Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
समय बडा बलवान काळ ही जीवनातली सर्वांत मौलिक गोष्ट असते. जन्मल्याक्षणी प्रत्येकाचा काळ- जगण्याचा कालावधी ठरलेला असतो आणि तो दिवसदिवसानं कमी कमी होत असतो. तो वाढवणं माणसाच्या हातात नसतं. तो उधार उसना घेता येत नाही. तो खात्यावर जमा करून ठेवता येत नाही. जेव्हाच्या तेव्हा त्याचा सदुपयोग करणं हेच माणसाचं उद्दिष्ट असायला हवं. हे ज्यांना कळतं, जमतं ते लोक आयुष्यात काहीतरी कमवू शकतात. गाठीला बांधू शकतात. इतरांचं मात्र श्‍वासावरी आयुष्य सतत जातं.

Monday, April 25, 2016 AT 12:00 AM (IST)

शेणाच्या बाहुल्या स्त्रीने स्वत:च्या संरक्षणासाठी स्वत:च स्थिर व्हावं, कराटे - ज्यूडो - किंवा इतर संरक्षण साधनं आत्मसात करावीत याचा ही पुरस्कार होतो. हे सगळं चांगलंच होतं आहे. याला विरोध करण्याचा प्रश्‍नच नाही. पण, ज्या शरीराच्या आधाराने सारं आयुष्य पेलायचं, सगळी आव्हानं झेलायची ते धडधाकट हवं हे आपण का मान्य करत नाही? तरुणींच्या मनावर का बिंबवत नाही? हा मला प्रश्‍न पडतो.

Monday, April 18, 2016 AT 12:00 AM (IST)

हंगामी कुटुंब... कौटुंबिक नातेसंबंध जेव्हा जपले जातात तेव्हा सर्वात महत्त्वाची असते ती माणसाला आपण कुठेतरी रुजलो असल्याची होणारी जाणीव! कुटुंब समाजाचंच अर्कचित्र असतं, संक्षिप्त रूप असतं आणि कुटुंबाच्या माध्यमातून माणूस कळत-नकळत त्या समाजाशी, त्यातल्या संस्कृतीशी, त्यातल्या प्रचलित भावनांशी - विचारांशी जोडला जात असतो. इंग्रजी शब्द वापरायचा तर "सेन्स ऑफ बिलॉंगिंग'चा अनुभव घेत असतो.

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

जुने राहू द्या आपुल्या जागी ! जो तो माणूस हा आपापल्या काळाचं, समाजाचं उत्पादन असतो. त्याच्या चौकटीत अडकलेला असतो. त्याच्या मर्यादांना बद्ध असतो. काळाच्या फार वेगळं, फार पुढचं बघणं-जगणं क्वचितच कोणाला जमतं, झेपतं. त्यामुळे ज्यावेळी माणसांना समजून घ्यायचं असेल त्या वेळी त्यांचा काळ- स्थिती हे समजून घ्यायला हवं आणि त्या आधारावरच निंदा किंवा स्तुती करायला हवी. ते शक्‍य नसेल तेव्हा भूतकाळाला भूतकाळातच ठेवावं.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

बोल बोल म्हणता... .... बोलताना संयम हवाच विशेषतः सार्वजनिक ठिकाणच्या किंवा जबाबदार पदं भूषवणाऱ्यांनी तरी याचा विवेक सांभाळायलाच पाहिजे. मोजकं बोलणं, नेमकं बोलणं, सावधगिरीनं बोलणं, बोलताना आपली रेघ ओढून घेणं (आणि ती कटाक्षानं पाळणं) याबाबतची पथ्यं पाळलीच पाहिजेत.

Monday, February 29, 2016 AT 12:00 AM (IST)

सॅंटिना'चा धडाका सानिया आणि मार्टिना ही दोन नावे एकत्रित करून तयार झालेल्या "सॅंटिना' या जोडीने सध्या महिला दुहेरी टेनिसमध्ये जबरदस्त यशस्वी धडाका राखला आहे. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडीला हरविणे कठीण बनले आहे. नुकतेच त्यांनी मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब जिंकला. या जोडीचे हे सलग तिसरे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

स्वमदत...स्वस्त मदत?   स्वमदत साहित्याची मदत घ्यायला हरकत नाही, पण तिच्या फार आहारी जाऊन चालणार नाही. कोणालाही, कधीही चार-सहा दिवसांमध्ये अफाट श्रीमंत होता येत नाही, परकी भाषा रातोरात आत्मसात करता येत नाही, अचानक गोरंगोमटं किंवा सडपातळ-बारीक होता येत नाही. व्यसनाचा कायमचा त्याग सहजासहजी करता येत नाही, अशी काही जादूची कांडी वास्तव जीवनात असत नाही हे अटळ सत्य आहे.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

सब घोडे बारा टक्के आजकाल आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जीवनात सर्वत्र सामान्य कुवतीच्या लोकांचीच चलती आहे. सर्वत्र नुसते काजवेच चमचमत आहेत. सूर्याचं "दाहक परी संजीवक' तेज कुठे दिसतच नाही असं म्हटलं जातं. असं होण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे लोकशाही तत्त्वांचा गैरवापर किंवा त्यांना पुरेसं समजून न घेता केलेला वापर. आज कोणतीही निवड आपण फक्त डोकी मोजून करतो आहोत.

Monday, January 11, 2016 AT 12:00 AM (IST)

हसवण्याचा धंदा मार्मिक, अर्थपूर्ण विनोदाला भरभरून, दिलखुलास दाद देऊया. स्वतःवरचा विनोद स्वीकारण्याइतपत दिलखुलास वृत्ती अंगी बाणवूया. व्यक्तिसापेक्ष वृत्तीवर लक्ष केंद्रित करून विनोद करूया आणि याच दृष्टीनं त्याचा स्वीकारही करूया. कशाला हसायचं आणि कशाला हसायचं नाही, याच तारतम्य बाळगूया. शेवटी "विनोदा'त "वि' आहे तसाच "विवेका'तही "वि' आहेच की! विनोद करताना विवेकाचा बळी दरवेळेला द्यायलाच हवा असा काही नियम नाही.

Monday, January 04, 2016 AT 12:00 AM (IST)

कलानंदासाठी दाम मोजायची सवय हवी... जी गोष्ट पदरचे पैसे खर्चण्याच्या लायकीची वाटत नाही, ती मोफत मिळाली म्हणजे तिच्यावर उड्या पडाव्यात हे बरोबर नाही. जे परवडत असेल त्याच्या वाटेला न जाणं समजू शकतं. ते कोणाकडून तरी "चकटफू' मिळावं हा मोह मात्र सोडायलाच हवा. कारण तेवढ्यापुरतं आपण कोणाला तरी त्याचे हक्काचे पैसे नाकारत असतो. त्याचे कष्ट, प्रयत्न यांचा रास्त मोबदला देत नसतो.

Monday, December 28, 2015 AT 12:00 AM (IST)

व्यवस्था आणि अनवस्था आपण एखादी गोष्ट तिच्या नियोजित वेळात घेतली नाही तर केव्हाही, कशीही विकत घेऊ शकतो ही भावना किंवा हा विश्‍वास फार धोक्‍याचा आहे. कारण संपूर्ण भ्रष्टाचार तत्त्वाची बीजं त्यात आहेत.

Monday, December 21, 2015 AT 12:00 AM (IST)

मी... आम्ही... आपण   असे सांस्कृतिक उपक्रम जोरकसपणे चालायला हवे असतील, तर तरुण उत्साही कार्यकर्त्यांच्या फळ्या निर्माण व्हायला हव्यात. आज उलटी स्थिती आहे. तरुण कार्यकर्ते कमीत कमी होत चालले आहेत. अनेक विख्यात उपक्रम रोडावत, थंडावत चालले आहेत. त्यांच्या जागी केवळ व्यापारी हेतूतून निपजणारे नवे उपक्रम येताहेत. त्यातला बटबटीत व्यापारीपणा सांस्कृतिक पर्यावरणाला समृद्ध करण्यातोवर त्यावर आघातच करतोय.

Monday, December 14, 2015 AT 12:00 AM (IST)

माहितीचे बळी सध्याचा काळ माहितीच्या विस्फोटाचा आहे. एकीकडं लोकांकडं पैसा आला आहे, जगभरातल्या माणसांचं परस्पर आदानप्रदान वाढलं आहे. माध्यमक्रांतीमुळं अष्टौप्रहर माहिती ओकणारी माध्यमं सहज उपलब्ध आहेत. साहजिकच सरासरी माणसांचाही माहितीचा "स्टॉक' किंवा साठा वाढलेला आहे. कधी कधी प्रश्‍न पडतो एवढ्या माहितीची गरज आहे का? मला दररोज नातवंडांच्या सहवासाचं सुख मिळत नाही. ती आपापल्या आईबापांबरोबर आपापल्या गावी राहात असतात. थोड्या-थोड्या काळानं मला भेटतात.

Monday, December 07, 2015 AT 12:00 AM (IST)

सकाळ साप्ताहिक .... ज्याचे त्याला यथायोग्यसे... ज्याचं त्याला त्याच्या कामाचं श्रेय देणं किंवा एखाद्या गोष्टीची योग्य वेळी दाद देणं, खूप महत्त्वाचं असतं. मात्र, या दोन्ही गोष्टी आपल्याकडून घडत नाहीत. पैसा आणि प्रसिद्धी याबाबत आपल्याकडं अकारण अनास्था आहे. त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. दाद खैरातीसारखी वाटली की एकतर ती खोटी तरी वाटते, किंवा तिचं अवमूल्यन तरी होतं.

Monday, November 23, 2015 AT 12:00 AM (IST)

न ऐकणारा समाज हल्ली आपल्यामध्ये कोणीही, कोणाचंही, काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. इथं कानांच्या क्षमतेबद्दल काही म्हणायचं नाही, तर मानसिक तयारीकडं निर्देश करायचा आहे. आपण "न ऐकणारा समाज' बनत चाललेलो आहोत. आजच्या आपल्या समाजाचं एक व्यवच्छेदक लक्षण तुमच्या लक्षात आलंय का? आपण "न ऐकणारा समाज' बनत चाललेलो आहोत. आपल्यामध्ये कोणीही, कोणाचंही, काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

किंमत आईपणाची ! सरासरी बायकांचं जीवन वेगानं बदलतंय. आयाम व्यापक होताहेत. बायकांना घरसंसार हवा असला तरी त्यापलीकडच्याही खूप गोष्टी खुणावताहेत. त्या मिळवता येतील अशा दृष्टीने त्या स्वतःला सज्ज करताहेत. शिक्षण, अर्थार्जन, आहार-विहाराचं स्वातंत्र्य, अद्ययावत, वैचारिक मोकळेपणा, नव्याबाबत स्वागतशीलता यांनी आजच्या पुष्कळ बायका स्वतःच्या जगण्याची गुणवत्ता वाढवायला निघालेल्या आहेत.

Sunday, October 25, 2015 AT 12:00 AM (IST)

आधुनिकतेचं चांगभलं! मंगला गोडबोले  आधुनिकता ही फॅशन असू शकत नाही. ते एक मूल्य आहे. आज जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रतिगामी शक्तीसारखं डोकं वर काढताहेत, आज जेव्हा पुनरुज्जीवनवादी प्रवृत्ती संधी मिळताच उफाळून येताहेत, तेव्हा विचारी माणसांना आधुनिकतेची खिंड जास्तच जबाबदारीने लढवायला हवी आहे, असं मात्र वाटतं. फक्त ती आधुनिकता खरी आणि प्रत्यक्ष आचरण व विचारांमधली असावी.

Sunday, October 18, 2015 AT 12:00 AM (IST)

जो देखा सो रोटीमें.. . बहुतेक माणसांच्या आयुष्यामधली "राहून गेलेल्या गोष्टीं'ची यादी वाढत जाते. नाच, गाणं, लेखन, रंगभूमी, चित्र, शिल्प, वाद्यवादन, पर्यावरण, पक्षिनिरीक्षण, समाजकारण, संस्थात्मक कार्य अशा गोष्टींपैकी काही ना काही प्रत्येकाला अधूनमधून खुणावत असतं. पण दर वेळेला अधिक तात्कालिक महत्त्वाच्या गोष्टी अग्रक्रमानं करत राहाव्या लागतात आणि मनाचा स्वाभाविक कल काहीसा दुर्लक्षावा लागतो.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

यंत्रशरण आपण...!   मानवाची उदंड प्रगती होत असताना त्याच्या नैसर्गिक क्षमतांचा ऱ्हास अनेकांना घातक वाटतो. नैसर्गिक अशी कौशल्यं ही त्यामागोमाग कमी होतात. ही वाढती यंत्रशरणताच आहे. मग ते पारंपरिक पद्धतीनं हातशेवया बनवणं असो. दिवाळीसाठी मातीची चित्र बनवणं असो किंवा ध्वनिवर्धकाशिवाय पाचशे हजार श्रोत्यांना खणखणीत आवाजात पोवाडा ऐकवणं असो. यंत्रामधील प्रगती ही एका अर्थाने मानवी जीवनातलीच प्रगती आहे.

Sunday, October 04, 2015 AT 12:00 AM (IST)

जॅक ऑफ ऑल? सर्वसाधारण माणूस आयुष्यात उपजीविकेच्या कामाखेरीज फारतर एक-दोन क्षेत्रांमध्ये थोडाफार लुडबुडू शकतो, जगण्याचा संघर्ष इतका तीव्र असतो की दैनंदिनीच्या चक्राबाहेर कला-छंद-आवड यांच्यासाठी थोडाच वेळ आणि शक्ती उरते. अनेकदा ती कठोर परिश्रमानं काढावी लागत असते.

Sunday, September 27, 2015 AT 12:00 AM (IST)

खांद्याला खांदा... ज्याच्यापाशी पक्‍का मनोनिग्रह असतो, तो माणूस कधीच कोणत्याच व्यसनाच्या आहारी जात नाही. पण, जे मनाने दुबळे असतात चटकन नावीन्याच्या, बदलाच्या आहारी जाणारे असतात किंवा आंधळा विश्‍वास टाकणारे असतात, त्यांच्याबाबतीत व्यसनासाठीचं आमत्रंणच अधोगतीचं ठरू शकतं.  बायकोला व्यसन आवडत नसेल किंवा ती विचारपूर्वक त्यापासून दूर राहात असेल, तर ते पतिराजांना स्वीकारणं जड जातं.

Sunday, September 06, 2015 AT 12:00 AM (IST)

आरोग्यम्‌ धनसंपदा ! मंगला गोडबोले  प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे "युनिक' असतं. त्याला एकगठ्ठा केलेलं निदान किंवा औषधोपचार चालेलच याची खात्री नसते. अशावेळी मनाने उपचार करण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं, तो समजून घेऊन त्याचं कठोर शास्त्रोक्त पालन करणं, त्याला लागणारा वेळ देणं आणि हे सगळं विश्‍वास ठेवून करणं हाच मार्ग असू शकतो. आज अनेक लोक अहंकारापोटी, फाजील आत्मविश्‍वासापोटी, घाईगडबडीपोटी किंवा केवळ बेदरकारपणे हा मार्ग धरत नाहीत.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

शिक्षणाच्या नावाने.... बालवयापासून एखादं मूल घर सोडून शाळेत जातं, त्याला असंख्य-अनोळखी व्यक्तींशी नानाप्रकारे जुळवून घ्यावं लागतं, त्यांचे जीवनव्यवहार आपल्याहून वेगळे असणं स्वीकारावं लागतं या सगळ्यामध्ये मुलाचं सोशलायझेशन ः सामाजिकीकरण होत असतं, जे समाजात जगण्यासाठी अतिशय आवश्‍यक असतं. या बाबी होमस्कूलिंग कसं देणार हा प्रश्‍न पडतो. साक्षरतेचं देशातलं प्रमाण सातत्याने वाढतंय, अगदी लहानातल्या लहान गावातही प्राथमिक शिक्षणाची सोय आहे.

Saturday, August 08, 2015 AT 12:00 AM (IST)

शिक्षणाच्या नावाने....  आपली शिक्षणपद्धती चुकीची आहे, घातक आहे, विद्यार्थ्यांचा वेळ आणि शक्ती वाया घालवणारी आहे असं मानण्याची, म्हणण्याची सध्या मोठी लाट आलेली आहे. वृत्तपत्रीय लेखांमध्ये, सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये या भावनेला वाट करून दिलेली आढळते. या शिक्षणपद्धतीचा बळी ठरलेल्यांच्या हृदयद्रावक कहाण्या सांगितल्या जातात, ज्या सत्य असतात.

Monday, July 27, 2015 AT 12:39 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: