Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
आयुष्य सुंदर आहे! अभयला पेपर्स पुन्हा वाईट गेले या सेमिस्टरला. पुन्हा year down ची भीती. अभ्यासच झाला नव्हता. लक्षच लागत नव्हतं अभ्यासात. महत्त्वाची कारणं सेजलशी झालेला ब्रेकअप, दुबळी आत्मप्रतिमा, आतापर्यंत मुरलेला न्यूनगंड आणि नैराश्‍य. सहा महिने दिशाहीन झालेल्या होडीसारखं आयुष्य भरकटत चाललं होतं. मग मित्रांच्या नादानं मन शांत होण्यासाठी अधूनमधून बिअर पिणं.. रात्र रात्र बाईकवरून भटकत राहणं, पहाटे केव्हातरी झोपणं आणि उशिरा उठणं.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

उंचीवरच्या जागांची भीती Too many of us are not living our Dreams, because we are living our Fears - Les Brown कुठलाही फोबिया आपल्या जीवनातील स्वस्थता हरवून टाकतो. आपण जीवन न जगता, वाटणारी भीतीच जगत राहतो. केवळ दहाव्या मजल्यावर ऑफिस आहे, म्हणून कोणी नोकरी नाकारेल का? अमोलने नाकारली होती. स्वाती, त्याची पत्नी त्याला घेऊन माझ्याकडे आली होती. केवळ उंच जागांची भीती वाटते म्हणून चांगल्या चांगल्या ऑफर्स त्याने नाकारल्या होत्या.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

ताणतणाव आणि मधुमेह जगदीशला कंपनीत चार - पाच वेळा चक्कर आल्यासारखं वाटलं. रोज मधून मधून प्रचंड थकवा जाणवायचा. त्याला बॉर्डरलाइन डायबेटिस होताच. जेवणापूर्वी एक गोळी चालू होतीच. डॉक्‍टरांनी नियमित व्यायाम, साखर वर्ज्य आणि मुख्य म्हणजे ताणतणाव आटोक्‍यात ठेवणं इत्यादी सूचना दिल्या होत्या परंतु त्याच्याकडून फक्त औषध घेणं आणि पथ्य पाळणं एवढंच होत होतं. नियमित व्यायाम नव्हता..

Monday, April 24, 2017 AT 12:00 AM (IST)

न सांगता येण्यासारखे दुःख रुचिता माझ्याकडे आली, ती एक विचित्र समस्या घेऊन! तिला नीट सांगता येत नव्हते. कसे आणि काय सांगावे कळत नव्हते. सुमित - तिचा नवरा आयटीमध्ये चांगल्या कंपनीत होता. सहा वर्षांची एक गोंडस मुलगी होती. स्वतःचा फ्लॅट, गाडी, तिच्या मैत्रिणींचा ग्रुप, सगळे कसे जिथल्या तिथे होते. पण फक्त बाहेरच्यांसाठी. रुचिता स्वतः समीरच्या विचित्र आणि विकृत वागणुकीने विलक्षण त्रस्त झाली होती. समीरला पोर्न फिल्म्स पाहण्याचे व्यसन होते.

Monday, April 10, 2017 AT 12:00 AM (IST)

भीती मोकळ्या आणि बंद जागांची... लंडनमध्ये एका मॉलच्या खाली असलेल्या अवाढव्य कार पार्किंगमध्ये मी मित्रासोबत कार घेण्यासाठी गेलो. कार्ससाठी भल्या मोठ्या शिस्तशीर मार्किंग केलेल्या, पण आत्ता मोकळ्या असणाऱ्या जागा होत्या. बेसमेंटमध्ये असलेल्या या अवाढव्य पार्किंगमध्ये क्वचितच लांबवर पार्क केलेली एखाद-दुसरी गाडी दिसत होती. प्रचंड परंतु, बंदिस्त मोकळी जागा होती आणि कुठेही एकही माणूस नव्हता. सगळीकडे शांतता.

Monday, March 27, 2017 AT 12:00 AM (IST)

सुतक ः ज्याचं... त्याचं... खूप जुनी गोष्ट आहे. एका वृद्ध स्त्रीचा कर्ता-सवरता मुलगा अचानक वारला. तिच्यावर जणू आभाळच कोसळलं. हे दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. तिला कुणीतरी सांगितलं, गावाबाहेर गौतम बुद्ध आले आहेत. आत्मसाक्षात्कारी सिद्ध व्यक्ती आहे. ते तुझ्या मुलाला परत मिळवून देऊ शकतील. ती स्त्री मोठ्या आशेनं बुद्धांना भेटली. त्यांच्याकडं मुलगा परत मिळवून देण्यासाठी याचना केली. बुद्धांनी खूप समजावलं, की बाई हे शक्‍य नाही.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

मला बदलायचंय! मला मनःशांतीही हवी आहे आणि भौतिक जीवनात यशही हवं आहे तर मग मला माइंडफुलनेस आणि सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करायलाच हवा. नकारात्मक दृष्टिकोन बदलता येतो का? सकारात्मक प्रोग्रामिंग करता येतं का? स्वभावातले दोष काही प्रमाणात का होईना कमी करता येतील का? आत्मविश्‍वास प्राप्त करून घेता येईल का? भूतकाळ विसरून आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगता येईल का? या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर, "विशिष्ट प्रयत्न केले, तर "होय' असं आहे.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

मृत्यूच्या भीतीचे विचार... अमर टेरेसवर आला तेव्हा रात्रीचे अडीच वाजले असावेत. आकाश खूप सुंदर दिसत होतं. असीम अवकाशात, आकाशाच्या निळाईमध्ये दूर दूरपर्यंत पसरलेले तारे. मधूनच येणारी मंद, गार वाऱ्याची झुळूक पण अमर या निःशब्द स्वस्थ शांततेचा आनंद घेऊ शकत नव्हता. प्रचंड अस्वस्थ होता तो. बऱ्याच रात्री झोप अशी नव्हतीच. सतत मनात अस्वस्थ करणारे विचार. एकटक आकाशाकडे पाहत होता तो. अचानक दूरवर एक उल्का निखळली.

Monday, January 30, 2017 AT 12:00 AM (IST)

प्रत्येक मूल वेगळे असते   आइन्स्टाइननं एका ठिकाणी लिहिलंय - Everybody is a genius. But if you judge a fish by it's ability to climb a tree, it will live it's whole life believing that it is stupid. बऱ्याच वेळा एखादे मूल अभ्यासात कमी असू शकते किंवा इतर मुलांच्या मानाने त्याचे ग्रास्पिंग किंवा शालेय अभ्यास समजण्याची क्षमता इतर मुलांपेक्षा कमी असू शकते. पालकांना नेमका प्रॉब्लेम काय आहे? हे कळत नाही.

Monday, January 16, 2017 AT 12:00 AM (IST)

वेलकम 2017 . . . . . . वर्ष 2016 संपले. अनेक अर्थांनी चढउतार, मानसिक आंदोलने या वर्षात येऊन गेली! काहीजणांसाठी वर्ष छान गेले असणार, काही जणांसाठी सो सो, तर काही जणांसाठी चक्क वाईट! हे असं तिन्ही वाटण्यामागे प्रत्यक्ष वास्तवात घडलेल्या चांगल्या, वाईट घटना जशा जबाबदार असतात तसाच आपला घटनांकडे, व्यक्तींकडे आणि एकूणच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जबाबदार असतो. आपला "मेंटल मेकअप' जबाबदार असतो.

Thursday, January 05, 2017 AT 01:45 PM (IST)

एकाग्रता अभ्यासासाठी... परीक्षेसाठी! Any individual can be, in time, what he earnestly desires to be, if he but set his face steadfastly in the direction of that one thing and bring all his powers to bear upon its attainment. - J. Herman Randall ""सर, दहावीला तिला 92 टक्के होते पण आता अभ्यासात एकाग्रता होत नाही. स्पर्धा लक्षात घेता यंदा बारावीला तेवढे टक्के तरी हवेत.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

व्हिडिओ गेम्सचा विळखा तो विलक्षण भारल्यासारखा त्या खेळात बुडाला होता. जणूकाही जीवन-मरणाचा प्रश्‍न होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. कधी त्वेष, कधी भीतिदायक गोठल्यासारखा थंडपणा, कधी विजयोन्माद, कधी विलक्षण हताश... त्याला आजूबाजूच्या जगाचे भान नव्हते. तो फक्त त्याच्याच त्या कृत्रिम वास्तवात होता. त्याला खऱ्या वास्तवापासून जितके लांब पळता येईल तेवढे पळायचे होते. व्हिडिओ / कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे.

Thursday, December 15, 2016 AT 12:00 AM (IST)

  माझ्यात काहीतरी कमी आहे ------- अशोक एका मोठ्या कंपनीत बरेच महिने काम करत होता. कामामध्ये अतिशय प्रवीण होता पण अनेकदा त्याला प्रेझेंटेशन द्यायची वेळ येई किंवा एखाद्या मोठ्या समूहासमोर बोलण्याची वेळ येई, त्या वेळी मात्र त्याला विलक्षण भीती वाटत असे. हात-पाय कापत असत. तोंडाला कोरड पडत असे. शक्‍यतो तो असे प्रसंग टाळत असे पण नव्या डिपार्टमेंटला त्याचं पोस्टिंग झालं आणि लोकांसमोर बोलणं कामाचा भाग म्हणून क्रमप्राप्त झालं.

Monday, October 10, 2016 AT 12:00 AM (IST)

मला काही सांगायचंय... प्रिय जानकी, आज बऱ्याच दिवसांनी मी तुला ई-मेल लिहितेय. मला हे सगळं नीट बोलता येणार नाही कदाचित, म्हणून हे लिहिणं. त्या भयानक घटनेनंतर आता मी बरीच सावरलेय. मी पुन्हा "मी' झालेय. आपल्या माणसांचे आभार मानू नये म्हणतात. पण माझ्या बाबतीत घडलेल्या त्या अमानुष घटनेनंतर, तू केलेली मदत मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्या घटनेनंतर तू जणू माझा भाग किंवा माझी सावली बनूनच राहिलीस ही वस्तुस्थिती आहे.

Monday, September 26, 2016 AT 12:00 AM (IST)

शांत, निवांत, स्वस्थ.. . शांत, निवांत, स्वस्थ बसावं. मनात विचारांचे, भावनांचे कल्लोळ नाहीत. मनाच्या खूप खोलवर आत एकटं असूनही सुरक्षित वाटतंय. माझ्या अस्तित्वाची फक्त जाणीव आणि आनंदमय शांतता...ना भूतकाळाचं ओझं ना भविष्यातली कुठली काळजी. फक्त वर्तमान क्षण आणि शांततेनं वेढलेला निवांत मी! मनाच्या अथांग डोहात शांततेचे अन्‌ विलक्षण स्वस्थतेचे तरंग...आणि मग त्याचीही जाणीव नाही...

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

जुळवून घेण्याची क्षमता आदित्यचा तरुण वयात अपघाती मृत्यू झाला आणि दोन मुलं पदरी असलेल्या श्‍वेतावर आकाश कोसळलं. तिच्या आणि आदित्यच्या मित्रमैत्रिणींनी, नातेवाइकांनी भरपूर आधार दिला. आदित्यच्या ऑफिसनं नियमाप्रमाणं श्‍वेताला नोकरी दिली. या सगळ्या गोष्टी घडल्या पण श्‍वेता पार खचून गेली होती. नियमाप्रमाणं महिन्यात जॉइन व्हायचं होतं. श्‍वेताचं भावनिक विश्‍व उद्‌ध्वस्त झालं होतं, पण उभं तर राहायलाच हवं होतं.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

पॅनिक ऍटॅकवर मात . . . . . सुजाता ऑफिससाठी तयार होत होती. आज अतिशय महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं. तशी तिची पूर्ण तयारी झाली होती. आरशासमोर ती उभी होती अन्‌ अचानक भीतीची एक लाट तिच्या आतून फुटल्यासारखी झाली. छातीत धडधडायला लागले. हातपाय कापायला लागले. सगळी खोली आपल्याभोवती फिरतेय असे वाटायला लागले. श्‍वास कोंडल्यासारखा झाला. ती घाबरली. अचानक आपल्याला काय होतेय हे तिला कळेना.

Monday, August 08, 2016 AT 12:00 AM (IST)

स्वस्थतेच्या, मनःशांतीच्या वाटेवर गौतम बुद्धांना एकदा विचारलं गेलं, तुम्हाला मेडिटेशनमधून काय मिळालं? त्यांचं उत्तर खूप छान होतं. ते उत्तरले, "काहीच मिळालं नाही पण मी एक सांगू इच्छितो की माझ्यातला राग, अस्वस्थता, अहंकार, असुरक्षितता, वृद्धावस्था आणि मृत्यू यांची भीती, या सगळ्या गोष्टी मी गमावून बसलो.' हे उत्तर अतिशय मार्मिक आहे. ध्यानाचं महत्त्व, मानवी आयुष्यातलं त्याचं स्थान आणि उपयोग खूप मोलाचे आहेत.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

व्हिडिओ गेम्सचा विळखा Addiction is the only prison where the locks are on the inside. व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाच्या बाबतीत हेच म्हणता येईल. आज व्हिडिओ/कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अनेक मुले अडकली आहेत, अडकत आहेत. मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर पर्यायाने त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम घडवू शकणारे हे व्यसन आहे. या मुलांच्याबाबतीत आतून म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेस बदलूनच त्यांना यातून सोडवता येईल.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

पुन्हा पुन्हा, तेच तेच ओसीडी या आजारात नको असणारे, निरर्थक, तर्काला न पटणारे विचार, प्रतिमा इत्यादी पुन्हा पुन्हा व्यक्तीच्या मनात येतात (ऑब्सेशन) आणि मग अशी व्यक्ती या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेतून सुटका होण्यासाठी त्या विचारांशी निगडित कृती पुन्हा पुन्हा करीत राहते. I have CDO. It's like OCD, but all the letters are in alphabetical order, AS THEY SHOULD BE. हे वाक्‍य वाचताना मजेशीर वाटतेय.

Monday, July 04, 2016 AT 12:00 AM (IST)

तरुण म्हातारपण सरसरत जाणारा चपटा दगड पाण्यावर अनेक भाकऱ्या थापत गेला. संथ वाहणाऱ्या नदीपात्रात अनेक तरंग उठत गेले. अप्पा खूश झाले, त्यांचा दगड अगदी त्यांना अपेक्षित असा गेला होता. हसून म्हणाले, ""पाहिलंस! आता कशी मास्टरी आलीय माझी. तीन-चार भाकऱ्या तर ठरलेल्याच असतात...'' मी आणि ते वृद्धाश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या नदीकाठावर बसलो होतो.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

निळ्याशार समुद्राकाठी निवांत... कल्पना करायची.. आपण एका शांत समुद्राकाठी वाळूवर पहुडलो आहोत. थंडगार वाऱ्याची झुळूक सगळ्या अंगांगाला सुखावते आहे. तिचा स्पर्श रेशमाप्रमाणे आहे... आपल्या अगदी जवळपर्यंत येणाऱ्या लाटा शांतपणे पसरतात आणि परततात. त्यांच्याकडे पाहताना वाटतं, प्रत्येक लाट जणू आपल्या श्‍वासाप्रमाणे आहे, खूप खोलवरून आतून वर येणारी, उंच उठणारी आणि नंतर शांतपणे बाहेर पसरणारी. समुद्राकडे पाहिलं तर दिसतं.. तो काही ठिकाणी थोडा अस्वस्थ आहे.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

अपयशाने खचणार नाही !! 23 मे- सत्तावीस मे जवळ आलाय. रिझल्ट लागेल त्या दिवशी. पुन्हा बॅकलॉग असणार. सगळे हसणार. अस्मितासुद्धा. कॅम्पस इंटरव्ह्यूला सिलेक्‍शन वगैरे लांबच राहिलं. डोक्‍याचा पार भुगा झालाय. आत्मविश्वास या शब्दाचीसुद्धा भीती वाटते. सगळीकडे पराभव. 24 मे - आज सकाळपासून असह्य झालंय सारं. ठरवून टाकलं, संपवून टाकायचं सगळं. डेथ नोट लिहून टाकायची, माझ्या मृत्यूला कुणाला जबाबदार धरू नये.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर "A narcissist can't be faithful. This is because - to a narcissist - 'you' don't exist except as a mirror. When he looks at you, all he sees is his own reflection. Distort this reflection and he will go find another mirror. It's as simple, or as complicated, as that." ~ Tigress Luv काही व्यक्तींना नेहमी वाटत असतं की आपण कुणीतरी अतिमहत्त्वाचे आहोत आणि सगळं जग आपल्याभोवती फिरतंय.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

मी मोकळं व्हायचं ठरवलंय... प्रिय आई, आज मी मोकळं व्हायचं ठरवलंय... कदाचित, पुन्हा ही संधी मला मिळणार नाही... आयुष्याचा शेवट करायचा ठरवलंय... आपल्या हातात काही नसतं वगैरे तत्त्वज्ञान मला माहितीय. पण, मला या दडपणातून मुक्त होण्याचा दुसरा मार्ग माहीत नाही... हे कसं सांगावं हे मला उमजतच नाहीय... तू, बाबा माझ्यावर रागावला आहात हे मला कळतंय, पण तुम्हाला माझ्या भावना कळायलाच हव्यात म्हणून लिहितेय... तुमचं बरोबरसुद्धा आहे.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

अस्वस्थता आणि स्वस्थता...सर्वांसाठी! आज कॉर्पोरेट, मीडिया, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ताणतणावाचे नियोजन न करता आल्यामुळे अस्वस्थतेच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होतेय. प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला रिऍक्‍ट होण्याची पद्धत व भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाच्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

सकारात्मक स्व-संवाद आपला आयुष्याकडं, एकूणच जगण्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तरच आयुष्याकडून आपल्याला भरभरून आनंद, सुख, मनःशांती आणि यश मिळत जातं. आपला दृष्टिकोन सकारात्मक होण्यामध्ये सकारात्मक स्व-संवादाचा फार महत्त्वाचा वाटा असतो.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

विचार करण्याच्या अयोग्य पद्धती आणि आपण आपण ट्रकच्या मागे "विचार बदला, नशीब बदलेल' असे लिहिलेले अनेकदा वाचतो. गमतीदार वाक्‍य म्हणून हसून सोडून देतो पण खरोखरच आपले नशीब बदलायला, आपली मनःस्थिती बदलायला आपले विचारच कारणीभूत असतात. सकारात्मक विचार आपल्याला सर्वार्थांनी ऊर्जितावस्थेला नेतात, तर नकारात्मक विचार, नकारात्मक स्व-संवाद आपले खच्चीकरण करू शकतात.

Monday, April 25, 2016 AT 12:00 AM (IST)

ती पुन्हा सावरली, त्याची गोष्ट... क्षमा माझ्याकडे आली तेव्हा तिची खूप विचित्र मनःस्थिती होती. ती दुःखी तर होतीच, पण तिला विलक्षण अपराधगंड होता. घडलेली घटना कुठल्याही पत्नीसाठी पराकोटीचं दुःख देणारीच होती. तिच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. तिच्या पतीचा, आदित्यचा अचानक अपघाती मृत्यू झाला होता. या गोष्टीला आता दोन महिने होऊन गेले. पण ती तिळभरही सावरू शकली नव्हती. जोडीदार गेल्याचं दुःख होतंच, पण विलक्षण गिल्ट - अपराधभावना होती.

Monday, April 18, 2016 AT 12:00 AM (IST)

न्यूनगंड न्यूनगंड हा एक असा गंड (कॉम्प्लेक्‍स) आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःच स्वतःला कमालीची कमी लेखत असते. त्यामुळे जीवनात ती कर्तृत्वाच्या क्षेत्रात तर मागे राहतेच, तसेच व्यक्तिगत आयुष्यातही ती सतत अस्वस्थ अवस्थेत राहते. न्यूनगंड हा एक असा गंड (कॉम्प्लेक्‍स) आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःच स्वतःला कमालीची कमी लेखत असते. त्यामुळे जीवनात ती कर्तृत्वाच्या क्षेत्रात तर मागे राहतेच, तसेच व्यक्तिगत आयुष्यातही ती सतत अस्वस्थ अवस्थेत राहते.

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: