Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
जोतिराव ते भाऊराव मानवी जीवनाची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक, राजकीय अशी विविध क्षेत्रे असली, तरी ती एकमेकांशी संबद्ध असतात व एकमेकांवर प्रभाव पाडीत असतात. महाराष्ट्राच्या एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील इतिहासावर नजर टाकली तर असे दिसते, की या सर्व क्षेत्रांवर उच्च वर्णाच्या व जातींचा प्रभाव होता. हा प्रभाव वर्चस्व म्हणता येईल इतका परिणामकारक होता.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

ब्राह्मणेतरांची वैदिक विद्यालये - डॉ. सदानंद मोरे अपेक्षित व वांछनीय असे धार्मिक अधिकार नाकारल्या गेलेल्या समाजाला ते प्राप्त व्हावेत, या उद्देशाने शाहू छत्रपतींनी क्षात्र जगद्‌गुरू पीठाची स्थापना केली. लोकांना परिचित असलेल्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी क्षात्रियांसाठी वेगळी अशी शंकराचार्यांची गादी स्थापन केली.

Monday, May 01, 2017 AT 12:00 AM (IST)

प्रबोधनकारांचा बुद्धिवाद सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळ यांचे प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या विश्‍लेषणाची चर्चा करताना एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. ठाकरे हे पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून विचार करतात. त्यामुळे एका बाजूला ते या चळवळीचे प्रवक्ते असलेल्या मुकुंदराव पाटलांचे भाषण - मुकुंदरावांची प्रशंसा करीत "प्रबोधन'मधून छापतात तर दुसरीकडे ते चळवळीच्या मर्यादाही दाखवून देतात.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

प्रबोधनकार व शेतकऱ्यांचे स्वराज्य प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांच्या भूमिकेची विशेष दखल घ्यायचे कारण म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीत कार्य करणाऱ्या इतरांपेक्षा त्यांचा दृष्टिकोन आणि विचारपद्धती इतरांपेक्षा एकदम वेगळी व उठून दिसणारी अशी आहे. या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे ब्राह्मणेतर ही काही एकजिनसी चीज नव्हे. ब्राह्मण नसलेल्या अनेक लहान-मोठ्या जातींचे समूह ब्राह्मणेतर या नावाने निर्दिष्ट होतात.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

राहून गेलेले बंदोबस्त शंकराचार्यांच्या पीठाशी समांतर व त्याला पर्याय ठरू शकणारे क्षात्र जगद्‌गुरू पीठ शाहू महाराजांनी निर्माण केले. ही निर्मिती म्हणजे एक प्रतिसृष्टीच होती असे मी "लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात म्हटले आहे. त्यामुळेच शाहू महाराजांची तुलना विश्‍वामित्र ऋषींशी करता येते, असेही माझे निरीक्षण आहे. विश्‍वामित्रांच्या आश्रयाला आलेल्या कल्मषपाद या राजाला स्वर्गात जायची इच्छा होती.

Monday, February 06, 2017 AT 12:00 AM (IST)

शंकराचार्यांचे अरण्यरुदन महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासाच्या मुख्य प्रवाहात ब्राह्मणेतर चळवळीला योग्य ते स्थान दिले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. जोतिराव फुले यांना योग्य स्थान मिळण्यासाठीसुद्धा बरीच वाट पाहावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. याची अनेक कारणे संभवतात. त्या सर्वांची चर्चा करायचे हे स्थळ नव्हे. तथापि, एक मुद्दा सांगावासा वाटतो.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

फुले आणि शाहू एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांमधील समाजसुधारकांपुढील सर्वांत गहन समस्या म्हणजे पारंपरिक हिंदू धर्माचे विशेषतः वैदिक धर्माचे काय करायचे. हा धर्म वेद आणि पुराणे यांच्यावर आधारित होता. स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यांच्यापैकी पुराणग्रंथावर काट मारून फक्त वेदांचा स्वीकार केला. त्यामुळे त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. जोतिराव फुले यांनी वेदांनाही नाकारले.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

जे का रंजले - सा.स.     (Word Count : 1326     CC : 96    Page Baskets: Saptahik_Sakal    Locations: -) जे का रंजले गांजले... जीवलग स्नेही बाबा महाराज पंडित यांना त्यांच्या मृत्युसमयी दिलेले वचन पाळण्यासाठी टिळकांनी केलेल्या आटापिट्यास "विकतचे श्राद्ध' असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. हे प्रकरण ताई महाराज म्हणून ओळखले जाते.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

शाहू-टिळक संघर्ष मित्रप्रेमातून? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह आणि छत्रपती शाहू या तिघांनी आपापले धार्मिक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी केलेल्या संघर्षांमधील साधारण बाब म्हणजे तिघांचीही पाठराखण करणाऱ्यांमध्ये चांद्रसैनीय कायस्थ प्रभूंची विशेष भूमिका होती. त्याचे एक कारण म्हणजे कायस्थ प्रभूही स्वतःला क्षत्रिय समजत असले तरी ब्राह्मण त्यांचा हा दावा मान्य करायला तयार नसणे हे असू शकते.

Monday, August 29, 2016 AT 12:00 AM (IST)

नकारात्मक स्व-संवाद.. नकोच! आपण सकाळी उठल्यापासून सतत आपल्या स्वतःशी मनातल्या मनात बोलत असतो. जणू काही स्वतःशीच हा संवाद असतो. हा स्व-संवाद जर नकारात्मक असेल तर त्याच्या मुळाशी बऱ्याचदा नकारात्मक विचार असतात. बहुधा हे मनात आपोआप येणारे नकारात्मक विचार असतात. म्हणजेच निगेटिव्ह ऑटोमॅटिक थॉट्‌स (NAT). अशा विचार करण्याच्या पद्धतीची जणू आपल्याला सवयच होऊन जाते. आपल्या नकळत मग असा नकारात्मक (निगेटिव्ह) स्व-संवाद (सेल्फटॉक) चालू राहतो.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

इजा, बिजा आणि तिजा डॉ. सदानंद मोरे वेदोक्ताच्या अधिकाराची चळवळ ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. याची सुरवात खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रकरणापासूनच झाली. खुद्द छत्रपतींच्याच घराण्यात त्याची पुनरावृत्ती शाहू छत्रपतींच्या अगोदर झाली होती ती सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह महाराज्यांच्या काळात! या सर्व इतिहासाची उजळणी आता होऊ लागली. कोणीही उठावे आणि मत व्यक्त करावे असे होऊ लागले.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

वेदोक्ताच्या काट्याचा नायटा "व्यक्ती तितक्‍या प्रकृती' हे वाक्‍य आपल्या भाषेत एखाद्या म्हणीसारखे रुजले आहे. इतकेच काय तर "हाताची पाची बोटे सारखी नसतात' या म्हणीशीही आपण चांगलेच परिचित आहोत. अशा समजुती समानता नाकारून विषमतेचा पुरस्कार किंवा समर्थन करणाऱ्या आहेत, असे कोणी म्हणत असेल, तर ती गंभीर चूक ठरेल. पाच बोटे तर सोडाच, सख्ख्या भावंडांचेही जाऊ द्या, अगदी जुळ्या भावंडांमध्येसुद्धा सारखेपणा नसतो.

Monday, August 08, 2016 AT 12:00 AM (IST)

सत्यशोधक पंडित! महात्मा जोतिराव फुले यांच्या पश्‍चात सत्यशोधक समाजाचा किल्ला लढवण्याचे काम सामुदायिकरीत्या झाले. जोतिरावांच्या नेतृत्त्वाची पोकळी भरून काढणारे त्यांच्या तोलामोलाचे व्यक्तित्व लगेचच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा करणेही चुकीचेच ठरेल. इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा अनुभव येतच नाही, असे नाही पण एक तर ती लगेचच होईल असे नाही आणि दुसरे असे, की परमेश्‍वराने महापुरुष निर्माण केल्यानंतर त्याचा साचा तो मोडून टाकतो, असेही म्हटले जाते.

Monday, August 01, 2016 AT 12:00 AM (IST)

दयानंद, फुले आणि शाहू   महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या प्रश्‍नात "वेदप्रामाण्य' हा नेहमीच कळीचा विषय राहिला होता. वेदप्रामाण्य पूर्णपणे झुगारून देऊन वेगळा विचार मांडण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून झाल्याचे दिसून येते. चार्वाक, महावीर, बुद्ध ही झाली अगदी प्राचीन काळातील नावे. मध्ययुगीन कालखंडात लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्‍वर आणि महानुभवपंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांची नावे या संदर्भात घेता येतात.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

काळाच्या मर्यादा "मराठा' आणि "केसरी' ही पत्रे काढून टिळक आगरकरांनी सार्वजनिक जीवनात खऱ्या अर्थाने पाऊल टाकले तेव्हा त्यांच्यासमोर नेमक्‍या कोणत्या सामाजिक आणि राजकीय कृती करायच्या, याविषयी निश्‍चित अशी योजना असायचे कारण नव्हते. लोकहिताच्या गोष्टी करायच्या हे नक्की होते आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना हा त्याचाच एक भाग होता, मात्र शाळेचे क्षेत्र अपुरे पडत आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी वृत्तपत्रे काढली, त्याचप्रमाणे कॉलेजही (फर्गसन) सुरू केले.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

सर्वांत अवघड गोष्ट! कॉंग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली आणि राजकीय चळवळीला एक देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध झाले. आपण संपूर्ण देशातील जनतेचे प्रतिनिधित्व करीत असून, जनतेच्या वतीने सरकारशी बोलत आहोत, असा कॉंग्रेसचा दावा होता. कॉंग्रेसचा हा दावा विशेषतः मुसलमानांना मान्य नव्हता. कॉंग्रेस ही फक्त हिंदू धर्मीयांची प्रतिनिधी असल्याचा दावा सर सय्यद अहमद खान यांनी केला.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

सामाजिक सुधारणांची पीछेहाट टिळकांच्या गोटातून फुटून आगरकर उघडपणे रानड्यांच्या छावणीत दाखल झाले तेव्हा त्यांच्याबरोबर आणखी एक महत्वाचे नेते होता. ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधील अंतर्गत संघर्षात गोपाळराव टिळकांच्या विरुद्ध म्हणजे आगरकर यांच्या पक्षात होते. आगरकरांनी "केसरी'चा राजीनामा देऊन आपले स्वतंत्र "सुधारक' पत्र सुरू केले तेव्हाही गोखले आगरकरांबरोबर होते.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

सुधारक आणि त्यांच्या मर्यादा शेवटी समाजसुधारणांचे किंवा एकूणच सामाजिक कार्याचे क्षेत्र इतके व्यापक आहे, की कोणालाही सर्वच्या सर्व समस्या एकाच वेळी हाताळणे व्यवहारात शक्‍य नसते. निवड करावीच लागते. प्राधान्यक्रम निश्‍चित करावा लागतो, तो करताना कोणच्या सूत्राला धरून केला जातो हे महत्त्वाचे असते. लोकहितवादी फुले, आगरकर, आंबेडकर अशा महापुरुषांचे लेखन वाचताना एका गोष्टीची नेहमीच खंत वाटते.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

आशावाद की अरुण्यरुदन?   जातिभेदामुळे आपल्या समाजाची अवनीती झाली हे ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर सांगतात. ते म्हणतात की, एकीकडे कॉंग्रेसचे अधिवेशन लंडनमध्ये भरवण्याचे बेत करायचे आणि दुसरीकडे स्वदेशातील स्वधर्मीय शूद्रांना विषमतेची वागणूक द्यायची हा दुटप्पीपणा आता चालणार नाही. ते पुढे म्हणतात, ""शहाणे असाल तर आमचे ऐका. यावर तुमचे ते सोवळे तुम्हास खुंटीवरच टांगून ठेवले पाहिजे. आता यापुढेही अविचाराची बेबंद पातशाही चालणार नाही.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

आगरकरकालीन विचारप्रवाह गोपाळ गणेश आगरकर यांच्या सामाजिक विचारांची मीमांसा करताना तत्कालीन वैचारिक वातावरणात सुधारणांचे (सुधारणाविरोधाचेही) कोणकोणते प्रवाह वाहत होते याचा उल्लेख करून ती करता येईल. समाजातील उच्चशिक्षितांनी काढलेल्या रानडे-भांडारकरांचा प्रार्थना समाज हा पहिला प्रवाह होय. प्रार्थना समाजाचे लोक नेमस्त राजकारण व नेमस्त समाजकारण करणार होते. त्यांना नरम सुधारक असे म्हटल्यास (हा तेव्हाचाच शब्द) आगरकरांना गरम सुधारक असे म्हणता येईल.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

आगरकरांचे हिंदुत्व! आगरकर हे आमच्यासारखेच प्रखर राष्ट्रीय विचारांचे असून, त्यांना गुलामगिरीचा आमच्या इतकाच तीव्र तिरस्कार वाटतो, अशा अर्थाची विधाने टिळकांनी केलेली आहेत व ती खरीही आहेत. मग दोघांच्यात फरक उरतो? पहिली गोष्ट अशी, राजकीय स्वातंत्र्य ही टिळकांसाठी प्राधान्यक्रमाची व तातडीची बाब होती. त्यामुळेच ते ज्या कोणत्या मार्गाने मिळवणे शक्‍य होईल, त्या मार्गाचा उपयोग करून मिळवण्यात टिळकांना काही गैर वाटत नसे.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

स्वातंत्र्याचा योग आणि क्षेम आगरकर आणि टिळक यांनी अनुक्रमे "केसरी' आणि "मराठा' ही मराठी आणि इंग्रजी पत्रे सुरू केली, तेव्हा "निबंधमाला' या मासिक पुस्तकाचे उत्पादक व संपादक विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांच्या समवेत होतेच. ते "केसरी'च्या संपादक मंडळातही होते. सुरवातीला शाळा काढण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांमध्ये तेच ज्येष्ठ व पोक्त असल्यामुळे त्यांच्याविषयी इतर सहकाऱ्यांना पूज्यताबुद्धी होती.

Monday, April 25, 2016 AT 12:00 AM (IST)

सामाजिक परिषदेची हकालपट्टी एकोणिसाव्या शतकामधील महाराष्ट्रात सुधारणांच्या चर्चेसाठी अनेक बोलके व कर्ते सुधारक पुढे सरसावले. सुधारक या नावाचा नवा वर्गच निर्माण झाला. त्यालाच विषय करून प्रसिद्ध कवी माधव ज्युलियन यांनी नंतर "सुधारक' नावाचे खंडकाव्यच लिहिले. म्हणजेच या सुधारकांची, त्यांच्या सुधारणाविषयक कल्पनांची व प्रत्यक्ष कृतीची दखल साहित्य क्षेत्रातही घेतली जाऊ लागले, असे निश्‍चितपणे म्हणता येते.

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

टिळकांची खेळी ?  भारतीय समाजव्यवस्थेत (हिंदू आणि मुसलमान या दोघांच्याही) हस्तक्षेप करून काही सुधारणा परकीय ब्रिटिश सत्तेने स्वयंप्रेरणेने केल्या होत्या. त्यात काही भाग ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधांचा होता हे उघड आहे. विशेषतः कायद्यात केलेल्या बदलांच्या बाबतीत तरी असे निश्‍चितपणे म्हणता येते. हिंदुस्थानसारखा भौगोलिकदृष्ट्या खंडप्राय देश.

Monday, April 04, 2016 AT 12:00 AM (IST)

टिळक विरुद्ध आगरकर आगरकर रानड्यांच्या नेमस्त छावणीत प्रविष्ट झाले असते, तरी राजकीय अंतरंगाने ते आपल्याजवळ असल्याची जशी टिळकांची खात्री होती तशीच टिळकांनी व्यावहारिक सवंग कारणांमुळे सनातनी कंपूशी घरोबा केला असून, सामाजिक अंतरंगाने ते आपल्याच जवळ असल्याची आगरकरांची खात्री होती. या दोघांनाच एकमेकांच्या आकलनांमधील साम्याचे आश्‍चर्य वाटते! ज्यांना "समाज सुधारक' म्हणून संबोधता येते असे अनेक थोर पुरुष भारतात आणि महाराष्ट्रात होऊन गेले.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

आगरकरांचे सल्ले वर्ण-जातीविरहित राष्ट्राने वर्ण-जातीच्या समाजाला जिंकून गुलाम केले तर त्या समाजाने आपले स्वातंत्र्य परत कसे मिळवायचे, हा प्रश्‍न केवळ स्वातंत्र्य कसे मिळवायचे, या प्रश्‍नापेक्षा अधिक गंभीर व जटिल आहे.

Monday, March 14, 2016 AT 12:00 AM (IST)

बळी तो कान पिळी' एकीकडे मिलचे उपयुक्ततावादी नीतिशास्त्र, दुसरीकडे कोंतचाज्ञानउत्क्रांतिवाद आणि तिसरीकडे स्पे-सर यांचा सामाजिक डार्विनवादी संघर्षात्मक उत्क्रांतिवाद अशा त्रिकोणात्म विचारपद्धतीचा अवलंब करून आगरकरांनी समकालीन समाजाची समीक्षा करायला सुरवात केली, तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, की ही समाजव्यवस्था धर्मव्यवस्थेने नियंत्रित होत आली आहे. त्यामुळे कोणतीही सामाजिक सुधारणा करायची झाल्यास धर्माला हात लावणे आवश्‍यक ठरते.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

आगरकरांचे तत्त्वज्ञान गोपाळ गणेश आगरकर या नावाचे समाजसुधारणा या गोष्टीशी इतके तादात्म्य झाले आहे, की एकाचे नाव घेतल्यावर दुसऱ्याची आठवण होते. आगरकरांना (व एकूणच समाजसुधारकांना) त्यांच्या हयातीत बराच त्रास झाला. त्यांचे कार्य ज्यांनी त्यांना असा त्रास दिला त्यांच्यासह सर्व समाजासाठी होते. ज्यांनी त्रास दिला त्यांचेच वारसदार या सुधारणांची फळे चाखताना पाहिले म्हणजे इतिहासाला हास्य रसही वर्ज्य नाही याची खात्री पटते.

Monday, February 01, 2016 AT 12:00 AM (IST)

"शहाणे असाल, तर आमचे ऐका' लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील कलहाचा वैयक्तिक पदर बाजूला ठेवून त्यातील केवळ वैचारिकतेची चर्चा करणे शक्‍य आहे. या दोन महापुरुषांच्या परस्परसंबंधांचा वेध डॉ. य. दि. फडके यांनी "शोध बाल गोपाळांचा' या पुस्तकात फार चांगल्या रीतीने घेतला आहे. त्यात व्यक्तिगत संबंधांबरोबर वैचारिक संघर्षाची दखल घेण्यात आली आहे. डॉ. य. दि.

Monday, January 11, 2016 AT 12:00 AM (IST)

इतिहासातील चुकलेल्या वाटा टिळक आणि आगरकर यांच्या स्नेहाची, सहकार्याची आणि संघर्षाची कथा मराठी माणसात एका आख्यायिकेच्या रूपात दृढ होऊन बसली आहे. तिचे उदात्तीकरणही करण्यात येते. राम गणेश गडकरी या प्रसिद्ध नाटककारांच्या "एकच प्याला' या नाटकात टिळक आणि आगरकर यांच्यातील भांडणाला "नक्षत्रांची शर्यत' असे म्हटले आहे. पण या शेऱ्यातून हाताला काहीच लागत नाही. अलीकडच्या काळात "रणांगण'कार विश्राम बेडेकर यांनी "टिळक आणि आगरकर' याच शीर्षकाचे नाटक लिहिले.

Monday, January 04, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: