Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
आहे कमकुवत तरी... ""भरोसा देणाऱ्यांद्वारे इतिहास घडवला जातो, मोजमाप करणाऱ्यांद्वारे नाही...' असे पॅरिस हवामान कराराला मान्यता मिळाल्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकाईस ओलांद म्हणाले. हवामान बदलाबाबतच्या वाटाघाटीच्या एकविसाव्या परिषदेच्या अखेरीस पदरात काही तरी पडले, असेच यावरून सूचित होते.

Monday, December 28, 2015 AT 12:00 AM (IST)

हवामान बदल थोपविण्यात भारताचा पुढाकार पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यानंतर 30 नोव्हेंबरला सुरू झालेल्या कॉप-21 या हवामान बदलाबाबतच्या परिषदेची सुरवात यापूर्वीच्या 20 परिषदांसारखीच झाली. कृतीप्रवण होण्याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असताना तिथे जमलेल्या विविध देशांच्या सरकारांच्या प्रमुखांनी आणि मंत्र्यांनी योग्य निर्णय घेणे अपेक्षित असताना पुन्हा एकदा निराशाच हाती लागण्याची स्थिती परिषदेच्या पहिल्या आठवड्यात दिसली.

Monday, December 21, 2015 AT 12:00 AM (IST)

रिन्यूएबल शिवाय बरंच काही गरजेचं... पॅरिसमधील कॉप-21च्या परिषदेबाबत यापूर्वीच्या "कॉप्स'इतकी चर्चा झाल्याचं निदान मुद्रित पत्रकारितेतून आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या चर्चांतून दिसून आलेलं नाही, तेव्हा याबाबतचा ऊहापोह करणं "हवा'लहर या सदराचा स्तंभलेखक म्हणून आणि क्‍लायमेट चेंजचा अभ्यासक, विज्ञान पत्रकार / लेखक म्हणून करणं क्रमप्राप्त आहेच.

Monday, December 14, 2015 AT 12:00 AM (IST)

भारताचा आयएनडीसी पॅरिसमध्ये आयोजित "कॉप-21'चे कामकाज "आयएनडीसी'तर्फे चालले आहे. माध्यमांमध्ये भारताच्या "आयएनडीसी'विषयी सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. अशा "आयएनडीसी'संदर्भात देशातील विजेचे भवितव्य काय असेल, हे समजावून घेणे, महत्त्वाचे ठरणार आहे...

Monday, December 07, 2015 AT 12:00 AM (IST)

काउंट डाऊन टू पॅरिस कॉप आणि भारत नोव्हेंबर 30 पासून जगातील राष्ट्र आणि "मानवता' या संकल्पनेचे राजकीय प्रतिनिधी पॅरिसमध्ये गोळा होऊन "कॉप-21' या परिषदेस सुरवात करणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदलविषयक करार आराखडा (यूएनएफसीसीसी) अंतर्गत भरणारी ही परिषद खूपच महत्त्वाची आहे.

Sunday, November 29, 2015 AT 12:00 AM (IST)

कॅनोपी - वृक्षछताचे अपरिचित विश्‍व   भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगातच कॅनोपी सायन्स ही तशी काहीशी दुर्लक्षित आणि अपरिचित ज्ञानशाखा आहे. उष्णदेशीय वनांची वृक्षछते किंवा कॅनोपीची माहिती फारशी उपलब्ध नाही. अनेक उष्णदेशीय (ट्रॉपिकल) क्षेत्रातील मूळनिवासी उपजीविकेसाठी वनांवरच अवलंबून असल्याने हळूहळू लोकांनी आणि विशेषत: सरकारांनी वनांपासून प्राप्त परिसंस्थात्मक सेवांचे महत्त्व ओळखले आहे.

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

हवामानबदल शरणार्थींसाठी तयारी   युरोपमधील शरणार्थी संकटाचा विचार करता पॅरिस करार केवळ हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे किंवा मिटीगेशन (सामना करणे) एवढ्यापुरता मर्यादित न राखता अधिक व्यापक असण्याची गरज आहे. दिल्ली आणि जयपूरमध्ये झालेल्या समान विचारांच्या विकसनशील देशांच्या बैठकीत पॅरिस कॉपसाठीचे मुद्दे निश्‍चित करण्यात आले. हे मुद्दे गंभीर आहेत. त्याबाबत ठोस कृती केल्यामुळे हवामान बदलामुळे भविष्यात शरणार्थींवर ओढवणारे संकट टाळता येईल.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

"हवा'लहर हवामान बदलाची अधिकाधिक माहिती गरजेची! हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याचे आव्हान खूप मोठे आणि अनेकस्तरीय आहे. लोकांना जागृत केल्याशिवाय आणि त्यात त्यांचा सहभाग असल्याशिवाय ते यशस्वी होणार नाही. आपण सर्व जण हवामान बदलाच्या संकटरूपी एकाच बोटीत असून, आपण एकत्र विचार आणि हालचाल करण्याची गरज आहे. अनेक हात लागतील तर भार हलका होईल, ही जाणीव महत्त्वाची आहे.

Sunday, October 04, 2015 AT 12:00 AM (IST)

काश्‍मीर आणि हिमालयातील वनस्पती बदलणार!   एका विशिष्ट सीमारेषेच्या वरील भागामध्ये न आढळणाऱ्या अधिवास क्षेत्रातील वृक्ष आणि वनस्पती प्रणाली आता हिमालयात अधिक उंचीवर वाढताना दिसून येत आहेत. अतिथंड हवामान आणि बाष्पाचा अभाव यामुळे त्या यापूर्वी अधिक उंचीवर वाढत नसत. हवामानबदलाचा फटका काश्‍मीरातील सफरचंदांच्या बागांनाही बसला आहे. काश्‍मीरची सफरचंदे असे म्हणण्याचे दिवस इतिहासजमा होऊ घातले आहेत. कारण आहे "हवामानबदल'.

Sunday, September 27, 2015 AT 12:00 AM (IST)

  चहाच्या कपातील वादळ लीड : वाढते तापमान आणि पावसाचा बदलता पॅटर्न यांच्या एकत्रित परिणामांमुळे आसाममधील चहाचे उत्पादन आणि गुणवत्ता यांवर परिणाम होत आहे. चहाचे उत्पादन घटण्याची भीती आहे. कमी दर्जाच्या चहाचे उत्पादन हा चहा उद्योगापुढील खरा प्रश्‍न आहे. बदलत्या हवामानाच्या संभाव्य परिणामांची भीती चहा उद्योगातील अनेकांच्या मनात आहे. एक दिवस असा उगवेल, की आसाममध्ये उच्च दर्जाच्या ब्लॅक टीचे उत्पादन शक्‍य होणार नाही, अशी भीती त्यांना वाटते.

Sunday, September 06, 2015 AT 12:00 AM (IST)

नैर्ऋत्य मॉन्सूनवर हवामान बदलाचे सावट शेतकऱ्यांच्या दृष्टीने मागील वर्ष खूपच त्रासाचे गेले आहे. कमी पाऊस, पावसाअभावी वाळलेली पिके (खरिपातील) आणि मार्च-एप्रिलमधील गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान यांसारख्या गोष्टी त्यांनी सहन केल्या आहेत. 2015 मध्ये दुष्काळ पडल्यास तो आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांसाठी तो सलग तिसरा फटका असेल पण सध्याच्या तंत्रज्ञान विकासाची पातळी लक्षात घेऊन संपूर्ण पावसाळा हा ऋतू कसा असेल, याचे अचूक भाकित करणे कठीण आहे.

Saturday, August 08, 2015 AT 12:00 AM (IST)

दु:खितांचे मेघ... शैलेश माळोदे "पृथ्वीवरील सर्वांत ओलं ठिकाण' म्हणून गौरव प्राप्त झालेलं गाव म्हणजे मेघालयातील "चेरापुंजी'. हवामान बदलाच्या फटक्‍यामुळे पावसाच्या वेळापत्रकातील आणि पॅटर्नमधील बदलामुळे चेरापुंजीच्या आसपासच्या गावांतील पिकांचं नुकसान होत आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या गावात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे....

Monday, July 27, 2015 AT 12:34 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: