Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
शब्दांचा, भावनांचा पाऊस "पाऊस' नुसता शब्द जरी कानावर पडला किंवा स्वतःशी उच्चारला तरी मनात त्याची बरसात सुरू होते. ती हलकी की धुवॉंधार हे त्या त्या वेळच्या भावावस्थेवर अवलंबून असते. पावसाचं नातं सर्व वयांशी असतं. लहानपणातलं नातं निरागस, खोडकर खेळगड्यासारखं, तरुणपणातलं नातं मुख्यतः प्रणयाचं-विविध छटा लेवून येणारं. आयुष्याच्या संध्याकाळी मनात असतो आठवणींचा पाऊस. गंमत म्हणजे प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा असतो.

Monday, April 10, 2017 AT 12:00 AM (IST)

बालशिक्षणाची मार्गदर्शिका -------------------------- मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, या गोष्टीसाठी पालक नेहमी चिंतेत असतात. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आपण आकार देऊ तशी मुले घडतात असे म्हटले जाते पण आकार देणे म्हणजे नक्की काय असते, मुले घडतात म्हणजे नेमके काय होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घ्यायची असतील तर डॉ. श्रुती पानसे यांनी लिहिलेले पहिली आठ वर्षे शिक्षणाची हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.

Monday, April 10, 2017 AT 12:00 AM (IST)

  उत्कंठावर्धक आणि थरारक रहस्यकथा ---------------- मित्रांचा गप्पांचा फड जमलेला असावा. कोणाकडे तरी अचाट आणि अफाट कथांचा खजिना असावा. त्याच्या अस्खलित कथनाच्या ओघात सगळे जण गुंगून जावेत. रात्री उशीर झाला तरी राहिलेली कथा अर्धवट सोडून देण्याची कोणाची इच्छा नसावी. गवयाने एखादी चीज घोळवून गावी तशी निवेदकाने आपली कथा, कुठलीही घाई गडबड न करता, बारीकसारीक तपशील उलगडत, प्रत्येक मुद्दा ठाशीवपणे स्पष्ट करत पुढे न्यावी.

Monday, March 27, 2017 AT 12:00 AM (IST)

मानसशास्त्रीय संकल्पनांचा वेध गेली 35 वर्षांहून अधिक काळ मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या विजया फडणीसांनी आपल्या सखोल अनुभवाच्या आधारे लिहिलेल्या "मुलांना घडवताना', "गोष्टी मनाच्या', "सुखाने जगण्यासाठी' आणि "मने उलगडताना' या चारही पुस्तकांद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहज समजणाऱ्या भाषेत मानसशास्त्रातील काही संकल्पना आणि मानसोपचाराच्या विविध पद्धती आदींचा अतिशय अचूक वेध घेतला आहे.

Monday, March 13, 2017 AT 12:00 AM (IST)

रस्किनकथांची संपन्न दुनिया रस्किन बॉंड हे नाव वाचकांना नवे नाही. इंग्रजी साहित्य वाचणारे तर त्यांच्या लेखनाच्या प्रेमात आहेतच परंतु मराठीतही आजवर त्यांचे तुरळक अनुवाद प्रसिद्ध होऊन गेले आहेत आणि त्यांनी मराठी वाचकालादेखील नादावले आहे. मराठी वाचकांची रस्किन बॉंड यांच्या साहित्याशी असलेली ओळख दृढ करणारी पुस्तके रोहन प्रकाशनाने उपलब्ध केलेली आहेत. बॉंड यांचे साहित्य विपुल आहे.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

एका सुहृदाच्या वैशिष्ट्यपूर्ण आठवणी भारतीय सनदी सेवेतील एक उच्च आणि कर्तबगार अधिकारी, अशी ओळख असलेल्या आणि केंद्रीय गृह सचिव, अरुणाचल प्रदेश आणि बिहारचे राज्यपालपद, संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या राम प्रधान यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया यांच्या आठवणी "माय इयर्स विथ राजीव अँड सोनिया' नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध केल्या होत्या.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

प्रसंगनिष्ठ विनोदाची प्रसन्न मांडणी खुमासदार प्रसंग, सर्वसामान्य व्यक्तींचे सूक्ष्म निरीक्षण, गमतशीर घटनांची एकावर एक रचलेली मजेशीर उतरंड हे सु. ल. खुटवड यांच्या "नस्त्या उचापती' या कथासंग्रहातील विनोदाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रसंगनिष्ठ विनोदाची प्रसन्न मांडणी असलेले त्यांचे हे नवेकोरे पुस्तक त्यांच्या लोकप्रियतेत भर घालणारे ठरेल, हे वेगळे सांगायला नको.

Monday, January 23, 2017 AT 12:00 AM (IST)

अंतर्मुख कवीचे स्वगत! गांधार - पंचम एखाद्या कसलेल्या ज्येष्ठ गायिकेने नृत्याचे पदन्यास टाकले किंवा एखाद्या नर्तिकेने चित्र रेखाटले किंवा चित्रकाराने गझल गायली, तर वेगळ्या क्षेत्रातल्या या मुशाफिरींचा त्या कलाकार व्यक्तीला वेगळाच कैफ चढतो... विशेष म्हणजे रसिकालाही याचं अप्रुप वाटतं..

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

शेक्‍सपिअरचापटांचा अभ्यासपूर्ण धांडोळा शेक्‍सपिअरचा काळ विचारात घ्यायचा तर त्याचा जन्म 26 एप्रिल 1564 आणि निधन 23 एप्रिल 1616 चे पण त्याच्या लेखनातील ताजेपणा आजही अवाक करणारा आहे आणि म्हणूनच तो जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार ठरला. अशा नाटककारांच्या नाटकांवर चित्रपट येणे ही एक अपरिहार्य प्रक्रिया आहे. त्याच्या अनेकानेक नाटकांवर चित्रपट येऊन गेले आणि पुढेही येतील.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

प्रेमकथेचे त्रिमितीय चित्रण . . . . . . ना. सी. फडके आणि कमला दीक्षित यांच्या आयुष्याचे त्रिमितीय चित्रण - ना. सी. फडके आणि कमला दीक्षित ही मराठी साहित्यविश्‍वातील गाजलेली प्रेमकहाणी. 2015-16 हे कमला दीक्षित यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष हे औचित्य साधून त्यांची मुलगी गीतांजली जोशी यांनी आईचे हे "ललित चरित्र' लिहिले आहे. "सुनिधी पब्लिशर्स पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

Monday, November 28, 2016 AT 12:00 AM (IST)

अनावर क्षणांचा मनस्वी खेळ कवितेतून स्वतःला शोधणारी एक चिंतनशील कवयित्री, अशी आसावरी काकडे यांची ओळख रसिकांना झाली आहे. यापूर्वीच्या "उत्तरार्ध' (2008) या त्यांच्या सातव्या संग्रहानंतर आता हा त्यांचा नवा कवितासंग्रह "व्यक्त- अव्यक्ताच्या मध्यसीमेवर' राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठासकट अतिशय नेटक्‍या रूपात व्यक्त- अव्यक्ताच्या मध्यसीमेवरील सर्जनोत्सुक शब्दांपर्यंत तो आपल्याला पोचवतो.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

प्राणिजगतामधील एक रंजक फेरफटका डॉ. अनिल लचके --------- पशुपक्षी हे माणसाळलेले असोत किंवा रानावनातील असोत, त्यांच्याबद्दल अबालवृद्धांना कुतूहल असते. यासाठी वस्तुसंग्रहालयात भुस्सा भरलेले प्राणी किंवा प्राणिसंग्रहालयात जाऊन खरेखुरे आणि जिवंत प्राणी पाहायला लोक मोठ्या संख्येने जात असतात. प्राण्यांचे असे लांबून घेतलेले बाह्यात्कारी दर्शन मनाला समाधान देते. तथापि प्रत्यक्षातील प्राणिजीवन हे आपल्याला अचंबित आणि अंतर्मुख करणारे असते.

Monday, October 17, 2016 AT 01:06 PM (IST)

सामरिक जाणिवेचा जागर पुस्तक परिचय प्रा. संजय विष्णू तांबट -------- जम्मू-काश्‍मीरमधल्या उरी येथे पाकिस्तानने नुकताच दहशतवादी हल्ला घडवून आणला. त्यात 18 भारतीय जवान हुतात्मा झाले. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आणि पाकिस्तानला धडा शिकवा, या मागणीने जोर धरला. मात्र, "पाकिस्तानला प्रत्युत्तर जरूर देऊ पण त्यासाठीची योग्य वेळ, ठिकाण व प्रतिसादाचे स्वरूप सेनादले ठरवतील', असे दिल्लीतल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर जाहीर करण्यात आले.

Monday, October 03, 2016 AT 12:00 AM (IST)

स्वररसिकांना घडविणारी "आनंद यात्रा' - सुभाषचंद्र जाधव त्यांच्या सतारवादनाची फक्त कॅसेट ऐकून पु. लं.

Monday, September 26, 2016 AT 12:00 AM (IST)

"दलवाईंशी पुनर्भेट' प्रा. शमसुद्दीन तांबोळी हमीद दलवाई यांचे साहित्य त्यांच्यातील सृजनशील व संवेदनशील साहित्यिक आणि मर्मभेदक वास्तव चित्रण करणाऱ्या विचारवंतांचे दर्शन घडवते. हमीद दलवाई यांच्या "जमीला जावद' या कथासंग्रहात त्यांच्या दुर्मिळ असणाऱ्या दहा कथांचा समावेश आहे. जवळपास पन्नास वर्षे ज्या कथा पडद्याआड राहिल्या. "जमीला जावद' या कथासंग्रहातील कथा हमीद दलवाई यांच्याविषयी निर्माण केले गेलेले गैरसमज दूर करणाऱ्या आहेत.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

संवेदनशील मनाचा आविष्कार... प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी असणारे कवी गणेश शिवाजी मरकड यांचा "काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान' हा 172 पृष्ठांचा काव्यसंग्रह पद्‌मगंधा प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. या संग्रहाला रविमुकुल यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे. आधीच्या संग्रहांपेक्षा अधिक स्पष्टपणे व ठळकपणे कवी गणेश मरकड यात व्यक्त झालेले दिसतात.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

रंगप्रयोगांचा लेखाजोखा विष्णुदास भावे पुरस्कार हा नाट्यसंमेलनाध्यक्षांनाही दुर्लभ असणारा पुरस्कार नाटककार रत्नाकर मतकरी यांना मिळाला आहे. मतकरी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, प्रशिक्षक, गूढकथाकार, चित्रकार अशा अनेकानेक स्वरूपात रत्नाकर मतकरी मराठी वाचकाला भावले आहेत. त्यांच्या समग्र साहित्यावर परदेशात चर्चा सत्रेही झाली आहेत.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

कलंदर माणसाची मनस्वी कथा काही माणसं मनस्वी असतात. मनस्वी असलेली माणसं बहुतेक वेळा कलंदरही असतात. मनस्वी अशासाठी, की मळलेल्या वाटेच्या वाटेला न जाता ही माणसं आपली वेगळीच वाट तयार करतात. या वाटेनं कोणी यावं किंवा न यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. असंच एक कलंदर व्यक्तिमत्त्व डॉ. राजा दांडेकर. जंगलात बालपण, शिक्षणासाठी शहराशी जवळीक आणि ही जवळीक न पटल्यामुळं पुन्हा परतीच्या मार्गानं जंगलाचा रस्ता धरणाऱ्या डॉ. दांडेकरांनी उभी हयात जंगलात घालवली.

Monday, August 29, 2016 AT 12:00 AM (IST)

नवगृहिणींसाठी मार्गदर्शक खाद्यसंस्कृती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या आरोग्याचे महाद्वार या संस्कृतीतूनच उघडते. प्रत्येक देशाची, प्रांताची खाद्यसंस्कृती भिन्न. त्या प्रांताचे हवामान, पाणी, तेथे पिकणारी पिके यावर ती अवलंबून असते. त्यामुळेच अगदी आपल्या महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तरी, चांदा ते बांदा या दरम्यान खाद्यसंस्कृतीत विविधता आढळते.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

"होस्टेल लाइफचा पट' "दिल, दोस्ती... डॉक्‍टरी' ही अमित बिडवे यांची कादंबरी मेडिकल कॉलेजमधील "होस्टेल लाइफ'चा पट आपल्यासमोर उलगडते. आजपर्यंत अनेक डॉक्‍टरांची अनेक विषयांवरील पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील बव्हंशी पुस्तके डॉक्‍टर झाल्यानंतर आलेल्या "व्यावसायिक अनुभवांवर' आधारलेली आहेत. त्यात अनेक उत्तम पुस्तकांचा समावेश आहे आणि त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसादही लाभला आहे.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

एका "विश्‍वास'ची कथा पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेले पुस्तक म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर एक विशिष्ट चौकट तयार झालेली असते. कोणत्या तरी गुन्ह्याची तपास कथा असणार हे मनात पक्के असते परंतु कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांचे "मन में है विश्‍वास' हे पुस्तक वाचताना आपण त्यात रमूनच जात नाही, तर नवीन बोध घेतो.

Monday, August 15, 2016 AT 12:00 AM (IST)

राजीव गांधी हत्येपूर्वीची खदखद . . . . . माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तमिळनाडूतील श्रीपेरांबुदूर येथील जाहीर सभेस्थानी हत्या झाली. या घटनेला आता उण्यापुऱ्या पंचवीस वर्षांचा कालावधी झाला आहे. तथापि, हा विषयच इतका गंभीर आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडविणारा होता, की आजतागायत सातत्याने त्याविषयी नवनवीन मुद्दे उपस्थित करून चर्चा होत असते. "राजीव गांधी हत्या...

Monday, August 15, 2016 AT 12:00 AM (IST)

समृध्द अायुष्याचा पट ख्यातनाम साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, आपल्या वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे शैलीदार वक्ते न. म. जोशी हे नाव तसे सर्वांना परिचित आहे. "बखर एका सारस्वताची' हे पुस्तक न. म. जोशी यांचे आत्मचरित्र आहे. पुस्तकाच्या नावापासूनच पुस्तकाचे वेगळेपण आपल्या लक्षात येते. या आत्मवृत्तामागची भूमिका स्पष्ट करताना न. म. जोशी म्हणतात, "बखर' हा इतिहास असतो पण तो रंजक पद्धतीने मांडलेला असतो.

Monday, August 08, 2016 AT 12:00 AM (IST)

  आई-बहीण कवितेचं एकत्रित चरित्र पहिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले कवी ऐश्‍वर्य पाटेकर यांचं "जू' हे दुसरं पुस्तक. "ऍग्रोवन' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. लेखकानं स्वतःचा भवताल जरी या पुस्तकात बारकाईनं मांडला असला, तरीही तो स्वतःपेक्षा त्याच्या अखंड राबणाऱ्या खंबीर आईभोवती, आधार देणाऱ्या चार बहिणींभोवती आणि गवसलेल्या कवितेभोवती तो अधिक केंद्रित होतो.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

बर्मनदांचे जीवन - संगीत एस. डी. बर्मन यांचं जीवन-संगीत. "सुन मेरे बंधु रे' सत्या सरन - अनुवाद - मिलिंद चंपानेरकर' या पुस्तकाचे परीक्षण - 1947 ते 1975 अशी जवळ जवळ 3 दशके हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या रसरशीत संगीताने गारूड करणारे चतुरस्र संगीतकार म्हणजे "एस. डी. बर्मन' ऊर्फ "बर्मनदा' ऊर्फ "कर्ता' हे होत.

Monday, July 04, 2016 AT 12:00 AM (IST)

मुलाखतीतून उलगडलेले आत्मकथन! . . . . . "काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, केळीचे सुकले बाग, दिवस तुझे हे फुलायचे, त्या तरू तळी विसरले, तुझे गीत गाण्यासाठी...

Monday, June 27, 2016 AT 12:00 AM (IST)

अस्वस्थ करणाऱ्या ग्रीष्म झळा... ग्रीष्म हा ऋतूच मुळात झळा देणारा... ग्रीष्मातल्या या झळा तशा अटळच... त्यातही आपली जिवाभावाची व्यक्ती आपल्यासोबत नसेल, तर या ग्रीष्माच्या झळा अधिकच अस्वस्थ करतात. याच अस्वस्थतेतून कवी विदुर महाजन यांचा "ग्रीष्म' हा कवितासंग्रह साकारला आहे. या संग्रहात फक्त कविताच नाहीत, तर कवितेच्या आशयानुरूप एकेका चित्राची सुंदर अशी मालिकाच पानोपानी उलगडत जाते.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

  मोदी समजून घेताना... केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. प्रामुख्याने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीच्या आधारे त्यांना पंतप्रधानपदासाठी लोकमताचा कौल मिळाला. ही जबाबदारी त्यांनी कशी सांभाळली याची चिकित्सा आता सुरू झाली आहे. ती करताना मोदींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख समजून घेणे गरजेचे आहे.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

पदार्थनिर्मीती आणि सादरीकरण ग्लोबलायझेशनच्या या युगात नव्या जीवनशैलीत खाद्यपदार्थांची यादी तर भरगच्च वाढली आहेच. तसेच सवयीही बऱ्याच आधुनिक झाल्या आहेत. त्यामुळेच 'ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी' संकल्पना नुसत्या आवडू लागल्या आहेत, असे नाही तर त्या प्रसिद्धसुद्धा झाल्या आहेत. आपल्या मेनूत काहीतरी खास वेगळे असावे किंवा आपला कार्यक्रम खास उठून दिसावा यासाठी यजमानाची नक्कीच धावपळ होते.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

  कल्पक गणितज्ज्ञाची जीवनकहाणी डॉ. अनिल लचके विविध समस्यांचा आपण सखोल विचार करतो तेव्हा बहुतांशी त्यांच्या मुळाशी काही तरी "गणित' होते, असं आपल्या लक्षात येईल. "गणना' या शब्दावरून गणित शब्द झाला आणि इंग्रजीमधील मॅथेमॅटिक्‍स हा शब्द ग्रीक भाषेतील'ॅथेमा'पासून तयार झालाय. याचा अर्थ शिकणे, विज्ञान किंवा अभ्यास असा असून, तो व्यापक आणि विस्तारित आहे.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: