Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
"सुवर्णपदक' "सुयश अर्जुन काळे' आजच्या दीक्षान्त समारंभाचं विशेष आकर्षण ठरला. त्याला मेडिकल क्षेत्रात सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्याने जे भाषण केलं ते विशेष अवर्णनीय ठरलं. आजचं त्याचं मिळालेलं हे यश त्याने आपल्या आई-वडिलांना अर्पण केलं होतं, नकळत आईच्या डोळ्यांतून आसवांचा पूर सुरू झाला होता. त्यातले काही अश्रू आनंदाचे, तर काही पश्‍चात्तापाचे होते. तिने सुयशला कधीच आपलं मानलं नव्हतं. अर्जुन आणि अंकिताला अक्षय आणि अवनी अशी दोन मुलं होती.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

सोबत जवळजवळ आठवडा होत आला होता. जानू आपला नवरा शंकरबरोबर गावोगावी फिरत होती. रस्त्याच्या कडेला कुठं काम मिळालं तर करत होती. काम नाही मिळालं तर ओंजळभर पाणी पिऊन रस्ता चालत होती. तिच्यावर फार मोठी मेहेरबानी करून नाही म्हणायला तिच्या सासूनं नवऱ्यासोबत तिला एक गाढव दिलं होतं. आपलं जुनंपुराणं त्या गाढवावर लादून ती शंकरसोबत चालत होती. तिचा नवरा शंकर तिच्यासोबत होता पण घर सोडल्यापासून तो तिच्याशी एक अक्षरही बोलला नव्हता.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

मुलांच्या आवडीच्या 303 चविष्ट रेसिपीज किंमत 200 रु. पाने 166, मेनका प्रकाशन मुलांच्या रेसिपीजमध्ये कांचन बापट हे नाव आता चांगलंच स्थिरावलंय. काही दिवसांपूर्वीच त्यांचं मुलांच्या आवडीच्या 303 चविष्ट रेसिपीज हे पुस्तक प्रकाशित झालं. "मुलांच्या डब्यासाठी 404 पौष्टिक रेसिपीज नंतरचे हे त्यांचं दुसरं पुस्तक. 404 रेसिपीज या पुस्तकात डब्यासाठी योग्य असणाऱ्या काही पारंपरिक, तर काही इनोव्हेटिव अशा रेसिपीज होत्या.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

हरवले ते गवसले वडिलांचे छत्र हरवलेली पाच-सहा वर्षांची मिठ्ठू सायलीची एकुलती एक लेक. सायली मिठ्ठूला अगदी डोळ्यात तेल घालून जपत असे. शिक्षिकेची नोकरी, घराची जबाबदारी आणि मिठ्ठू या तिहेरी जबाबदाऱ्यांमुळे सायली कधी कधी थकून, शिणून, चिडचिडून जाई. आज रविवार असल्यानं दोघींनाही सुटी म्हणून सायलीने घराची साफसफाई काढली होती. एकीकडे मिठ्ठूचा अभ्यासही घेत होती. मिठ्ठूचा अभ्यास आटोपत आला तसा, सायली किचनमध्ये स्वयंपाकाच बघण्यास गेली.

Saturday, June 18, 2016 AT 02:10 PM (IST)

तडजोड कल्याणला असताना हरदासवाडी या चाळीत मी राहत होतो. वाडीपासून जवळच वडा-पिंपळाचे डेरेदार वृक्ष, हिरवळ व खूप शांतता त्या परिसरात पसरलेली असायची. एके दिवशी माझ्या असे लक्षात आले, की एक वृद्ध रोज सकाळी नऊ-साडेनऊपासून या हिरवळीवर बसण्यासाठी येत आहेत. झाडाच्या सावलीत गारव्याला बसत आहेत व सकाळचे वाचून झालेले वृत्तपत्र अंथरुण त्यावर चक्क झोपत आहेत.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

  भूमिका... "बाबा प्लीज मला मॅनेजमेंट करायचं आहे. इव्हेंट मॅनेजमेंट, मग एक मंगल कार्यालय' खूप वेगळ्या ऍक्‍टिव्हिटीज...कॉलेजचा इव्हेंट खूप छान मॅनेज केला म्हणून मला बक्षीसपण मिळालेय, यू नो ना बाबा. ऐक ना "...' तुझा फॉर्म भरतो आहे ! प्रवेशपरीक्षेच्या तयारीला लागायच आहे. ओके... क्‍लोज द मॅटर नाऊ. "अविनाश नेहमीच्या शांत, पण जरबी आवाजात बोलला. हा बापलेकीचा संवाद (का विसंवाद) मी महिनाभर ऐकत होते.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

वेंधळी (ळे) वसंतरावांचा सकाळचा थोडासा निवांतपणा, ऑफिसला जाण्यापूर्वीचा. फिरून येऊन पेपर वाचण्याचा. वासंतीबाईंची सकाळची गडबड संपली होती. भाचीच्या लग्नाला उद्या पुण्याला जायचं आहे. तोच डोक्‍यात विचार. आठवल्यासारखं त्यांची कपाट उघडून शोधाशोध सुरू होती. छोट्याशा डबीत ठेवलेलं गाठवलेलं मंगळसूत्र, अंगठी, कानातलं, बांगड्या लग्नात घालण्यासाठी न्यायचं त्यांनी ठरवलं होतं. एरव्ही घालायला मिळत नाही चोरीच्या भीतीनं. कपाटाचा कोपरान्‌ कोपरा शोधला.

Thursday, May 12, 2016 AT 12:00 AM (IST)

कसं शक्‍य आहे? महेंद्रची बदली झाल्याने त्याला आता पुणे सोडावे लागणार होते. पुण्यात तो आणि त्याचे आई- बाबा, असे लहानसे कुटुंब! पण कुटुंब लहान असले तरी घर मात्र मोठे होते. शिवाय नोकरीला जाण्या- येण्यासाठी बाबांची गाडीही होती. आता मात्र हे सगळं सोडून एका लहानशा गावात बस्तान बसवावे लागणार होते, तेही एकट्याला. महेंद्र रुजू होण्याच्या दोन दिवस आधीच बदली झालेल्या गावी पोचला राहण्याची आणि पोटाची सोय पाहायला.

Monday, March 07, 2016 AT 12:00 AM (IST)

विंडीज क्रिकेटमधील "शिव' वेस्ट इंडीज क्रिकेटने दर्जेदार आणि विश्‍वविक्रमी फलंदाज दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिवनारायण चंदरपॉल. शिव हा डावात विश्‍वविक्रमी 400 धावा करणाऱ्या ब्रायन लारा याचा समकालीन फलंदाज, पण त्याला लाराप्रमाणे लोकप्रियता आणि "स्टार'पद लाभले नाही. विंडीज क्रिकेटमध्ये शतके आणि धावांच्या यादीत तो लारानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आणखी संधी न मिळाल्यामुळे तो लाराचे अग्रस्थान हिरावू शकला नाही.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

आई... येतेय... ""अगं शोभा आत्ताच आईचा फोन आला होता. आई 8 दिवसांसाठी आपल्याकडे येतेय.'' ""अरे बाऽपरेऽ अहोऽ आई येणार म्हणजे...'' ""का गं? असं आश्‍चर्याने काय विचारतेस. अगं फक्त 8 दिवसांसाठीच येणार आहे.'' ""तुमचं ठीक आहे हो. मला ना जाम टेन्शन येतं, म्हणजे आईंची भीती नाही वाटत, पण मनावर ना एक प्रकारचं दडपण येतं.'' ""शोभा, आपल्या लग्नाला चांगली 10, 12 वर्षे झालीत. पूर्वी आपण सगळे एकत्रच होतो. त्या वेळी नाही कधी तुला दडपण, भीती वाटली.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

सदाफुली बराच वेळ कॉलबेल वाजवूनही दार उघडले गेले नाही, तेव्हा पलाश स्वतःजवळच्या लॅच कीने दार उघडून आत गेला. हॉल, बेडरूम, कीचन सगळीकडे पाहत पाहत तो मागच्या गॅलरीत पोचला. निकिता तिथे बसली होती. पलाश आल्याचे तिला कळलेसुद्धा नाही. ""तू इथे काय करते आहेस एकटी?'' पलाशने विचारले, तेव्हा निकिताचे लक्ष गेले. ""एकटी कुठे? मी आहे ना माझ्याबरोबर.'' ""अच्छा, अच्छा म्हणजे तुमचा स्वसंवादाचा तास चाललाय काय मॅडम.'' ""पलाश, चांगले विनोद करतोस आजकाल.

Monday, January 11, 2016 AT 12:00 AM (IST)

कमिटमेंट पक्ष्यांच्या चिवचिवाटाची ट्यून वाजली आणि मनीषनं झोपतच टेबलावरचा मोबाईल उचलला. गजर बंद करून नेहमीच्या सवयीनं किलकिल्या डोळ्यांनी "व्हॉट्‌सऍप' सुरू केलं. अपेक्षित असलेले सगळे मेसेजेस पाहून त्याच्या गालावर स्मित उमटलं. रात्री त्यानं टाकलेलं स्टेटस पाहून त्याच्या "सख्या ग्रुप'वर जोरदार चर्चा चालू होती.

Monday, January 04, 2016 AT 12:00 AM (IST)

नियतीचे चक्र ""अरे, गणू बागेतली फुलं तोडलीत का? सगळ्या फोटोंना छान हार कर आणि थोडी फुलं पुजेकरिता राहू दे. बरं का?'' अनुराधा बाई माळ्याला हाक मारून सांगत होत्या. आज आशीर्वाद बंगल्यावर आणि जवळच सुखकर्ता बंगल्याला विजेची रोषणाई केलेली होती. सगळीकडे वेगवेगळे रंगीत प्रकाशझोत लावले होते. सनईचा मंद स्वर निनादत होता. नातलग, पाहुणे, मित्र मंडळी आवर्जून आली होती. स्त्रिया, मुले सर्व जण नवीन कपडे घालून मिरवत होते.

Monday, December 14, 2015 AT 12:00 AM (IST)

मोजडीवाला "मोजडी ले लो, जूते ले लो साब...!' देवळाच्या डावीकडील बाजूस मांडलेल्या दुकानांपैकी एका चपलेच्या दुकानातून लहान पोरगा ओरडत होता. जत्रेतली गर्दी क्षणोक्षणी वाढत होती. ""बाबा, मोजडी...'' शौनकने दुकानाकडे हात दाखवत हट्ट सुरू केला. ""अरे, मग घेऊ कधीतरी, अगोदरच तुझ्याकडे ढीगभर बूट आहेत..'' शर्वरीच्या कडेवर बसलेल्या शौनकची समजूत शशिकांत काढू लागला. पण छे, हातातल्या जिलेबीचा तुकडा मटकन्‌ गिळत, शौनकने तांडव सुरू केले.

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

प्रेममूर्ती डॉ. सु. ल. दबडगावकर "माय मरो, पण मावशी जगो' ही म्हण सार्थ ठरवणारी माझी अनसा मावशी गेल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं. पासष्ट वर्षांचं तिचं आयुष्य स्वत:साठी नव्हे, तर इतरांसाठी जगण्यात गेलं. तिच्या ठायी असलेली निर्व्याज माया अनमोल होती.... मावशीचं गाव "आडगाव' हे खऱ्या अर्थानं आडगावच होतं. कोणत्याही रस्त्यानं गेलं तरी किमान पाच-सहा मैल पायी जावं लागे.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

तळ्यात - मळ्यात साधना बोडस दिवेलागणीची वेळ. आम्ही भावंडं झोपाळ्यावर बसून शुभंकरोति म्हणत होतो. एवढ्यात रडवेल्या सुरांत हाका ऐकू आल्या, ""ए दुर्गाताई, भाऊ, मारतात रे मला... हाकलतात कुत्र्यासारखं...आई गं...'' हाकांपाठोपाठ कळवळत केशव दारात उभा राहिला. बाबांनी "ये रे केशव' असं म्हणत त्याला घरात घेतलं. आईनं त्याला पाणी आणून दिलं. घटाघटा पाणी प्यायल्यावर तो थोडासा शांत झाला. आईनं त्याला गरम पाणी देऊन अंघोळ करायला लावली.

Sunday, August 30, 2015 AT 12:00 AM (IST)

या चिमण्यांनो, परत फिरा रे.... शुभांगी पासेबंद मध्यंतरी पेपरमध्ये वाचलं, भारत हा तरुणांचा देश आहे. पण आम्ही जिथे राहतो, तिथे सगळे म्हातारेच राहतात. म्हातारे आईबाप आणि जुन्या काळची घरं. घरातील तरुण पिढी परदेशी गेली आहे. त्यातल्या कुणालाच परत यायचे नाही. नाइलाज झाला तरी ते परत फिरायचे टाळतात. त्यांना हा देश "भविष्यहीन' वाटतो. त्यांना वाटतं, इथे वाढ फक्‍त लोकसंख्येत.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

मिशन इम्पॉसिबल चेन्नईहून निघालेले जेटचे विमान अंदमानजवळ येताच विमानाच्या खिडकीतून दिसणारे खालचे दृश्‍य बदलू लागले. निळ्याशार समुद्रामध्ये हिरव्यागार झाडीने झाकलेली बेटांची जमीन दिसू लागली. वरच्या अर्ध्या भागातले निळे आकाश थोडे फिकट आणि समुद्राचे निळेपण दाट! या निळ्या छटा आणि हिरवेगार बेटांचे ठिपके... एवढं छान दिसत होतं ना! जयने बाजूला पाहिले. त्याची मित्रमंडळी झोपली होती.

Saturday, August 08, 2015 AT 12:00 AM (IST)

  निर्णय आज सकाळपासूनच नंदिनी विचारात होती. काल रात्री वीरेनचा फोन आला होता. तो म्हणाला, ""नंदू, मला बॉस म्हणाला, तुला भारतात परत जायचं असेल तर ते आत्ताच शक्‍य आहे. आपली कंपनी दोन नवीन प्रोजेक्‍टस्‌ सुरू करत आहे. एक इथे आणि एक भारतात. सो.. यू हॅव चॉइस. बट इफ यू वॉंट टू बी हिअर, यू आर वेलकम ऍज वेल. काय करूया? मी आठ दिवसांत टूर संपवून येतोय. तोवर विचार कर. हवं तर ताईकडे जा. नाहीतरी पियूला सुटीच आहे. तुझ्या आणि माझ्या आईशीही बोल.

Saturday, August 08, 2015 AT 12:00 AM (IST)

लघुतम कथा ""अगं, पण मी म्हणते. माझी हरकत नाही वृद्धाश्रमात जायला. हे गेल्यावर मिळणारी पेन्शन पुरे आहे मला. मी राहीन व्यवस्थित...'' मी ओरडून सांगत होते आणि मनात म्हणत होते, तिकडे तरी निदान चार लोकांशी बोलायला मिळेल. एकमेकांच्या आधाराने पायांबरोबर मनही मोकळं करायला मिळेल. नाहीतरी इकडे या आउटहाउसमध्ये त्या फटकळ आणि सदैव वैतागलेल्या मोलकरणीशिवाय येतं कोण? मुलगा आणि सुनेला फिरकायला वेळ नसतो. नातू कुठे असतो कुणास ठाऊक? पोरगी विदेशी असते...

Monday, July 27, 2015 AT 05:40 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: