Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
किमयागार प्रशिक्षक खालिद जमील देशातील प्रमुख संघांचा समावेश असलेली आय-लीग फुटबॉल स्पर्धा यंदा मिझोरामच्या ऐजॉल एफसीने जिंकली. त्यांचे हे विजेतेपद अनपेक्षितच ठरले. केवळ दुसऱ्यांदा ते आय-लीग स्पर्धेत खेळत होते. गतमोसमात आठव्या क्रमांकावर राहिल्यामुळे ऐजॉलच्या संघाची पदावनती झाली होती, नंतर गोव्यातील दोन संघांनी माघार घेतल्यामुळे या संघाला आय-लीग स्पर्धेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पुन्हा प्रवेश दिला.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

भालफेकपटू नीरज भारताचा प्रतिभाशाली भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आगामी जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. चीनमधील जियाशिंग येथे झालेल्या आशियाई ग्रांप्री स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात नीरजने 83.32 मीटरवर भाला फेकून रौप्यपदक मिळविले. जागतिक स्पर्धा पातत्रेसाठी 83 मीटरवर भाला फेकणे आवश्‍यक होता. हे अंतर पार करून नीरजने येत्या ऑगस्टमध्ये लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेसाठी तिकीट पक्के केले.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

साईप्रणीतचे "सुपर' यश   जागतिक स्तरावर बॅडमिंटन खेळामध्ये भारतीय महिला आणि पुरुष खेळाडूंचा दबदबा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली हे दमदार खेळाडू घडत आहेत. नुकत्याच झालेल्या "सिंगापूर ओपन' स्पर्धा जिंकत साईप्रणीत हा भारतीय दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. सिंगापूर सिटीत इतिहास घडला. जागतिक बॅडमिंटनमधील सुपर सीरिज दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच दोघा भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंत अंतिम सामना रंगला.

Monday, May 01, 2017 AT 12:00 AM (IST)

सिंधूचा धडाका! गतवर्षी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधू हिला महिलांच्या बॅडमिंटन एकेरीत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिला सिंधूने तीन गेम्समध्ये झुंजविले पण अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतरच्या दोन स्पर्धांत सिंधू डावखुऱ्या स्पॅनिश खेळाडूस भारी ठरली. चार महिन्यांच्या कालावधीत हैदराबादच्या 21वर्षीय मुलीने दोन वेळा मरिनला पराभवाचा दणका दिला.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

जिगरबाज ली चोंग वेई मलेशियाचा अव्वल बॅडमिंटनपटू ली चोंग वेई हा जिगरबाज आणि मानसिकदृष्ट्या कणखर खेळाडू. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला हा 34 वर्षीय बॅडमिंटनपटू कमालीचा लढवय्या आहे. बर्मिंगहॅममध्ये या वर्षीची "ऑल इंग्लंड' बॅडमिंटन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ली चोंग वेईच्या पायाला सराव सत्रात दुखापत झाली. त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली पण तो डगमगला नाही. तीन आठवड्यांनंतर पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर उभा ठाकला.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

ग्रहांची व्याख्या मागे आपण बघितले, की प्लुटोला ग्रहांच्या पंगतीत बसवणे शास्त्रज्ञांना दिवसेंदिवस अवघड जात होते. कारण हा इतर ग्रहांच्या तुलनेत नुसताच खूप लहान आहे असे नाही, तर त्याची कक्षाही इतर ग्रहांच्या तुलनेत फार कललेली आहे. त्याचबरोबर प्लुटो आणि त्याच्यासारख्या इतर पदार्थांना लघुग्रहांच्या श्रेणीतही टाकता येत नव्हते. कारण त्यांच्या तुलनेत यांचा आकार आणि सूर्यमालेत यांची जागाही वेगळी आहे.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

इब्राहिमोविचची उपयुक्तता इंग्लंडमधील मातब्बर फुटबॉल क्‍लब मॅंचेस्टर युनायटेडने गत वर्षी स्वीडनच्या झ्लाटन इब्राहिमोविचला करारबद्ध केले, तेव्हा कित्येकांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी वयाची पस्तीशी गाठलेल्या "स्ट्रायकर'ला प्राधान्य दिले होते. तो यशस्वी ठरणार का हाच प्रश्‍न चर्चेचा विषय होता. इब्राहिमोविच गेल्या वर्षी एक जुलैला "ओल्ड ट्रॅफर्ड'वर आला.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

अपयशी ठरलेले प्रशिक्षक भारतात येत्या 6 ते 28 ऑक्‍टोबर या कालावधीत 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. "फिफा'च्या वयोगट विश्‍वकरंडक विभागातील ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने स्पर्धा नजरेसमोर ठेवून दोन वर्षांपूर्वीच संघ बांधणीचे काम हाती घेतले होते. जर्मनीचे निकोलाय ऍडम यांची फेब्रुवारी 2015 मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.

Monday, March 06, 2017 AT 12:00 AM (IST)

"करोडपती' नटराजन! . . . . . टी. नटराजन हा तमिळ युवक काही वर्षांपूर्वी सालेममधील चिन्नप्पाम्पट्टी येथील धुळीने माखलेल्या मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसत होता. डावखुरी वेगवान गोलंदाजी टाकताना त्याने स्थानिक पातळीवर ए. जयप्रकाश यांना प्रभावित केले. या मुलात नैसर्गिक गुणवत्ता होती. नटराजनला घेऊन जयप्रकाश चेन्नईत आले. खोलवर यॉर्कर टाकणाऱ्या या गोलंदाजाच्या हाती सीझन बॉल आला.

Monday, March 06, 2017 AT 12:00 AM (IST)

"सुपर फ्रॅंक'ची निवृत्ती . . . . . इंग्लंडमधील नावाजलेला फुटबॉल क्‍लब "चेल्सी'साठी स्टॅमफोर्ड ब्रिज हे "होम ग्राउंड'. प्रीमियर लीगमधील मातब्बर संघ ही या क्‍लबची ओळख आहे. फ्रॅंक लॅम्पार्ड हा या संघाचा माजी सफल फुटबॉलपटू. स्टॅमफोर्ड ब्रिजवर "सुपर फ्रॅंक' या टोपणनावाने हा मध्यरक्षक ख्यातनाम झाला. हल्लीच त्याने व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली. वयाच्या 38 वर्षी चेंडूमागे धावणाऱ्या त्याच्या पायांनी थांबायचे ठरविले.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

शिखरावरील दोघे अचाट, अफाट, अप्रतिम, अद्वितीय, अविश्‍वसनीय, आश्‍चर्यकारक, अद्‌भुत... कितीही वर्णन केलं तरी अपुरंच वाटतंय. जे काही घडत होतं आणि घडलं, त्याचं वर्णन करायचं झालं तर कोणते शब्द वापरावेत आणि किती? असा विचार करताना शेवटी शरणागती पत्करली. सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडरर यांच्या विक्रीम विजेतेपदाचं, त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करायचा तो प्रयत्न होता. शेवटी इतकंच खरं म्हणायचं, की घडलं ते घडलं.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

मेहनती हरजीत --- लखनौ येथे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने तब्बल 15 वर्षांनंतर विश्‍वकरंडक जिंकला. हरजीत सिंग याने या जगज्जेत्या संघाचे नेतृत्व केले. त्याने या स्पर्धेत सुरेख खेळ करताना गुणवत्तेस न्याय दिला. हरजीत हा मोहालीजवळील कुराली येथील मेहनती हॉकीपटू. गेल्या दोन जानेवारीस त्याने एकविसावा वाढदिवस साजरा केला. खडतर परिश्रमाच्या बळावर या युवकाने भारतीय हॉकीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान तयार करण्यास सुरवात केली आहे.

Monday, February 06, 2017 AT 12:00 AM (IST)

अमेरिकेतही ? अमेरिकेत एका लायब्ररीत नोकरीसाठीच्या मुलाखती वेळचा प्रसंग. लायब्ररीच्या एका पॅनल समोर मुलाखत देण्यासाठी मी बसले होते. जरी नोकरीसाठीची मुलाखत असली, तरी वातावरणात मोकळेपणा होता. सुरवातीला मुलाखतीत विचारतात ते ठराविक प्रश्न विचारून झाल्यावर "जर तर'चे प्रश्न सुरू झाले.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

- त्रिशतकवीर करुण चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडिअमवर करुण नायर या बंगळूरच्या युवकाने कमाल केली. कारकिर्दीतील अवघा तिसराच कसोटी सामना आणि डाव खेळताना त्याने त्रिशतकाला गवसणी घातली. पंचवीस वर्षीय फलंदाजाच्या नाबाद 303 धावांमुळे भारताला 7 बाद 759 हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावपर्वत उभारता आला.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

सिंधूचे "सुपर' यश रिओ ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला. ऑलिंपिकच्या इतिहासात भारतासाठी रौप्यपदक जिंकणारी सिंधू ही पहिली महिला खेळाडू ठरली. त्या संस्मरणीय यशाने सिंधूवर कौतुकाचा वर्षाव झाला, ते अपेक्षितच होते. भारतात परतल्यानंतर विविध सोहळ्यांमुळे सिंधूच्या सरावावर आणि कामगिरीवर परिणाम होण्याची भीतीही होती.

Monday, November 28, 2016 AT 12:00 AM (IST)

मिसमॅच इअररिंग्ज   कॉलेज किंवा ऑफिसला जाताना रोज तेच तेच कपडे, ज्वेलरी वापरून कंटाळा आला असेल ना? कॅज्युअल्स पार्टीवेअर ड्रेसेसवर ट्रिकी ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सध्या भाव खावून जातोय. यामध्ये मिसमॅच कॉम्बिनेशनची ज्वेलरी आणि ऍक्‍सेसरीज नक्की ट्राय करा. - हॉलिवूडमधील अभिनेत्रींमुळे मिसमॅच इअररिंग्ज, नेकलेस घालण्याचा ट्रेंड सध्या रुळत आहे. - काहीतरी मजेदार आणि फंकी स्टाइल करण्याच्या विचारातूनच मिसमॅच इअररिंग्जचा फंडा पुढे आला आहे.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

गोल्फर अदितीचे ऐतिहासिक यश ऑगस्टमध्ये झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये गोल्फ खेळाचा पुन्हा समावेश झाला आणि त्यात महिलांनाही संधी मिळाली. भारताची प्रतिभाशाली युवा गोल्फर अदिती अशोक हिने ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार झाले. साहजिकच तिच्या नावासमोर एक विक्रमही लागला. भारताचे ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला गोल्फर ठरली. अदितीने त्यावरच समाधान मानले नाही, तर गोल्फमध्ये सातत्य राखण्यावर तिने भर दिला.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

सायकलिंगमधील महान विगिन्ज ग्रेट ब्रिटनचा ब्रॅडली विगिन्ज याची सायकलिंगमधील कामगिरी महान आहे. रोड आणि ट्रॅक अशा दोन्ही प्रकारच्या सायकल शर्यतीतील त्याचे कसब वाखणण्याजोगे. व्यावसायिक गटातही त्याने यशाची चव चाखली. अतिशय खडतर अशी "टूर द फ्रान्स' सायकल स्पर्धा जिंकणारा विगिन्ज हा यशस्वी ऑलिंपियनही आहे. 2000 मधील सिडनी ते 2016 मधील रिओ या कालावधीत एकूण पाच ऑलिंपिक स्पर्धांत सहभागी होत या 36 वर्षीय सायकलपटूने एकूण आठ पदके जिंकली आहेत.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

भारताची फुटबॉल संघ बांधणी मुंबईत तब्बल 61 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला गेला. शेवटचा सामना 1955 मध्ये भारत आणि सोव्हिएत युनियन यांच्यात झाला होता. गेल्या तीन सप्टेंबरला मुंबईत आंतरराष्ट्रीय फुटबॉल अवतरले. भारत आणि प्युर्टो रिको यांच्यातील मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामना अंधेरीत झाला.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

"लायटनिंग' वेगाची निवृत्ती पृथ्वीवरील सर्वांत वेगवान मानव असलेल्या उसेन बोल्ट याने रिओ ऑलिंपिकमध्ये लौकिकाला तडा जाऊ दिला नाही. बीजिंग, लंडनप्रमाणेच या वेळच्या ऑलिंपिकमध्येही त्याने तीन सुवर्णपदके जिंकली. "हॅटट्रिकची हॅटट्रिक!' साधली. सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांत अपराजित राहिलेला उसेन बोल्ट हा क्रीडाक्षेत्रातील महान ऍथलिट. रिओ ऑलिंपिकपूर्वी या वेगवान धावपटूस "हॅमस्ट्रिंग'ने सतावले होते.

Monday, September 05, 2016 AT 12:00 AM (IST)

विश्‍वविक्रमी धावपटू व्हॅन निकेर्क रिओतील "इस्तादिओ ऑलिंपिका'वर तब्बल सतरा वर्षे अबाधित राहिलेला विक्रम धारातीर्थी पडला. दक्षिण आफ्रिकन धावपटू वेईड व्हॅन निकेर्क याने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्‍वविक्रमास गवसणी घालताना ऑलिंपिक सुवर्णपदकही पटकाविले. 1999 मध्ये स्पेनमधील सेव्हिले येथे अमेरिकेच्या मायकेल जॉन्सन याने 43.18 सेकंद ही विक्रमी वेळ नोंदविली होती. तेव्हापासून या विक्रमाच्या जवळपास फिरकणे एकाही धावपटूस शक्‍य झाले नव्हेत.

Monday, September 05, 2016 AT 12:00 AM (IST)

"बीसीसीआय' बनणार शिस्तबद्ध भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2016 वर्ष क्रांतिकारी असेल. वाह्यात मुलाप्रमाणे वागणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाने शिस्तीचा पाठ घालून दिला आहे. आता "बीसीसीआय'ला शिस्तबद्ध मुलाप्रमाणे वागावेच लागेल, नाहीतर कायद्याच्या रुद्रावतारास सामोरे जावे लागणार आहे.

Monday, August 01, 2016 AT 12:00 AM (IST)

हॉकीतील पदकाची अपेक्षा ऑलिंपिक हॉकीच्या इतिहासात भारताची गौरवशाली परंपरा आहे. भारतीयांनी पुरुष हॉकीत एकूण आठ ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकली आहेत. मात्र सध्या जुना इतिहास उगाळण्यात, तसेच गतस्मृतींना उजाळा देण्यातच जास्त वेळ जातो. ऑलिंपिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक 1980 साली मॉस्कोत मिळाले. त्यानंतर गेल्या 36 वर्षांत ऑलिंपिकच्या वैभवशाली मैदानावरून भारतीय हॉकी संघाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

मेस्सीला "रेड कार्ड' फुटबॉलमधील "सुपरस्टार' लिओनेल मेस्सी "स्वयंगोल'मुळे आर्थिक गुन्हेगार ठरला आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथील न्यायालयात करचुकवेगिरीचा आरोप सिद्ध झाल्यामुळे मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना 21 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. मेस्सीला दोन दशलक्ष युरोंचा, तर वडिलांना दीड दशलक्ष युरोंचा दंड भरावा लागेल. फुटबॉल मैदानावरील लोकप्रिय मेस्सीसाठी हे नामुष्कीजनक "रेड कार्ड'च आहे.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

सेरेना आणि अँडी मरेचा ठसा सेरेना विल्यम्सने अखेर स्टेफी ग्राफला गाठले. या वर्षी तिला ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र सलग तिसऱ्या प्रमुख स्पर्धेची अंतिम फेरी गाठत या 34 वर्षीय खेळाडूने 22वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळविले. विंबल्डनच्या नयनरम्य हिरवळीवरील सेरेनाचे हे एकंदरीत सातवे विजेतेपद ठरले. 81 मिनिटांच्या खेळात झुंजार सेरेनाने जर्मनीच्या चौथ्या मानांकित अँजेलिक केर्बर हिचा 7-5, 6-3 असा पाडाव केला.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

ली चोंग वेईची जबरदस्त मुसंडी समर्पित वृत्ती आणि कणखर निर्धार या बळावर मलेशियन बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने जागतिक पातळीवर जबदस्त मुसंडी मारली आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर निलंबन लादले गेले, नंतर मागील तारखेने त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी आली. साऱ्यांना वाटले, या बॅडमिंटनपटूची कारकीर्द संपली. सलग 199 आठवडे अव्वल स्थानी राहिलेला हा दिग्गज बॅडमिंटनपटू.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

  धेंपो क्‍लबचे "कमबॅक' एकूण पाच वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविलेला गोव्यातील मातब्बर फुटबॉल संघ धेंपो स्पोर्टस क्‍लबसाठी 2014-15 मोसम अतिशय खराब ठरला. त्यांनी फेडरेशन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली पण आय-लीगमध्ये पणजीतील हा संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. परिणामी त्यांची आय-लीग स्पर्धेतून पदावनती झाली. त्या मोसमात वीसपैकी फक्त तीनच सामने त्यांना जिंकता आले. या प्रतिथयश क्‍लबसाठी ही मोठी नामुष्कीच ठरली.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

  "क्‍ले कोर्ट' यशाचा आनंद सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हा टेनिसमधील सध्याचा अव्वल क्रमांकाचा पुरुष खेळाडू. गेल्या वर्षी तो तीन ग्रॅंडस्लॅम स्पर्धांत जिंकला, फ्रेंच ओपनच्या "क्‍ले कोर्ट'वर त्याला स्वित्झर्लंडच्या स्टॅन वाव्रिंका याने हरविले होते. रोलॉं गॅरोवरील अपयश त्याला नेहमीच सलत होते. या वर्षी मात्र त्याची स्वप्नपूर्ती झाली. तीन वेळा अंतिम लढतीत हरल्यानंतर त्याने मातीच्या कोर्टवर पहिले ग्रॅंडस्लॅम यश साजरे केले.

Saturday, June 18, 2016 AT 12:00 AM (IST)

पेनांची कलरफुल दुनिया बाजारात विविध प्रकारचे पेन बघितले की, त्यातील एखादा विकत घेण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. गृहपाठ, निबंधाच्या वह्या, प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या पेनांची गरज भासते. ब्रॅंड आणि वैशिष्ट्यांनुसार त्यांची किंमत दोन रुपयांपासून काही हजारांपर्यंत असते. अभ्यासासह विविध कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेनांविषयी...

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

द ग्रेटेस्ट महंमद अली... आयुष्यातील प्रत्येक रिंगणात हा बॉक्‍सर महान, "द ग्रेटेस्ट' ठरला. या कर्तृत्वसंपन्न महंमद अलीने व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये अजरामर ठसा उमटविलाच, जीवनातील प्रत्येक कडवट अनुभवांना कणखरपणे सामोरे जात जबरदस्त ठोसे लगावले आणि विजयश्रीही मिळविली.... "आय एम द ग्रेटेस्ट...' अशी आरोळी महंमद अली यांनी बॉक्‍सिंग रिंगमध्ये ठोकली, ती केवळ पोकळ नव्हती किंवा प्रतिस्पर्ध्यांना घाबरविण्यासाठी नव्हती.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: