव उत्कृष्ट दर्जाच्या रसाळ लालचुटूक स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता हे गाव आणखी एका गोष्टीमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. ही ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर जपली जाणार आहे.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

वाटेवरची पुस्तकं पुस्तकांमध्ये नवं- जुनं असं काही नसतं. एखाद्या न वाचलेल्या पुस्तकाची जुनी प्रतही आपल्यासाठी नवं पुस्तक असते आणि वाचून झालेल्या पुस्तकाची नवी कोरी प्रत जुनं पुस्तक असू शकते. फुटपाथवरच्या पुस्तकांविषयी लिहायचं ठरवलं आणि अशा कितीतरी "नव्या' पुस्तकांच्या आठवणी जाग्या झाल्या. नोकरीला लागले तेव्हा शनिवारी अर्धा दिवस ऑफिस असायचं.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

पुस्तकं... आली कुठून? चालली कुठं? "आमच्या सेजलला ना लहानपणापासून पुस्तकांची फार आवड. अगदी दीड वर्षांची असतानाच तिनं पुस्तक हातात धरलं.. आणि इतकी तन्मयतेनं वाचते म्हणून सांगू...' एक आजी आपल्या नातीचं पुस्तकप्रेम मोठ्या अभिमानानं सांगत होत्या. "आमचा कबीर अगदी वाचत नाही हो. त्याच्या आवडीची किती पुस्तकं आणून ठेवली. कितीतरी वेळा त्याला घेऊन वाचायला बसते. त्याला वाचून दाखवते. चित्रं दाखवते. पण तो अजिबात पुस्तकं मागत नाही.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

पुस्तक वाचन आणि मी लेखनकला ही प्राचीन व म्हणूनच प्रगल्भ आहे. टीव्ही, रेडिओ, सिनेमा या माध्यमांपेक्षा जास्त चिरंतन व व्यामिश्र आहे. माणसाचे संचित त्याच्या लेखनात असते. एका अर्थाने सर्व पुस्तके हा माणसाला मिलालेला वारसाच आहे. या समृद्ध वारशाची ओळख हा एक विलोभनीय अनुभव आहे. काही पुस्तके येतात, तत्कालीन महत्त्वाने गाजतात व नंतर विसरली जातात तर काही पुस्तके आपला ठसा उमटवून जातात.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

वाचनाने माझ्या आयुष्याला समृद्ध केलं असं म्हणत असताना मला प्रकर्षाने आठवतं ते म्हणजे आयुष्यात वाचलेलं पहिलं पुस्तक ते होतं चांदोबा. आपण पुस्तक वाचतो म्हणजे आपण जगात डोकावतो. पलीकडच्या व्यक्तीने व्यक्त केलेला अनुभव आपण आपलासा करूनच आयुष्याच्या वाटचालीत काही शिदोरी घेऊन चालत राहतो. चित्रपट माध्यमानं आकर्षित केल्यानंतर त्या माध्यमाला पूरक असणाऱ्या चित्रकला, नाटक, संगीत या कलांच्या सोबत सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची कला राहील.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

मन उलगडायला शिकवले... किती तरी अनोळखी व्यक्तींची, प्रदेशांची, कधीच न बघू शकलेल्या काळाची पुस्तकांनीच ओळख करून दिली. फक्त ओळखच नाही, तर त्या व्यक्तींत, त्या काळात गुंतवून ठेवले. माझी पुस्तकाशी पहिली ओळख कधी झाली, हे नीट आठवत नाही पण बहुधा सुरवात चित्र बघण्यापासून झाली असावी. मग अक्षरओळख, गोष्टींची पुस्तके, हळूहळू कथा-कादंबऱ्या... पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तक आपल्याला काहीतरी देतच असते.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

पुस्तक दिन विशेषांक   पुस्तकांनी तयार केली "पत' तसा दहावी झाल्यावरच पुस्तकांचा संबंध आला. त्याअगोदर व्यंकटेश माडगुळकर यांच्या काही कथा वाचल्या होत्या पण वाचायची खरी गोडी लागली दहावीनंतरच अकरावीसाठी तालुक्‍याच्या गावी गेलो. एक दिवशी गावाकडे येणारी दुपारची एसटी चुकली. पुन्हा तीन वाजता गाडी होती. आता काय करायच? त्या शहरातून फिरायला लागलो. हे फिरण निरर्थकच होतं. काही अंतर गेल्यावर एक वाचनालय दिसलं. पेपर वाचायला मिळंल म्हणून आत गेलो.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

"वारी" पुस्तकांची ""मी जे काही वाचतो ते सगळे माझ्यासाठी लिहिले आहे असेच मला वाटते'' हे प्रसिद्ध वाक्‍य आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांचं. आपण वेगवेगळी पुस्तके वाचतो, त्यातले वातावरण, पात्रे, कथानक, वर्णन केलेला परिसर यात कळतनकळत आपण जोडले जातो. पुस्तकांची खरी गंमत हीच असते. जगाच्या एका कोपऱ्यात बसूनसुद्धा तुम्ही साऱ्या जगाशी जोडले जाता.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: