Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
ग्रहमान मेष ः तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायातील कामात आलेल्या अडथळ्यांना पार करून, वेळप्रसंगी धोका पत्करून पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. कामात नवीन पद्धतीची योजना कार्यान्वित करण्याचा मानस असेल. कामांना योग्य तो प्रतिसाद मिळेल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. नोकरीत स्पर्धेत सहभागी व्हाल व यश मिळवाल. वरिष्ठ सहकाऱ्यांची मर्जी राहील. घरात प्रतिष्ठा वाढवणारी खरेदी होईल. वातावरण आनंदी राहील.

Monday, December 12, 2016 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 3 ते 9 जुलै 2016 सौ. अनिता सं. केळकर मेष ः ग्रहांची मर्जी तुमच्यावर असल्याने यशाची चढती कमान अनुभवता येईल. सर्व आघाड्यांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामानिमित्ताने नवे संबंध जोडले जातील. पैशाची चिंता मिटेल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाच्या स्वरूपात व जागेत बदल होण्याची शक्‍यता आहे. घरात समारंभामुळे आनंद मिळेल. पाहुण्यांची सरबराई करावी लागेल.

Monday, July 04, 2016 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 19 ते 25 जून 2016 सौ. अनिता सं. केळकर मेष ः कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याचा मानस राहील. व्यवसायात आर्थिक दृष्टीने सप्ताह महत्त्वाचा आहे. अपेक्षित पैसे हातात पडून अत्यावश्‍यक देणी देता येतील. पण, नेहमीच्या कामातून तुमची सुटका होणार नाही, तरी कार्यमग्न राहा. नोकरीत कामाचा व सोयी-सुविधांचा आस्वाद घेता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग व नवीन ओळखी होतील. घरात शुभ समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्ट भेटतील.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 22 ते 28 मे 2016 मेष ः मंगळाची साथ राहील. अडथळ्यांची शर्यत संपून यशाकडे वाटचाल राहील. व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल. सामंजस्याची भूमिका घेऊन प्रश्‍न मार्गी लावतील. नव्या योजनांना योग्य दिशा मिळेल. कामाचा व्याप व विस्तार वाढवण्यावर भर राहील. नोकरीत नवीन कामाबाबत सूतोवाच होईल. वरिष्ठ त्यासाठी जादा अधिकार व सवलती देतील. स्पर्धक व हितशत्रूंपासून सावध राहा. घरात मंगलकार्य ठरेल. सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव घ्याल.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 8 ते 14 मे 2016   मेष ः तुमची मनीषा जागृत होईल व धडाडीने प्रगती कराला. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवीन गुंतवणुकीचे पर्याय खुले होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत सहकाऱ्यांवर कामाचे बाबतीत विसंबून राहू नका. विनाकारण कामे लांबतील. बोलताना जरा जपून. वादविवाद टाळा. घरातील व्यक्तींकडून मोलाचे सहकार्य मिळेल. आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी अतिविश्‍वास टाळावा.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 10 ते 16 एप्रिल 2016  मेष ः ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात पैशाअभावी थांबून राहिलेली कामे मार्गी लागतील. हातातील पैशांचा विनियोग विचारपूर्वक करावा. हितचिंतकांची साथ उपयोगी पडेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामानिमित्ताने जास्त सवलती मिळतील, त्याचा लाभ घ्या. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई चांगली होईल. महिलांना घरातील व्यक्तींची उत्तम साथ मिळेल.

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

27 मार्च ते 2 एप्रिल 16 मेष ः "रात्री थोडी सोंगे फार' अशी स्थिती तुमची असेल. तेव्हा थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात अनुकूल घटना उत्साह वाढवतील. कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून यशश्री खेचून आणाल. पैशांची स्थिती समाधानकारक असेल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. दुसऱ्यांवर विसंबून राहू नका. वेळेचे बंधन ठेवून कामाचा उरक ठेवा. घरात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

हो जीवन विकास आपल्याकडे "नावे ठेवण्याचे' आणि "ओळखण्याचे' लोण येऊन ठेपले आहे. झाडे, पक्षी, किडे ओळखण्याची जशी काही अहमहमिका चालू असते. नाव कळले, की धन्य धन्य वाटते. परंतु, केवळ नावे सांगण्यात एक पोकळपणा आहे. एकूणच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याबाबतीत गांभीर्य हवे. "हे तुझे प्लॅस्टिकचे खेळणे कशाने चालते सांग पाहू?' "बाबा, मी ते उघडून बघितले आहे. त्याला किल्ली दिली की आतले भाग हलतात, स्प्रिंग चालू लागते आणि मग हे कुत्रे चालते...' "अं...

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

स्लिम दिसण्यासाठी हायवेस्ट पॅंट ऑफिस पार्टी, कॉलेजमध्ये गेल्यावर सर्रास मुली जीन्स- पॅंट, स्कर्ट अशा पेहरावात दिसतात. यामध्येच आता आणखी एक प्रकार आला आहे, तो म्हणजे हायवेस्ट पॅंट. फॅशन आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टी हायवेस्ट पॅंटचे वैशिष्ट्य आहे. या ट्रेन्डविषयी.... - फॅशनविश्‍वात केवळ बोल्ड कपड्यांची चलती असते असा काहींचा गैरसमज असतो, मात्र याशिवायही फॉर्मल वेअर्समध्ये काही कलेक्‍शन आले आहे, त्यापैकी एक प्रकार म्हणजे हायवेस्ट पॅंट.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर   मेष- महत्त्वाचे ग्रह शुभ असल्याने चांगली घटना घडेल. अडचणींवर मात करण्याची जिद्द निर्माण होईल. व्यवसायात नव्या उमेदीने कामास लागाल. नवीन योजना आखाल. पैशाची चणचण दूर करण्यासाठी प्रयत्न केलात तर यश येईल. नोकरीत कामात गुप्तता राखा. तुमचे विचार मांडताना सभोवतालच्या व्यक्तींची विश्‍वासहर्ता तपासून बघा. शेवटी त्यावर तोडगा निघेल. घरात तडजोडीने कामे मार्गी लागतील. प्रकृतीची काळजी घ्या.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

ग्रहमान 1 ते 7 ऑगस्ट मेष - महत्त्वाच्या ग्रहांची साथ लाभेल. बोलण्यातून विशेष लाभ होतील. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलाल. नशिबाची साथ मिळेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी महत्त्वाची कामे सोपवतील. जादा सवलती व अधिकारही देतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. कौतुकास पात्र काम हातून घडेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. वृषभ - महत्त्वाची कामे हाती घेऊन पूर्ण कराल.

Monday, July 27, 2015 AT 04:55 PM (IST)

मेष ः ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात कामाची आखणी करून त्याप्रमाणे वेळेचे नियोजन कराल. कामानिमित्ताने नवीन व्यक्तींशी संपर्क साधाल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कामात बेधडकपणा टाळा. स्वतःची मर्यादा ओळखून काम करा. घरातील व्यक्तींच्या सुखसमाधानासाठी तत्पर राहाल. आवश्‍यक तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ ः या सप्ताहात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचा प्रयत्न राहील.

Tuesday, November 04, 2014 AT 07:34 PM (IST)

मेष ः यशाची झालर चाखता येईल. व्यवसायात प्रसिद्धी माध्यमांचा वापर करत नवीन योजना हाती घ्याल. कामामुळे विक्री व उलाढाल वाढेल. पैशाची तात्पुरती चणचण भासेल परंतु ओळखीचा उपयोग होऊन सोय होईल. नोकरीत अपार मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल. वरिष्ठांना तुमच्या कामाची जाण असेल. त्यामुळे एखादी सवलत देण्यास ते तयार होतील. जोडधंद्यात मात्र उधार-उसनवार शक्‍यतो टाळा. घरात इतर व्यक्तींच्या दुटप्पी वागण्याचा राग येईल, तरी डोके शांत ठेवा.

Saturday, June 28, 2014 AT 05:28 PM (IST)

मेष ः सध्या तुम्हाला ग्रहांची साथ आहेच, त्यामुळे तुमचा दृष्टिकोन आशावादी राहील. व्यवसायात तुमचा कामाचा उत्साह प्रचंड असेल. नवीन योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नशील राहाल. नोकरीत तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नवीन ओळखीतून अनेक लाभ होतील. प्रगतीचा आलेख चढता राहील. गृहिणींना मनाप्रमाणे वागता येईल. घेतलेले निर्णयही अचूक येतील. कुटुंबासमवेत प्रवासयोग संभवतो.

Saturday, April 26, 2014 AT 12:00 AM (IST)

मेष ः या सप्ताहात तुम्हाला निश्‍चयाने मार्गक्रमण करायचे आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्याही मोहाला न बळी पडता कामाचे नियोजन करा. व्यवसायात नवीन कामे मिळतील. हितचिंतकांच्या मदतीने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. वरिष्ठांची मर्जी राहील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल, त्यासाठी विशेष सवलत मिळेल. बेकारांना नवीन नोकरी मिळण्याची संधी चालून येईल. घरात तुमचा मूड चांगला राहील. पाहुण्यांची ये-जा राहील.

Saturday, March 22, 2014 AT 04:12 PM (IST)

मेष ः सप्ताहात तुम्हाला निश्‍चयाने मार्गक्रमण करायचे आहे हे लक्षात ठेवा. कोणत्याही मोहाला बळी न पडता कामाचे नियोजन करा. व्यवसायात नवीन कामे मिळतील. हितचिंतकांच्या मदतीने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. वरिष्ठांची मर्जी राहील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी विशेष सवलत देतील. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याची संधी चालून येईल. घरात तुमचा मूड चांगला राहील. पाहुण्यांची ये-जा राहील.

Saturday, February 15, 2014 AT 12:00 AM (IST)

मेष ः या सप्ताहात आवश्‍यक व्यक्तींशी संपर्क साधून महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल मात्र त्यात दिरंगाई करू नका. पैशाची चिंता नसेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमच्या सरळसोट व धडाडीच्या स्वभावामुळे सहकाऱ्यांना फायदा होईल. नवीन ओळखी होतील. कामाचे समाधान मिळेल. घरात वातावरण आनंदी व उत्साही राहील. आवडच्या व्यक्तींच्या भेटीने आनंद मिळेल. तरुणांना विवाह ठरवायला अनुकूल ग्रहमान आहे. महिलांनी मानले तर समाधान मिळेल. ईप्सित साध्य करता येईल.

Saturday, January 25, 2014 AT 12:00 AM (IST)

मेष व्यवसाय, नोकरीत अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. तरी सज्ज राहा. पैशाच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करा. कामात बदल करणे अनिवार्य होईल. ओळखीचा उपयोग होईल व काही दिलासा देणाऱ्या घटना घडतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. महिलांनी अलिप्त धोरण ठेवून आपल्या छंदात मन रमवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने अभ्यासाला लागावे. वृषभ पंचमातील मंगळामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल.

Saturday, December 28, 2013 AT 12:00 AM (IST)

मेष ः ग्रहमान अनुकूल आहे, त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. व्यवसायात आवश्‍यक ते बदल करून भरपूर कमाई करावीशी वाटेल. खेळत्या भांडवलाची टंचाई असली तरी तुमचा उत्साह अपूर्व राहील. हितचिंतकांची मदत मिळेल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. वरिष्ठांनी दिलेल्या सुखसुविधांचा भरपूर आस्वाद घ्याल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासयोग संभवतो. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.

Monday, December 02, 2013 AT 01:21 PM (IST)

मेष व्यवसाय- नोकरीत नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ती हाती घेण्यापूर्वी हातातील कामे वेळेत पूर्ण करा. पैशांचे व्यवहार करताना व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. नोकरदारांनी दगदग- धावपळ कमी करावी. जमेल तेवढेच काम करावे. सहकारी व वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. अनपेक्षित चांगली बातमी कळेल. महिलांना सणाच्या धामधुमीत वेळ कसा जाईल ते कळणार नाही. मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांनी तणाव न घेता अभ्यास करावा.

Sunday, November 24, 2013 AT 01:35 PM (IST)

मेष ः व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामे स्वीकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. अपेक्षित पत्रे हाती येतील. बौद्धिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मूड लागेल.  वृषभ ः आर्थिक बाबतीत तुम्ही अत्यंत दक्ष असता, तेव्हा कामाचे योग्य नियोजन करून उलाढाल वाढवाल.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

मेष : घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात तुमची निर्भयी वृत्ती व धाडसी प्रवृत्तीची चुणूक दिसेल. कर्तव्यात कसूर न करता कामात प्रगती कराल. नोकरीत इतरांनी केलेला विरोध सहन होणार नाही. तुमच्या कृतीत अधिकार व प्रेम दोन्हीही दिसेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. महिलांना स्वत:च्या तंत्राने वागण्यात आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.

Saturday, October 05, 2013 AT 07:34 PM (IST)

मेष : सप्ताहात कामांना महत्त्व देऊन ती पूर्ण कराल. व्यवसायात अनपेक्षित खर्च व अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. खेळत्या भांडवलाची सोय बॅंका व हितचिंतक यांच्याकडून होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील ती मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत हातातील कामे संपवून मगच सहकाऱ्यांना मदत करा. वरिष्ठ एखाद्या कामाची महत्त्वाची जबाबदारी सोपवतील. त्यामुळे जादा काम करणे भाग पडेल. घरात व्यक्‍तींच्या गरजांना प्राधान्य द्याल. रागावर नियंत्रण ठेवलेत तर डोके शांत राहील.

Saturday, September 21, 2013 AT 07:39 PM (IST)

मेष : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती होईल. ग्रहांची मर्जी आहेच. काही अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात काळ, काम, वेग यांचे प्रमाण व्यस्त राहील. पैशाची तजवीज झाल्याने चिंता मिटेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत एखादे काम युक्‍तीने वेळेत पूर्ण करू शकाल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. घरात शुभसमारंभ निश्‍चित होतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. महिलांना आवडत्या छंदातून विरंगुळा लाभेल.

Saturday, September 14, 2013 AT 11:28 PM (IST)

मेष : घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेत ती पूर्ण करावी लागतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामात आळस केलात तर तो वरिष्ठांच्या नजरेत येईल. हातातील कामे आधी पूर्ण करा मगच नवीन कामांकडे वळा. घरात तुमच्या मदतीची आवश्‍यकता इतरांना वाटेल. झेपेल तेवढी मदत अवश्‍य करा. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल.

Wednesday, September 04, 2013 AT 06:01 PM (IST)

मेष - या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल. कामात थोडी निराशा होईल पण काम चालूच ठेवाल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील. पैशाची चिंता मिटेल. सहकारी व हितचिंतकांची कामात मदत होईल. हौसेने एखादे काम हाती घ्याल त्यात थोडा त्रास होईल. नोकरीत अतिउत्साहाच्या भरात कोणतेही आश्‍वासन देऊ नका. ते पूर्ण करावे लागेल. कामात थोडा धीर धरा. सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करा. घरात एखाद्या प्रश्‍नात तुम्ही ठाम राहाल.

Saturday, August 24, 2013 AT 06:14 PM (IST)

मेष : ग्रहमान कृतिशील बनवणारे. व्यवसायात प्रत्येक कामात यश मिळालेच पाहिजे अशी मनिषा असेल. कामाचा वेग मनाजोगता राहील. हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. नोकरीत कुवतीबाहेर जाऊन कामे करावी लागतील. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वादाचे प्रसंग येतील. रागावर नियंत्रण ठेवा. मनाला योग्य वाटेल तशीच कृती करा. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग. वृषभ : भावनेला महत्त्व द्याल.

Saturday, August 10, 2013 AT 06:10 PM (IST)

मेष : कामावर लक्ष केंद्रित केलेत, तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात सतत खेळत्या भांडवलाची गरज भासेल. कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. दगदग धावपळ वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्याने कामाचा ताण वाढेल कामातील बिनचूकपणाकडे लक्ष द्या. कामानिमित्ताने प्रवासयोग. घरात इतर व्यक्‍तींच्या सुख-समाधानासाठी लक्ष द्यावे लागेल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. अपेक्षित पत्रव्यवहार होतील.

Saturday, July 27, 2013 AT 12:00 AM (IST)

मेष : सध्या तुमची मानसिक उमेद चांगली असेल. व्यवसायात नवीन योजना तुमचे लक्ष आकर्षित करतील. उलाढाल वाढवण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर कराल. नवीन ओळखीतून विशेष फायदा होईल. कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची कामात मदत मिळेल. तुमच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन मिळेल. घरात तुमचा मूड चांगला राहील. कामाचा दांडगा उरक राहील. आवडत्या व्यक्तींची भेट होईल व सहकार्यही मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

Saturday, July 20, 2013 AT 12:00 AM (IST)

मेष : मानले तर समाधान मिळेल. व्यवसायात केलेल्या कामाचे पैसे हातात मिळण्यास विलंब होईल, तरी सबुरीचे धोरण ठेवा. वसुली करताना जिभेवर साखर ठेवून बोला. वागण्या-बोलण्याने हितसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. पैशाच्या व्यवहारात चोख राहा. घरात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग येतील तेव्हा डोके शांत ठेवा. अनावश्‍यक खर्च होईल.

Saturday, July 13, 2013 AT 05:33 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: