Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
पनीरचा गोडवा अंगुरी रसमलाई साहित्य रसगुल्ले : प्रथम गाईच्या दुधाचे घरी बनवलेले पनीर वापरून लहान आकाराचे रसगुल्ले बनवून घ्यावेत. साहित्य दुधासाठी : 1 लिटर म्हशीचे दूध, 3 टे. स्पून मिल्क पावडर, 4 टे. स्पून साखर, अर्धा टे. स्पून कॉर्न फ्लोअर, अर्धा टे. स्पून मिल्क मसाला कृती : दूध गरम करून दहा मिनिटे उकळवून घ्यावे. मग त्यामध्ये साखर, मिल्क पावडर, कॉर्न फ्लोअर, मिल्क मसाला घालून परत दूध पाच मिनिटे उकळवून घ्यावे.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

सुटीतील चटपटीत खाणे परीक्षा संपल्या. उन्हाळ्याची सुटी सुरू झाली. शाळा नाही. अभ्यास नाही. आता नुसती धमाल! दिवसभर मुलांची मौजमस्ती झाल्यावर त्यांना सडकून भूक लागणारच. अशा वेळी बाहेरचं "जंकफूड' खाण्यापेक्षा घरी त्यांना काही तरी छान चटपटीत पदार्थ बनवून द्यायला हवेत. मुलांना व मोठ्यांनाही आवडणारा खास पदार्थ म्हणजे "चाट.' भेळ, पाणीपुरी, चाट अशी नुसती नावे उच्चारली तरी तोंडाला पाणी सुटते.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

मुलांचे कुकिंग पूर्वीच्या तुलनेत आज-काल आपण खाण्या-पिण्याचा खूप विचार करतो, खाण्याबद्दल बोलतो आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खातोही. याबरोबरच विविध वाहिन्यांवरचे रेसिपी शोज, पुस्तकं, स्पर्धा, ब्लॉग्ज आणि मासिकांमधूनही खाण्याबद्दल पाहतो, ऐकतो, वाचतो. या सगळ्यांमुळे आज-काल मुलांनाही खाण्याबद्दल आवड निर्माण होते आणि स्वतः बनवून खावंसं वाटतं.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

थंडा थंडा कुल कुल 1) मिल्क शिकंजी साहित्य ः दोन ग्लास दूध, अर्धी वाटी घट्ट दही, 5-6 पिस्ते, 1 चमचा वेलची पावडर, क्रश केलेला बर्फ, केशर, साखर चवीप्रमाणे. कृती ः चांगल्या प्रतीचे दूध घेऊन ते गरम करायला ठेवावे. थोडे आटवावे. मग त्यात 3 चमचे साखर घालून ढवळावे. केशराच्या 3-4 काड्या घालून गार करावे. मग ते मिक्‍सरच्या भांड्यात घालावे. त्यात दही, वेलची पावडर घालून ढवळुन घ्यावे. क्रश केलेला बर्फ व पिस्ता काप घालून थंड करून ही शिकंजी सर्व्ह करावी.

Monday, April 25, 2016 AT 12:00 AM (IST)

शाही बिर्याणी साहित्य ः चांगल्या प्रतीचे बासमती तांदूळ अर्धा किलो, चिकन अर्धा किलो, तेल 100 ग्रॅम, साजूक तूप 50 ग्रॅम, सायीचे दही 1 वाटी, कांदे अर्धा किलो उभे पातळ चिरून, लसूण दोन मोठे, आले 4 इंच, हिरवी मिरची 4 नग,आले, लसूण, मिरची यांची पेस्ट, लाल तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा, मीठ 4 चमचे, मोठे जिरे 4 चमचे, शाहिजिरे 2 चमचे, तमालपत्र 4 नग, वेलदोडे 4, टोमॅटो 2 नग, गरम मसाला 2 चमचे, पुदिना 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी.

Monday, April 18, 2016 AT 12:00 AM (IST)

फूड पॉइंट उन्हाळ्यात आरोग्याला पोषक, ताजेतवाने करणारे पदार्थ सुनीता मिरासदार उन्हाळा आला की थंड पदार्थ, शीतपेयांची गरज भासू लागते. बाजारात मिळणाऱ्या थंड खाद्यपदार्थांपेक्षा घरी ताजी फळे, दूध, दही, ताक, काकडी, टोमॅटो यांसारखे पदार्थ नाचणी, सोयाबीनसारख्या धान्यांपासून बनवलेले पदार्थ जास्त पौष्टिक, स्वादिष्ट आणि आरोग्यास लाभदायक असतात.

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

कैरीचे पन्हे व डाळ गुढीपाडवा - आपल्या नववर्षाचा पहिला दिवस. आता चैत्र महिना सुरू. चैत्रात "हळदीकुंकू' करण्याची प्रथा आहे. त्यासाठी कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हवीच! या दिवसांत कैरी व हरभराडाळ यापासून अनेक पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. म्हणून या दोन पदार्थांच्या पारंपरिक पाककृती देत आहे. भरपूर "क' जीवनसत्त्व असलेली कैरी बाजारात दिसू लागली, की गृहिणीला अत्यानंद होतो.

Monday, April 04, 2016 AT 12:00 AM (IST)

होळी स्पेशन महाराष्ट्रात होळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. लहान मुले व मोठेसुद्धा होळी सण साजरा करण्यात उत्साही असतात. तसेच विशेष म्हणजे महिला पुरणपोळ्या बनवण्यात उत्साही असतात. जर आपण पुरणपोळीऐवजी दुसऱ्या विविध प्रकारच्या पोळ्या बनवल्या, तर एक वेगळेपण येईल. जरा वेगवेगळ्या पोळ्या व पराठे करू बघा. घरी सर्वांना नक्की आवडतील. आंब्याच्या पोळ्या आंब्याच्या पोळ्या हा एक पक्वान्नाचा प्रकार आहे. आपण नेहमीच पुरणपोळ्या बनवतो.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

चमचमीत आणि ऑफबीट 1) झटपट इराणी गुलाबजाम साहित्य ः एक वाटी खवा, काजू, बदाम, पिस्ता तुकडे 3 चमचे, अर्धा चमचा वेलची पावडर, 5 ब्रेड स्लाइस, तूप, 2 वाट्या एकतारी तयार पाक (दीड वाटी साखर, एक वाटी पाणी घालून), पिस्ता काप, केशर. कृती ः खवा किसून घ्यावा. त्यात काजू, बदाम, पिस्ता तुकडे घालावे. वेलची पावडर, केशर घालून मिक्‍स करावे. ब्रेडचे गोल तुकडे करून घ्यावे. ते दुधात बुडवून हाताने जरा दाबून कोरडे करावे.

Sunday, March 20, 2016 AT 12:00 AM (IST)

महाशिवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ माघ महिन्यातल्या शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात. या दिवशी लहान-थोर सर्वांना उपवास असतो. अनेक जण या दिवशीच्या उपवासाला वरईचे तांदूळ खात नाहीत. त्यामुळे साबुदाणा, रताळे, बटाटा व अन्य उपवासाचे पदार्थ फराळाकरिता बनवले जातात. असेच काही पदार्थ, काही जण उपवासाला कोथिंबीर खात नाहीत. त्यांनी ते वापरू नयेत.

Monday, March 07, 2016 AT 12:00 AM (IST)

  हलव्याचे खास प्रकार   गोड पाककृती प्रकार 1 ः खापुरी हलवा ः साहित्य ः खापुरीसाठी साहित्य ः 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी मैदा वा कणीक, 4 मोठे चमचे मोहनसाठी तूप, किंचित मीठ, तळणीसाठी तूप वा तेल. हलव्यासाठी साहित्य ः 1 वाटी रवा, 1 वाटी साखर (आवडीप्रमाणे घ्यावी), अर्धा चहाचा चमचा वेलची पूड, पाऊण वाटी तूप, 1 वाटी दूध, सुकामेवा ऐच्छिक. कृती ः रवा व मैदा चाळून एकत्र घ्यावा.

Monday, February 29, 2016 AT 12:00 AM (IST)

मटारच्या रेसिपीज 1) मटार उसळ ः साहित्य ः 4 वाट्या मटारचे दाणे, एक वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुऊन, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य, लिंबाएवढा गूळ, कढीपत्ताची 10 ते 12 पाने. कृती ः प्रथम चार वाट्या मटार उकळत्या पाण्यात घालून 5 ते 7 मिनिटे राहू द्यावेत.

Monday, February 15, 2016 AT 12:00 AM (IST)

जॅमच्या रेसिपीज 1) स्ट्रॉबेरी मोहितो साहित्य ः 200 ग्रॅम स्ट्रॉबेरीज, एक हिरवी मिरची, 5-6 पुदिना पाने, अर्धी वाटी साखरेचा पाक, 2-3 बर्फाचे खडे, सोडा वॉटर. कृती ः स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून देठ काढून एकाच्या चार फोडी कराव्यात. 2-3 स्ट्रॉबेरीज न चिरता सजावटीसाठी ठेवाव्यात. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करावेत.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

पूजा दळवी   मैद्यापासूनच केक ही संकल्पना बाजूला सारून नाचणी, गव्हाचे पीठ आणि विविध फळे यांच्यापासून बनवलेल्या केकच्या काही खास रेसिपीज झटपट नाचणी केक - रागी केक साहित्य ः नाचणी पीठ - 100 ग्रॅम पिठी साखर - 150 ग्रॅम अमूल बटर - 100 ग्रॅम अंडी - 2 बेकिंग पावडर - अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेन्स - अर्धा टी स्पून कृती ः - केक टीनला बटरने ग्रिसिंग करून घ्यावे. - कमी गॅसवर बटर मेल्ट करून थंड करा.

Monday, January 04, 2016 AT 12:00 AM (IST)

भाताचे प्रकार लेमन राईस साहित्य ः तांदूळ 2 वाटी, लिंबू रस 2।4 टे. स्पू., हळद 1 टे.स्पू., चणाडाळ- 2 टे.स्पू., उडदाची डाळ 1 टे.स्पू., लाल मिरची 3।4, मोहरी 1 टे.स्पू., तेल, मीठ चवीप्रमाणे, कडीपत्ता 8-10 पाने. कृती ः तांदळाचा भात शिजवून घेणे. मग मोकळा करून बाजूला ठेवणे, तेलात मोहरी, हरभरा डाळ (चणा डाळ), उडदाची डाळ लालसर करणे, मग लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हळद भात घालून परतणे, त्यात मीठ, लिंबाचा रस घालून परतणे, मग लगेचच सर्व करणे.

Monday, December 21, 2015 AT 12:00 AM (IST)

अंड्यांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ अंड्याचे सॅंडविच ः अंड्याचे सॅंडविच हे नाश्‍त्याला बनवता येते किंवा सायंकाळी चहाबरोबरसुद्धा करता येते. अंड्याच्या सॅंडविचमध्ये अंडे उकडून, ते कुस्करून त्यामध्ये मिरेपावडर, मीठ व बटर मिक्‍स करून ब्रेडला लावले आहे. हे सॅंडविच आपल्याला लहान मुलांना डब्यातसुद्धा देता येते किंवा कुठे ट्रिपला जाताना बरोबर न्यायलासुद्धा छान आहे, तसेच यामध्ये मिरेपावडर वापरली आहे, त्यामुळे चवही छान येते.

Monday, December 07, 2015 AT 12:00 AM (IST)

कोशिंबीर 1) चणाडाळ व काकडीची कोशिंबीर ः अर्धी वाटी चण्याची डाळ तीन-चार तास पाण्यात भिजवा. मऊ झालेली डाळ मिक्‍सरमधून ओबडधोबड वाटा. त्यात लहान आकाराच्या तीन काकड्या चिरून घाला. हिंगाची फोडणी देऊन त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर घाला. 2) तोंडल्याची कोशिंबीर ः 500 ग्रॅम तोंडली, दाण्याचे कूट 6 टी-स्पून, 4 टी-स्पून नारळाचा चव, 1 लिंबाचा रस, मीठ - साखर स्वादानुसार, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर.

Sunday, November 29, 2015 AT 12:00 AM (IST)

डेव्हिल्स पोस्टपाईल ः नैसर्गिक स्तंभशिल्प युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सिएरा नेवाडा पर्वतरांगांमध्ये लपलेली खडकांची स्तंभीय निसर्गशिल्पे म्हणजे "डेव्हिल्स पोस्टपाईल' हे ठिकाण आहे. या देशात एकूण 380 राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांपैकी हे एक अगदी लहान म्हणावे असे "नॅशनल मॉन्युमेंट' गटातील स्थळ आहे. जरा आडवाटेला असले तरी बघायचेच, असे ठरवून आम्ही तेथे गेलो आणि त्याचे सार्थक झाले असे वाटले.

Monday, November 23, 2015 AT 12:00 AM (IST)

गोडाच्या रेसिपीज अधिक मास व श्रावण मासात तिखट व गोडाच्या रेसिपीज आवर्जून केल्या जातात. प्रकार नं. 1 ः सीकेपी निनावे साहित्य ः 2 वाट्या भरड म्हणजे जाडसर दळलेले बेसन (बाजारात लाडूसाठी मिळणारे बेसन मिळते.), 1 वाटी गव्हाचे कणी असलेले पीठ, तूप 4 ते 5 चमचे फक्त, बेसनासाठी व 3-4 चमचे तूप गव्हाच्या पिठासाठी, 2 वाटी बारीक केलेला गूळ, साडेतीन वाट्यांचे नारळाचे दूध, वेलची. कृती ः प्रथम दोन्ही पिठे तुपात वेगवेगळी खरपूस भाजावीत.

Monday, November 23, 2015 AT 12:00 AM (IST)

खाद्यपदार्थांमधील विविधता सविता कुर्वे लीड : संपूर्ण भारतात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांमध्ये जशी विविधता आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक सणाला केल्या जाणाऱ्या पक्वान्नांमध्येही वैविध्य आहे. प्रत्येक सणाचे म्हणून एक पक्वान्न ठरलेले असते. काही ठिकाणी तर गोडाबरोबरच तिखट पदार्थाचाही नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. सणासुदीच्या निमित्ताने हे काही पदार्थ.

Sunday, October 18, 2015 AT 12:00 AM (IST)

फूडपॉइंट रसरशीत आणि चवदार प्रीती खुपेरकर पाहूनच खावेसे वाटतील, असे रसरशीत पदार्थ तितकेच चवदारही असतील तर मग दुधात साखरच! आरोग्याला हानी न पोचवता रसनातृप्ती करणारे हे काही रसरशीत, चवदार आणि लो कॅलरी पदार्थ. * राजगिऱ्याच्या पोळ्या साहित्य : 1/2 किलो राजगिरा, 1 चमचा साखर, 1/4 वाटी दूध कृती : राजगिरा निवडून दळून आणावा. दोन ते तीन वाट्या राजगिरा पीठ घेऊन त्यात साखर व दूध घालावे.

Sunday, October 04, 2015 AT 12:00 AM (IST)

गोड पदार्थ   सणासुदीचे दिवस आहेत. त्या निमित्ताने पारंपरिक मिष्टान्नांबरोबर गोडाधोडाचे नावीन्यपूर्ण पदार्थही करून पाहायला हवेत. त्यासाठी या काही पाककृती. * फ्रूट चंक्‍स साहित्य : 1 सफरचंद, 1 अननस, 1 केळे, 1 चिकू, 1 वाटी कॉर्नफ्लेक्‍स, 1/4 वाटी तीळ, 1/4 वाटी सुके किसलेले खोबरे, 2 टी स्पून तेल किंवा तूप, मध. कृती : एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करावे. त्यात तीळ व खोबरे मंद आचेवर भाजून घ्यावे.

Sunday, September 27, 2015 AT 12:00 AM (IST)

नारळाचे पदार्थ ममता कळमकर * हरियाली खवा व नारळ बर्फी साहित्य : 1 कप ओले खोबरे, 5-6 चमचे तूप, 150 ग्रॅम हिरवा खवा, 1/2 कप पिस्ता पावडर, 1/2 चमचा हिरव्या वेलचीची पावडर, 2 चमचे साखर, सजावटीसाठी चांदीचा वर्ख - 2 नग, 2 ग्रॅम केशर, 1 चमचा बदामाचे पातळ काप कृती : जाड बुडाच्या भांड्यात खवा, तूप व खोबरे घेऊन मंद आचेवर 10 ते 12 मिनिटे परतावे. त्यामध्ये वेलची व पिस्ता पावडर घालून मिश्रण आणखी 2 मिनिटे ठेवावे.

Sunday, August 30, 2015 AT 12:00 AM (IST)

पर्यटन - सह्याद्रीच्या कुशीतील शिवालये ओंकार वर्तले लीड : श्रावणातील पर्यटन म्हणजे आनंदपर्वणीच. हिरवाई आणि विविधरंगी फुलांचे आच्छादन घेतलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत, अनवट ठिकाणी असलेली शिवालये सर्वच पर्यटकांना भुरळ घालतात. शांतता आणि पावित्र्य यांचा अनोखा संगम अशा ठिकाणी पहायला मिळतो. श्रावण..

Sunday, August 30, 2015 AT 12:00 AM (IST)

रेसिपी माझी पौष्टिक आणि चवदार छाया बोराटे  एखादा पदार्थ अधिक चांगला दिसण्यासाठी त्यामध्ये खाण्याचा कृत्रिम रंग वापरतात. पण काही वेळेस कृत्रिम रंग न वापरताही पदार्थाला रंग मिळू शकतो. पदार्थांना नैसर्गिक रंग देणारे घटक पदार्थाला अधिक पौष्टिक बनवतात.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

फूडपॉइंट स्वयंपाक झाला सोपा... जानकी कुलकर्णी-नाईक आधुनिक काळातील स्वयंपाकघर सर्व साधनांनी सुसज्ज असते. आधुनिक साधने वापरल्याने स्वयंपाक करणे सोपे होते. गृहिणींच्या पसंतीचे एक आधुनिक साधन म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. ओव्हनमुळे केक, बिस्किटे, पिझ्झा यांसारखे पदार्थ घरच्या घरी तयार करणे सहज शक्‍य होते. स्वयंपाकघरात ओव्हनला महत्त्वाचे स्थान मिळालेले असले तरी ज्या घरांमध्ये ओव्हन नाही, तेथे हे लज्जतदार पदार्थ करता येणारच नाहीत, असे नाही.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

चमचमीत पदार्थांचा "पाऊस'  ओल्या मातीचा सुगंध अनुभवण्यासाठी.. चिंब, चिंब भिजण्यासाठी... लिंबू, मसाला लावलेले चटपटीत कणिस खाण्यासाठी... अशा अनेक कारणांसाठी आपण सारे पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. बाहेर मस्त पाऊस पडत असावा आणि घरात चमचमीत पदार्थ केले जावेत, असे पावसाळ्यात प्रत्येकालाच वाटते.

Saturday, July 25, 2015 AT 01:21 PM (IST)

आवळा चवीला तुरट पण शरीरासाठी अत्यंत औषधी समजला जातो. थंडीत त्वचेसाठी तो पोषक असतो, तर अन्न पचनासाठीही तो चांगला असतो. आवळा नुसता खाण्यासाठी अधिक तुरट लागतो म्हणून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा आहारात समावेश करता येऊ शकतो. आवळ्याचे जीवन साहित्य ः अर्धा किलो चांगले मोठे रसरशीत डोंगरी आवळे, पाऊण ते एक किलो साखर, पाव किलो चांगला शुद्ध मध व पन्नास ग्रॅम सितोपलादी चूर्ण. कृती ः प्रथम आवळे दोन तास पाण्यात भिजत ठेवावेत.

Saturday, December 28, 2013 AT 12:00 AM (IST)

मोगलाई डिशेश सर्वांनाच आवडतात. हे पदार्थ सर्वप्रथम हैदराबाद येथे, मग लखनौ व काश्‍मीर येथे पसरले. आता भारतभर लोकप्रिय झाले आहेत. मांसाहारी पदार्थांबरोबर शाकाहारी डिशेसही लोकप्रिय झाल्या. या डिशेस बनवायला फार वेळ व खर्चही येतो. त्याच डिशेश आपण जर सोप्या व कमी खर्चात बनवल्या तर छानच होईल. शाही तुकडा साहित्य ः 5 ब्रेड स्लाइसेस, अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी साखर, एक छोटा चमचा वेलची पावडर, 7-8 काजू-पिस्ता (पातळ तुकडे करून), तूप.

Saturday, December 28, 2013 AT 12:00 AM (IST)

मोड आलेली मेथी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. विशेषतः मधुमेहाच्या आजारात, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ही मेथी उपयुक्त ठरू शकते. वजनाची चिंता असणाऱ्यांना मोड आलेल्या मेथीचे पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ खाऊन काही जणांना आपल्या वाढणाऱ्या वजनाची, ब्लडशुगर आणि कोलेस्टेरॉलची काळजी वाटू लागली असेल. यावर एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे मेथी. मेथीचे लाडू बाळंतिणीला देतात.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: