Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
सरकारी कार्यालयात सकाळी अकरा ते बारा या दरम्यान जसं वातावरण असतं, तसंच आजही होतं. तिकडं दिल्लीत मोदी साहेब सकाळी नऊ वाजताच कार्यालयात हजर असतात, अशा बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणच्या या राज्य सरकारच्या कार्यालयात मात्र या बातमीचा अजून परिणाम झालेला नाही. परिणामी सवडीनं कार्यालयात येणं आणि सवड मिळली तरच काम करणं, या दैनंदिनीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. या मंडळींसाठी बारा महिने चोवीस तास "अच्छे दिन'च असतात. असो.

Saturday, June 28, 2014 AT 04:37 PM (IST)

ती. बाबांना सा. न. काल संध्याकाळी पुण्यात सुखरूप पोचलो. कसलाही त्रास झाला नाही. रिझर्व्हेशन केले होते म्हणून बरे झाले. गाडीत गुंडू पाटलांचा मुलगा भेटला. तो बी. एस्सी.साठी पुण्यात आला आहे. त्याला खोलीवर घेऊन गेलो होतो. त्याने भाकरी पिठले आणले होते. तेच जेवलो आम्ही रात्री. आजोबांनी दिलेले पैसे आणि लाडू-चिवडा उद्या मन्याकाकाकडे देऊन येतो. रविवारी बाळू मोहोळकर पुण्यात येणार आहे. त्याच्याबरोबर माझ्या मेसचे पैसे आठवणीने पाठवून द्या.

Saturday, April 26, 2014 AT 12:00 AM (IST)

विक्रमादित्य पुन्हा झाडावर गेला. झाडावरून त्याने शव खाली उतरवले. ते आपल्या खांद्यावर घेतले आणि त्याने स्मशानाची वाट धरली. त्याचा हा दिनक्रम अनेक वर्षे अव्याहतपणे चालू होता. त्यात कधीच खंड पडला नव्हता. सुधारित वेतनश्रेणी किंवा वेतन आयोग अशा मागण्यांसाठी संपावर जाण्याची त्याला मुभा नव्हती. शिवाय सार्वजनिक सुट्या, जोडून सुट्या, एलटीए अशा सुविधांचा लाभ मिळण्यास तो पात्र नव्हता. "सीक लिव्ह'सारखी "चैन'ही त्याला करता येणे शक्‍य नव्हते. असो.

Saturday, February 15, 2014 AT 12:00 AM (IST)

"त्याला' "त्यांचं' किती तरी दिवसांपासून दर्शन घ्यायचं होतं, "त्यांच्या'बाबत तो बरंच काही ऐकत होता, पाहत होता आणि वाचतही होती. "त्यांनी' "मेट्रो'तून जाऊन शपथ घेतली हे त्यानं "टीव्ही'वर स्वतःच्या आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. "मी व माझे सहकारी पोलिस सुरक्षारक्षकांच्या गराड्यात राहणार नाही', "हे' त्यांनी सांगितल्याचं त्यानं वाचलं होतं. भारतातल्या "जित्याजागत्या' चमत्काराला त्याची देही याची डोळा "पाहिलंच पाहिजे, असा निश्‍चय करून तो कामाला लागला.

Friday, January 24, 2014 AT 12:00 AM (IST)

स्थळ  कोणत्या तरी गावातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील उपाहारगृह. वेळ ः दुपारी बाराची. खरे तर या वेळेला सरकारी कार्यालयातील कामकाजाने बऱ्यापैकी वेग घेतलेला असतो. पण आज कार्यालयातील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपला मुक्‍काम उपाहारगृहात हलवलेला दिसत होता. उपाहारगृहात जमलेल्या कर्मचाऱ्यांचे चेहरे आज चांगलेच चिंताक्रांत दिसत होते.

Saturday, December 28, 2013 AT 12:00 AM (IST)

दिल्लीतील कोणातरी मंत्र्याच्या बंगल्याच्या हिरवळीवर खासदार मंडळी जमली आहेत. ही मंडळी अर्थातच केंद्रातल्या सत्ताधारी कॉंग्रेसची आहेत. कॉंग्रेसच्या मित्र पक्षांचेही खासदार दिसताहेत. आज या मंत्र्याने मेजवानीचा "संगीत' बेत ठेवला आहे. मेजवानीला पक्षाचे "बालक-पालक' म्हणजे राहुल-सोनिया येणार नाहीत हे अगोदरच जाहीर झाले आहे. त्यामुळं वातावरण सुरवातीपासूनच मोकळं ढाकळं बनलं आहे. पंतप्रधान हे कदाचित मेजवानीला येण्याची शक्‍यता आहे, असं सांगितलं गेलंय.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

वर्ग खचाखच भरलेला. पटसंख्येबाबत शंका घेऊन कोणी पटपडताळणीसाठी आला असता, तर तो तोंडावर पडला असता. शाळेचा तसा लौकिकच होता. शाळेला सव्वाशे वर्षं होऊन गेली होती. शाळेची इमारत दगडी बांधकामातली होती. वयोमानाप्रमाणे ही दगडी वास्तूही खिळखिळी होऊ लागली होती. अशा या ऐतिहासिक शाळेचे मुख्याध्यापक असलेल्या मनमोहन सरांचा एक अत्यंत विद्वान, प्रामाणिक असा लौकिक होता. म्हणून तर शाळेच्या व्यवस्थापन समितीनं त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली होती.

Saturday, October 05, 2013 AT 07:14 PM (IST)

ती चारचौघींसारखीच दिसायला होती. चार-पाच, दोन हात... तिला काही सोन्याचा वर्ख लावलेला नव्हता की हिरे, माणकं लगडलेली नव्हती. तरीही तिचं मोल प्रचंड होतं. अस्सल "खुर्चीपारखी' "ती' किती "अनमोल' आहे हे जाणून होता. तिच्यासाठी खूप जण जीव टाकून होते. अनेकांनी तिला प्रपोझ करण्याचा प्रयत्न केला होता. काही जणांनी तर तिला "डेटिंग'ला येतेस का, असंही विचारलं होतं. पण तिनं चक्क नकार दिला होता. चारचौघांसारखी असली तरी चारचौघांपेक्षा ती बरीच वेगळीही होती.

Saturday, September 14, 2013 AT 07:53 PM (IST)

"संकष्ट चतुर्थी'चे मोदक खाऊन गणराया निवांत बसले आहेत. भक्त मंडळी डोळे मिटून मनोभावे प्रार्थना करताहेत. कार्यकर्ते "बाप्पा'चा फोटो असलेला "मी येतोय' असं मोठ्या अक्षरात लिहिलेला "फ्लेक्‍स' लावण्याची तयारी करताहेत. "डीजे'वर बाप्पाच्या आरत्या, गाणी ढणढणा आवाजात चालू आहेत. आजूबाजूला राहणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना, विद्यार्थ्यांना या आवाजाचा त्रास होतोय पण हे उघडपणे कोणी बोलू शकत नाहीये. दुपारचा एक वाजून जातो, तशी भक्तांची संख्या रोडावते.

Monday, September 09, 2013 AT 05:29 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2014 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: