Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
अागळीवेगळी लेणी नितांत सुंदर आणि रांगड्या अशा सह्याद्रीला लेण्यांच्या रूपाने नटवले गेले हे आपण पाहिलेच. वस्सावास म्हणजेच वर्षाकाळात बौद्ध भिक्‍खूंच्या निवासाची सोय या गरजेतून निर्माण झालेले लयनस्थापत्य पुढे अगदी मंदिरापर्यंत विकसित झालेले पाहायला मिळते. बौद्ध धर्मीयांसोबत पुढे जैन आणि हिंदू लेणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कोरलेल्या पाहायला मिळतात.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

लेणी सह्याद्रीची नितांत सुंदर आणि रांगड्या अशा सह्याद्रीला लेण्यांच्या रूपाने नटवले गेले हे आपण पाहिलेच. वस्सावास म्हणजेच वर्षाकाळात बौद्ध भिक्‍खूंच्या निवासाची सोय या गरजेतून निर्माण झालेले लयनस्थापत्य पुढे अगदी मंदिरापर्यंत विकसित झालेले पाहायला मिळते. बौद्ध धर्मीयांसोबत पुढे जैन आणि हिंदू लेणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कोरलेल्या पाहायला मिळतात.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

सह्याद्रीचे सौंदर्यलेणे  दुर्गांपलीकडचा सह्याद्री बघताना आपण घाटवाटा बघितल्या. त्यांचे प्रयोजन आणि त्यांनी जागोजागी घडवलेला इतिहास बघितला. व्यापार, दळणवळण आणि कालांतराने सामरिक उद्देशांनी विविध घाटमार्गांची निर्मिती मानवाने केली. सह्याद्रीचा अगदी पुरेपूर वापर यासाठी केलेला दिसतो. अजस्र आणि अफाट असा सह्याद्री या घाटवाटांनी उल्लंघून जाण्यास मोठीच मदत झालेली दिसते.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

इतिहास घडवणाऱ्या घाटवाटा आशुतोष बापट ---------------------- सह्याद्रीने महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास दिला असे म्हटले तर वावगे ठरू नये. या देखण्या पर्वतामुळे आपल्या राज्याचा इतिहास उजळून निघाला. हा इतिहास निर्मिण्यामागे जशा अनेक राजसत्ता आणि त्यातले कर्तबगार राजे कारणीभूत आहेत तसेच ही पर्वतराजी उल्लंघून जाण्यासाठी निर्मिलेल्या इथल्या विविध घाटमार्गांनीसुद्धा इथला इतिहास घडवण्यात मोलाची कामगिरी बजावल्याचे दिसते.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

  उतराई  घाटवाटांची आशुतोष बापट ----------------------- सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्नच म्हणावे लागेल. विविध अंगांनी नटलेल्या सह्याद्रीचे दर्शन हे कोणत्याही ऋतूमध्ये घ्यावे, ते कायम मनोहरच असते. हा अजस्र सह्याद्री भटक्‍यांना सतत साद घालत असतो. दुर्गांपलीकडे या सह्याद्रीमध्ये डोकावताना सर्वांत प्रथम दर्शन होते ते इथे असलेल्या अनेक घाटवाटांचे.

Monday, March 06, 2017 AT 12:00 AM (IST)

ऐतिहासिक साक्षीदार "रडतोंडी' जावळी म्हणजे आधुनिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरच्या पश्‍चिमेस पसरलेला सदाहरित वनराजीने नटलेला प्रदेश! निसर्गाच्या सौंदर्याबरोबरच अनेक ज्ञात अज्ञात ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार! नंतर छत्रपती शिवरायांची सार्वभौम राजा म्हणून इतिहासाने नोंद घ्यावी अशा ज्ञात दोन ठळक घटना म्हणजे जावळीचे तत्कालीन राज्यकर्ते चंद्रराव मोरेंवर महाराजांनी केलेली कारवाई व त्यात जावळीचा स्वराज्यात केलेला समावेश आणि ...

Monday, February 27, 2017 AT 12:00 AM (IST)

कुर्डूगडाचा हिरवा चकवा ! रविवारी पाय घरी थांबत नाहीत. आठवडाभर गुगल मॅप पालथा घालून झाला की आठवडा संपताना हे गडकिल्ले खुणावायला लागतात. राजगड, तोरण्याच्या वारकऱ्यांना तिकडच्या "ट्रेकर्स'ची (?) झालेली गर्दी आता बघवत नाही आणि सहनही होत नाही, तेव्हा आपसूकच पावले या थोड्या दुर्लक्षित पण अतिशय देखण्या अशा दुर्गस्थळांकडे वळू लागतात. थंडीतल्या अशाच रविवारी भल्या पहाटे कुर्डूगडाच्या दिशेने आमची मोहीम निघाली.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

शिरवळजवळील "लयणगिरीची लेणी' सह्याद्रीमधल्या अनेक रौद्र कातळांना खोदून महाराष्ट्रात अनेक लेणी आणि किल्ले उभारले गेले. यातील बऱ्याच आडवाटेवर असलेल्या लेण्या आज उपेक्षित आहेत. महाराष्ट्रामध्ये केवळ अजिंठा आणि वेरूळ येथे लेण्याच आहेत, असे अजिबात नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच डोंगरांमध्ये विविध लेण्या कोरून काढल्या आहेत. अशाच काही प्राचीन लेण्या या भोरपासून बारा कि.मी. लांब आणि शिरवळ या ऐतिहासिक गावापासून पाच कि.मी.

Monday, February 06, 2017 AT 12:00 AM (IST)

सरखेज आणि अडालज अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातींमुळे गुजरातमध्ये कुछ दिन गुजारण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. शत्रूकडून असंख्य वेळा उद्‌ध्वस्त होऊनही पुनःपुन्हा नव्या जोमाने उभे राहिलेले सोमनाथचे पवित्र शिवमंदिर भारतीयांना जिद्द आणि संघर्षाची कायम प्रेरणा देत असते. गीरचे जंगलही पर्यटकांना खुणावत असते. त्याच गुजरातच्या अहमदाबादजवळ वास्तुकलेचे दोन विलोभनीय आविष्कार पाहायला मिळतात- "सरखेज रोझा' आणि "अडालज वाव'.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

थंडीतली भटकंती यंदा पाऊस अगदी महामूर झाला. त्यामुळे आता थंडीपण अगदी मस्त पडलीये. सकाळी धुक्‍याची दुलई आणि दिवसभर छान गार हवा! भटकंती करायला अगदी मस्त वेळ आहे ही. अर्थात सगळेच असा विचार करतात आणि मग एकच झुंबड उडते महाबळेश्वर, भीमाशंकर, किंवा दिवेआगर-हरिहरेश्वर या नेहमीच्या ठिकाणी. खरेतर अशा थंडीत शांत एकांत ठिकाणी जावे, शक्‍यतो थोडीशी पायपीट करावी आणि पुन्हा एकदा फ्रेश व्हावे असे वाटत असते. चला तर मग या थंडीत जरा हटके ठिकाणी जाऊया.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

थरारबन रतनगड, हरिश्‍चंद्रगडाचा राकट रांगडेपणा असो किंवा साधणदरी, कुंडलिका खोऱ्यातील अंधारबन यांचे गूढ सौंदर्य आपल्याकडे ही अशी काही ठेवणीतली ठाणी आहेत. जी सह्यप्रेमींना पुन्हा पुन्हा स्वतःकडे खेचत असतात. त्या सर्वांतला मेरूमणी ठरेल असा हा वासोटा दुर्गम, वज्रदेही व्याघ्रगड, पुणे सातारा असा प्रवास आदल्याच रात्री पूर्ण करून साताऱ्यात मुक्काम ठोकायचा. मग पहाटे लवकर उठायचे आणि वाटेतील कासची आस बाजूला सारून सातारा- बामणोली असा पल्ला गाठायचा.

Monday, November 28, 2016 AT 12:00 AM (IST)

रोहिड्याच्या पाऊस वाटा... भोरहून पुढे शिवथरघळीच्या वाटेवर एक डोंगर भलताच तोऱ्यात उभा असतो. आपले दोन बलदंड बुरूज मिरवणाऱ्या या गडाची मिजास वेगळीच असते. डोंगरवेड्यांच्या नजरेत तो पटकन भरतो. हा "रोहिडा' सर करायची सगळ्यांना प्रचंड आस लागते. मग डोंगरमाथ्यात धूळ आपल्या माथ्यावर लागेपर्यंत होणारी धडपड शांत होते ती "बाजारगडी' या पायथ्याच्या गावी येऊनच! पुण्याहून अवघ्या पन्नास एक किलोमीटरवर असलेल्या भोरला एसटीने अगदी सहज येता येते.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

सदाहरित केरळ हिरव्यागार वनश्रींनी नटलेले सोनेरी मुलायम वाळूचे शांत समुद्रकिनारे, सुंदर बॅक वॉटर्स, निळ्याशार डोंगरांनी वेढलेले, भव्य स्वच्छ सुंदर प्राचीन देवालये, सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांचा सहवास हे सारे दक्षिण भारतातील केरळ राज्यात अनुभवायला मिळते. मदुराई - पुण्याहून थेट गाडीने मदुराईला येता येते. वैगे मां पवित्र नदीच्या काठी मदुराई शहर आहे.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

  भूपतगड-प्राचीन पहारेकरी . . . . . ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच !! केळवे-माहीमसारख्या निसर्गरम्य सागरी किल्ल्यांपासून ते अशेरी, कोहोज, तांदूळवाडीसारख्या बलदंड आणि राकट गिरीदुर्गापर्यंत अनेक सुंदर किल्ले ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर आहेत.

Monday, September 05, 2016 AT 12:00 AM (IST)

अागळ्यावेगळ्या गणेशमूर्ती निसर्गसमृद्ध असा आपला महाराष्ट्र अनेक विविधतांनी नटलेला आहे. किल्ले-लेणी-मंदिरे ही तर इथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतातच, पण त्याचसोबत कला-रूढी-परंपरा-देवता यांचीसुद्धा इथे रेलचेल आहे. शिव, देवी, गणपती ही इथली आराध्य दैवते. गणपती तर सर्वांत लोकप्रिय अशी देवता. घराघरात पूजला जाणारा हा देव आपल्याला भटकंतीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या रूपात भेटतो. कधी तो डोंगरावर आहे, तर कधी थेट समुद्रातल्या किल्ल्यात.

Monday, August 29, 2016 AT 12:00 AM (IST)

ऑफबीट शिवालये श्रावण महिना सुरू झाला की, सृष्टीचा रंगच पालटतो. एरवी रौद्ररूपाने धो-धो कोसणारा पाऊस स्वतःचा वेग मंदावून शांत धारांनी तो व्यक्त होऊ लागतो. याच दिवसातल्या ऊन-पावसाच्या खेळात तर ही सारी सृष्टीच हरखून जाते. एकंदरीत वातावरणात उत्साह अगदी भरभरून वाहत असतो. श्रावणातल्या हळुवार आणि लयीत कोसळणाऱ्या जलधारांचे जसे आपणांस आकर्षण असते, तसेच ते आणखी एका गोष्टीसाठी असते. ती म्हणजे शिव उपासना.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

जुन्नरच्या उगवतीची पर्यटन स्थळे पंचमहाभुतांची ताकद आपण कोण आजमावणार? पण त्यांची अनुभूती घ्यायची असेल, तर डॉ. कार्व्हरच्या भाषेत डॉ. जगदीशचंद्र बोसांच्या बोलीत निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे. मग बघा निसर्ग कसे आपल्या मनातील अंतरंग खोलत जातो ते. डॉ. कार्व्हर, डॉ. बोस, डॉ. सालिम अली यांची वंशावळ मारुती चित्तमपल्लींपर्यंत पोचते. आणि गंमत म्हणजे त्याला पुढे खूप साऱ्या फांद्या फुटत जातात.

Monday, August 01, 2016 AT 12:00 AM (IST)

मेघालयची "खासी'यत...! शिलॉंग' पूर्वाश्रमीच्या अखंड आसामची राजधानी. डोंगरराजीची, नैसर्गिक सौंदर्याची साम्राज्ञी! तिचं सौंदर्य मनात घोळवतच मेघालयाच्या प्रवासाला सुरवात केली. दिसपूरपासून तीन-एक किलोमीटरवरून मेघालयाची सीमा सुरू होते. गुवाहाटीकडून शिलॉंगच्या दिशेनं जाताना उजवीकडे मेघालय आणि डावीकडे आसाम, असा रस्ता. रस्ता रुंदीकरणाच्या खुणा दिसत होत्या. पूर्वीच्या खाणाखुणांचा पत्ताच नव्हता.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

नवजा धबधब्याच्या गमजा तीन ऋतूंमधला आवडता ऋतू कोणता? या प्रश्नाला उत्तर देणं खरंच अवघड आहे. आपल्या परीनं तीनही ऋतू चांगलेच असतात. अगदीच डावं-उजवं करायची वेळ आल्यास, आपल्यापैकी अनेक जण झट्‌कन पावसाळा हेच उत्तर देतील. पण उन्हाळाही महत्त्वाचा असतोच. उन्हाळाच नसेल, तर ढग कसे तयार होणार आणि ढग तयार झाले नाहीत, तर पाऊस कसा पडणार? काही लोकांना हिवाळा आवडतो. तो असतोच आवडण्यासारखा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कारणांमुळे एखादा विशिष्ट ऋतू आवडतो.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

गर्दीपासुन दुर वर्षाऋतूची चाहूल लागली की कधी एकदा आपण नखशिखांत ओलेचिंब होण्यासाठी घराबाहेर पडतो आहोत असं होऊन जातं. भटक्‍यांचे पाय शिवशिवायला लागतात. पावसाळ्यात मनसोक्त हिंडायला मिळणार आहे याच एका आशेवर उन्हाळा सहन केलेला असतो. वर्षा ऋतूमध्ये बाहेर पडावं, भन्नाट वारा अनुभवावा आणि अंतर्बाह्य ओलेचिंब होऊन जावं यासारखं दुसरं सुख नाही. डोंगरमाथे ढगांनी झाकलेले असतात. त्यावरून लाल लाल पाणी खळाळत सुसाट वेगाने वाहत असते.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

ओल्या घाटवाटांची चढाई वाजंत्री घाट पावसाळा सुरू झाला की ट्रेकर्सना ओढ लागते ती धुंद धुक्‍याने झाकोळलेले सह्यपर्वत सर करण्याची. डोंगर पदारातील दाट जंगलात चिखल तुडवत चालण्याची, तर उंच उंच कड्यावरून खोलच खोल मुसंडी मारणाऱ्या प्रपातात मनसोक्त डुंबण्याची. माथ्यावर घनदाट जंगल मिरविणाऱ्या भीमाशंकर अभयारण्याची सैर करताना हे सारे काही अनुभवायला मिळत असल्यामुळेच हा ट्रेक प्रत्येक ट्रेकरच्या पावसाळी भटकंतीचा एक अविभाज्य घटक बनून राहिलाय.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

News Line Story ID PNE16-H85592           This Revision No.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

अंकारा मारमारा (Marmara) खाडी फेरीबोटीने ओलांडून तुर्कस्थानमधील आमची टूर बस इस्तंबूलहून अंकाराच्या दिशेने जात होती. त्यामध्ये ऍनाटोलिया (Anatolia)च्या माळरानावर एकही वृक्ष दृष्टीस पडला नाही. ऐतिहासिक इस्तंबूल ऑटोमन साम्राज्याची राजधानी होती परंतु तुर्कस्थान 1923 मध्ये स्वतंत्र देश झाल्यानंतर त्याची राजधानी बनली अंकारा. अंगोरा जातीच्या ससा, बकरी किंवा मांजर यांच्या कातरलेल्या लोकरीवरून शहाराचे नाव पडले.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

झोडगेचं अद्‌भुत शिवालय...! महाराष्ट्राला जशी गडकोटांची वैभवशाली परंपरा आहे, तशीच ती मंदिरांचीदेखील आहे. महाराष्ट्राच्या भूमीत सातवाहन, राजसत्तांनी राज्य केले. चालुक्‍य यादव या राजवटीत येथल्या भूमीवर अनेक सुंदर मंदिरे निर्माण झाली. यातील यादवांच्या काळातील हेमाद्रीपंडिताने निर्माण केलेल्या मंदिरांना "हेमाडपंथी' अशी वैशिष्ट्यपूर्ण शैली प्राप्त झालेली दिसून येते.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

सह्याद्रीतील अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातील अवचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल. रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्‍याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असणारा अवचितगड हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वांगसुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे. अवचितगडावर जाण्यासाठी आपल्याला ताम्हिणी घाटमार्गे रोहा हे शहर गाठावं लागतं.

Monday, June 06, 2016 AT 12:00 AM (IST)

  पळसदेवच्या विस्थापित पळसनाथाचं मंदिर   आपल्या आजूबाजूला अगदी जवळ, सहज पाहता येतील अशी कितीतरी प्रेक्षणीय ठिकाणे असतात. पण आपण मात्र दूरदूरच्या तथाकथित पर्यटन स्थळांच्या मागे धावत असतो. मात्र कधी कधी काही वेगळ्या, नव्या गोष्टींची कुणकुण कुठूनतरी लागते आणि आपल्याच मागच्या अंगणात खजिना सापडावा तशा काही जागा सापडतात. पळसनाथाचं मंदिर हे असेच अंगणातल्या खजिन्यासारखे.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

स्वप्नभूमीची स्वप्नवत सफर युरोप म्हणजे आपल्या स्वप्नपूर्तीतले पर्यटन. आयुष्यात आपण ज्या-ज्या गोष्टी बघायची स्वप्नं बघतो, त्या सर्व गोष्टी युरोपमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कला, संस्कृती, निसर्ग, ऐतिहासिक परंपरा या साऱ्यांचा योग्य समन्वय व जपणूक येथे दिसते. अतिशय सुंदर, अप्रतिम, अद्वितीय युरोपला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आम्ही लंडन ते रोम असा 15 दिवसांचा प्रवास केला.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

शहाणे शहर सोफिया ग्रीस आणि टर्की या दोन देशांच्या उत्तरेला बल्गेरिया हा युरोपमधील एक छोटासा देश आहे. बल्गेरियाची राजधानी सोफिया. ग्रीसचा दौरा करून आम्ही सोफियाला पोचलो. विटोशा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं सोफिया शांत, स्वच्छ, हिरवंगार आहे. खूप रुंद फूटपाथ, आठपदरी सरळसोट रस्ते, त्यावरून डौलाने जाणाऱ्या ट्रॅम, बसेस, गाड्या आणि रस्त्याकडेने उंच, भरदार वृक्षांचे आखीव-रेखीव जंगल होते.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

धाडसी खेळांचे शहर क्वीन्सटाऊन केले किंवा नाही केले हे दोनच शब्द अस्तित्वात आहेत. प्रयत्न करतो असा शब्दच मुळी अस्तित्वात नाहीये! क्वीन्सटाउनमध्ये आपलं स्वागत असे होते. दुकानावरच्या पाट्या वेगळ्याच अवतरणांनी भरलेल्या असतात.!! क्वीन्सटाउनच्या हवेतच थरार भरलेला आहे. शांतपणे क्वीन्सटाउन गेला आणि शांतपणे परत आला असं कुणी सांगितलं तर ती अफवा आहे असे समजायला हरकत नाही.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

उत्तर ध्रुवीय प्रदेशातील अरोरा   एडमंटनमध्ये असताना सुझॅनबरोबर जेव्हा एल्क आयलॅंड नॅशनल पार्क पाहायला गेले होते, तेव्हा बोलता बोलता ती म्हणाली, "रात्री दिसणारे नॉर्दर्न लाइटस बघायलासुद्धा ती एल्क पार्कमध्येच येते. हे ऐकले आणि मी चकितच झाले... "म्हणजे काय सुझॅन...? एडमंटनमधून हे लाइट दिसतात...?' मी आश्‍चर्याने विचारले. "यस राधिका... वुई आर व्हेरी निअर टू दी आर्क्‍टिक रिजन... या भागातही अरोरा लाइटस दिसतात आकाशात...

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: