Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
निसर्गाविरुद्ध का जावे? कितीही धडे मिळाले, ते अगदी जिवावर बेतणारे असले, तरी आपल्या चुकांतून जो शिकत नाही तो माणूस! अलीकडे घडलेल्या अपघाताच्या घटना हे त्याचेच द्योतक आहे. कोणी कितीही इशारे दिले तरी निसर्गाला आव्हान देण्याचे माणसाचे वेड कमी होत नाही. बेळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा संपल्यानंतर मजेसाठी हे सगळे कोकणातील वायरी बीचवर गेले.

Monday, May 01, 2017 AT 12:00 AM (IST)

(पुन्हा) मुलगी झाली हो... एकविसाव्या शतकात प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या, गाठू पाहणाऱ्या मुली आज आपण सर्वत्र पाहतो पण यातील काही मुलींना जन्मासाठीही किती संघर्ष - बरेचदा अपयशीच - करावा लागतो, हे म्हैसाळ प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिले. आपल्या राज्यात, देशात असे कितीतरी "म्हैसाळ' असतील, त्यातील एक गाव आत्ता सापडले आहे पण इतके होऊनही समाजावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही, हे दाखवणारी घटना नुकतीच पुण्यात घडली आहे.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

सगळ्यात आनंदी कोण? जगी सर्व सुखी असा कोण आहे? असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. याच धर्तीवर "सगळ्यात आनंदी देश कोणता?' असा सवाल संयुक्त राष्ट्रसंघाने विचारला आणि त्याचे उत्तरही शोधून काढले. नॉर्वे हा जगातील सर्वांत आनंदी देश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चौथ्या क्रमांकावरून एकदम पहिल्या क्रमांकावर त्याने उडी मारली आहे. पहिला असलेल्या डेन्मार्कला यंदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. भारताचा क्रमांकही यंदा चार अंकांनी घसरला.

Monday, March 27, 2017 AT 12:00 AM (IST)

आईचे प्रेम कसे तोलणार? आईचे प्रेम सर्वश्रेष्ठ, ही आता सर्वमान्य बाब आहे. यात काही "बाबा' लोकांवर होत असलेला अन्याय मान्य करूनही या बाबीबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. ही आई "गृहिणी' की "नोकरदार' असा एक नवाच वाद सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यातील बहुतांश भाग प्रसिद्धीसाठी असला, तरी त्यावर चर्चा व्हायलाच हवी. प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिची मुलाखत एका नियतकालिकात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

त्यांचा काय दोष? एका घटनेत न्यायालयाने अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारली आणि गर्भपाताची परवानगी नाकारली. हे संपादकीय लिहून एक आठवडा होण्याच्या आतच म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात केंद्राची बातमी येऊन थडकली. तब्बल नऊ वर्षे हा डॉक्‍टर स्त्री-भ्रूणहत्या करत होता. त्याला अर्थातच "मुलगी नको' म्हणणाऱ्या समाजाची साथ होती.

Monday, March 13, 2017 AT 12:00 AM (IST)

पालकांचे प्रेम आवश्‍यकच माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला सर्व प्रकारच्या नात्यांची गरज असते. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते योग्यही असते. मग एखादे लहान मूल तरी याला अपवाद कसे असेल? त्याच्या वाढीच्या वयासाठी, चांगल्या विकासासाठी आई-वडील दोघांचेही प्रेम त्याला आवश्‍यक असते. त्यातील एखाद्याचे प्रेम, दुसऱ्याला नाकारता येत नाही, येऊ नये. दिल्ली उच्च न्यायालयानेही असेच मत नुकतेच व्यक्त केले आहे.

Monday, February 27, 2017 AT 12:00 AM (IST)

हद्दीच्या वादाचे प्रयोजन काय? अलीकडे एकूणच अत्याचारांचे प्रमाण वाढते आहे की काय त्यातही लहान मुलांवर (यात मुलीही आहेत) - अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोणावरही असो, अत्याचार वाईटच पण नंतरचे कवित्व त्याहून अधिक वेदनादायक ठरत आहे, अशी घटना नुकतीच घडली आहे. पुण्यातील उंड्री भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील लहान मुलीवर शाळेच्या वाहनचालकाने लैंगिक अत्याचार केला.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

संपादकीय नेमके कसे वागायचे? नेमके कसे वागायचे, असा प्रश्‍न आता सगळ्यांना विशेषतः महिला-मुलींना पडला असेल. पुण्यात इन्फोसिस कंपनीतील एका महिला इंजिनिअरचा काही दिवसांपूर्वी खून झाला, या आणि अशा काही घटनांवरून तरी असेच वाटते. पुण्यातील इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या एका तरुण महिला अभियंतीचा काही दिवसांपूर्वी खून झाल्याची बातमी आली. पोलिसांच्या झटपट हालचाली, सतर्कता यामुळे संशयित काही वेळांतच ताब्यात आला.

Monday, February 06, 2017 AT 12:00 AM (IST)

अरेरावीची हद्द काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कन्या गीता व बबिता फोगट यांच्या आयुष्यावर आधारित "दंगल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. नीतेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आमिर खानने महावीर फोगट यांची भूमिका केली आहे. अल्पावधीतच या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Monday, January 23, 2017 AT 12:00 AM (IST)

स्पर्श...नकोसा! कदाचित हजार शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी एखादी भावना केवळ स्पर्शातून व्यक्त करता येते व्यक्त होऊ शकते. स्पर्शाची ताकदच तेवढी असते. पण हाच स्पर्श कधीतरी वेगळ्या भावनाही व्यक्त करू शकतो आणि नकोसा ठरतो. गेल्या आठवडाभरात घडलेल्या काही घटनांतून हेच सिद्ध झाले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या बंगलोरमधील अनेक महिला-मुलींना अशाच नको असलेल्या स्पर्शाचा नको असलेला अनुभव सहन करावा लागला.

Monday, January 16, 2017 AT 12:00 AM (IST)

एवढे क्रौर्य येते कोठून? खून, अत्याचार, अन्याय याबद्दलच्या बातम्या नाहीत असा एकही दिवस नसतो. लहान-मोठ्या प्रमाणातील या बातम्या रोज वाचायला-पाहायला मिळतातच. अनेकदा "रोज मरे..' अशी अवस्था होते. तरीही आपली संवेदनशीलता अजून पुरती मेलेली नाही, याची जाणीव करून देणारी एखादी अशी घटना घडते, की पुन्हा एकदा आपण हादरून जातो. माणुसकीवरचा विश्‍वास उडणार तर नाही ना, अशा संभ्रमात आपण पडतो.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

एवढे क्रौर्य येते कोठून? खून, अत्याचार, अन्याय याबद्दलच्या बातम्या नाहीत असा एकही दिवस नसतो. लहान-मोठ्या प्रमाणातील या बातम्या रोज वाचायला-पाहायला मिळतातच. अनेकदा "रोज मरे..' अशी अवस्था होते. तरीही आपली संवेदनशीलता अजून पुरती मेलेली नाही, याची जाणीव करून देणारी एखादी अशी घटना घडते, की पुन्हा एकदा आपण हादरून जातो. माणुसकीवरचा विश्‍वास उडणार तर नाही ना, अशा संभ्रमात आपण पडतो.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

पर्यटन आणि आपण वर्षातून एकदा कुठेतरी फिरून यावे... असे मोठमोठे लोक सांगतात. प्रवास लांबचा असो वा जवळचा, हा बदल मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्‍यक असतो. अलीकडे तर ताण इतके वाढले आहेत, की हा बदल अनिवार्य झाला आहे. कोणी सांगितले म्हणून असेल, स्वतःलाच जाणवले म्हणून असेल.. माणसे हल्ली फिरू लागली आहेत. विविध पर्यटन संस्थांच्या जाहिराती बघितल्या, त्याला मिळणारा प्रतिसाद बघितला, महामार्गांवरील खासगी वाहनांची गर्दी बघितली की याची सत्यता पटावी.

Monday, December 26, 2016 AT 12:00 AM (IST)

पर्यटन आणि आपण वर्षातून एकदा कुठेतरी फिरून यावे... असे मोठमोठे लोक सांगतात. प्रवास लांबचा असो वा जवळचा, हा बदल मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्‍यक असतो. अलीकडे तर ताण इतके वाढले आहेत, की हा बदल अनिवार्य झाला आहे. कोणी सांगितले म्हणून असेल, स्वतःलाच जाणवले म्हणून असेल.. माणसे हल्ली फिरू लागली आहेत. विविध पर्यटन संस्थांच्या जाहिराती बघितल्या, त्याला मिळणारा प्रतिसाद बघितला, महामार्गांवरील खासगी वाहनांची गर्दी बघितली की याची सत्यता पटावी.

Monday, December 26, 2016 AT 12:00 AM (IST)

महिला खरेच स्वतंत्र आहेत? आज एकविसाव्या शतकात महिलांची प्रगती हा अचंब्याचा विषय राहिलेला नाही.. असे किमान आपल्याला वाटते. असे म्हणण्याचे कारण काश्‍मीरमधील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी लिहिलेली पोस्ट! त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात ही पोस्ट आहे. वर वर दिसायला हे प्रकरण खूप साधे, नेहमीचे वाटते पण ते तसे नाही. खूप गुंतागुंतीचे, गंभीर, विचार करायला प्रवृत्त करणारे आहे.

Monday, December 12, 2016 AT 12:00 AM (IST)

टीव्हीचे महत्त्व एक काळ असा होता, मनोरंजनाचे कोणतेही साधन घरात नव्हते. श्रीमंत घरांमध्ये ग्रामोफोन वगैरे असे पण बाकी कुठे काही नाही. त्या काळात मेळे, तमाशे, संगीत नाटके यांवर मनोरंजनाची भूक भागवली जाई पण महिलांना तिथे प्रवेश नव्हता. हळूहळू काळ बदलत गेला. अगदी घरोघरी नाही तरी अनेक घरांत रेडिओ आला... मग ट्रान्झिस्टर आला. बघता बघता घरटी एक तरी रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर दिसू लागला. चित्रपटांचेही प्रस्थ हळूहळू वाढत होते...

Monday, November 28, 2016 AT 12:00 AM (IST)

ब्लॅक अँड व्हाइट... आणि गर्दी! खरे तर ब्लॅक अँड व्हाइट अर्थात कृष्ण-धवल रंगाची जादू काही औरच आहे! रंगीत चित्र, छायाचित्र, चित्रपट वगैरेंपेक्षा कृष्ण-धवल चित्र, छायाचित्र किंवा चित्रपट अधिक परिणामकारक असतो, असे जगभरातील या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

महिला आणि आत्मसन्मान कोणीही यावे, काहीही बोलावे, अशी बहुतांश स्त्रियांची सध्याची खरेतर नेहमीचीच स्थिती दिसते. एकीकडे महिला शक्ती, दुर्गेचा अवतार वगैरे संबोधून तिच्याबद्दल आपल्याला फार आदर आहे, तिचे फार कौतुक आहे असे दाखवायचे आणि दुसरीकडे तिला बदनाम करण्याचा एकही प्रयत्न सोडायचा नाही, असे समाजातील काही घटकांचे वर्तन असते.

Monday, November 14, 2016 AT 12:00 AM (IST)

त्या सावळ्या तनूचे... निसर्गाच्या सान्निध्यात गेले की विविध रंगांची उधळण बघायला मिळते. एकेका रंगाच्या अफाट छटा बघून माणूस अक्षरशः हरखून जातो. रंगांतील हे वैविध्यच वेडावून टाकणारे असते पण वर्णाचा संबंध आला, की माणूस पांढरा (गोरा) आणि काळा यांतच का अडकून राहतो, आपली ऊर्जा त्यात का घालवतो, हे कळत नाही. गोरा आणि काळा (कृष्णवर्णीय म्हणू या) हे वर्ण आणि त्यानुसार येणारी मत-मतांतरे आपल्याला अजिबातच नवीन नाहीत.

Monday, October 10, 2016 AT 12:00 AM (IST)

प्राणिमात्रांवर प्रेम करावे लहानपणापासून आपल्याला एक शिकवण मिळत असते - "सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करावे.' आजकाल या शिकवणीचा विसर पडला आहे की काय, अशा काही घटना घडल्या आहेत - घडत आहेत. पुण्यातील एक घटना - कुत्री पकडण्याची गाडी एकाने बोलावली. मात्र, "ही कुत्र्याची पिले लहान आहेत, ती नेता येणार नाहीत,' असे म्हणून एका वीस वर्षांच्या तरुणीने विरोध केला.

Monday, October 03, 2016 AT 12:00 AM (IST)

लहान मुलांचा छळ का? हिंसा, क्रौर्य माणूस का करतो? त्यातून कसले समाधान त्याला मिळते? त्यातही समोरची व्यक्ती त्याच्यापेक्षा दुबळी, कमकुवत असेल लहान मूल किंवा बाळ असेल! त्यांना त्रास द्यायला यांचे मन धजावते तरी कसे? देशोदेशी घडलेल्या अलीकडच्या काही घटना बघितल्या तर यांसारखे अनेक प्रश्‍न मनात उपस्थित होतात. विचारी माणसाला अस्वस्थ करतात. अशा घटना थांबतील कशा? मूळात त्या घडतात का? कितीतरी प्रश्‍न आहेत...

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

विद्यार्थी आणि शिक्षण पद्धती शालेय शिक्षणाला पर्याय नाही, ही आपली धारणा खूपच ठाम आहे. त्यात फारसे वावगेही नाही पण त्यासाठी आपल्या मुलांना आपण अक्षरशः घाण्याचे बैल करून टाकतो. जराही इकडे तिकडे न करता त्यांनी केवळ अभ्यासावर, तेही शालेय अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ही आपली अपेक्षा असते ती तितकीशी बरोबर नाही. या सगळ्याला छेद देणारी एक घटना नुकतीच घडली आहे.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

इथे ओशाळली माणुसकी... आजकाल "माणुसकी बघायलाही मिळत नाही - हे वाक्‍य बहुतेक प्रत्येक पिढीने आपापल्या काळात म्हटले असेल. याचा अर्थ थोडीफार का असेना "माणुसकी' प्रत्येक पिढीत होती आणि अजूनही आहे अन्यथा पुढील पिढीला तसे म्हणण्याची संधीच मिळाली नसती. पण अशा काही घटना या काही दिवसांत घडल्या आहेत, की पुन्हा हे वाक्‍य उच्चारण्याची वेळ आली आहे. ही घटना आहे ओडिशातील...

Monday, September 05, 2016 AT 12:00 AM (IST)

हे श्री गणेशा... काही गोष्टींची विशेषतः सणा-समारंभांची चाहूल गावांत - शहरांत होणाऱ्या काही हालचालींतून, बदलांतून होत असते. पुण्याचा विचार केला तर नदीकाठी, सिंहगड रस्ता किंवा अन्य काही ठिकाणी ढोल-ताशावादनाचा सराव सुरू झाला, की समजावे "गणपती आले'! त्यानंतर काही दिवसांनी मंडप पडू लागले, की लक्षात येते, दहीहंडी आहे. तेच सत्र नवरात्र वगैरे करत किमान दिवाळीपर्यंत तरी सुरू असते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात थोड्याफार फरकाने असेच चित्र असते.

Monday, August 29, 2016 AT 12:00 AM (IST)

विकृतीचे बळी.. किती दिवस? सार्वजनिक जीवनातील महिलांचा सहभाग नेहमीच चर्चेचा ठरला आहे. तिच्या कर्तृत्वाचे, तिच्या कार्याचे कौतुक होते पण यालाही दुर्दैवाने दुसरी बाजू आहे. ती म्हणजे तिचे शोषण! हे शोषण प्रत्येक वेळी शारीरिकच असते असे नाही, तर अधिक वेळा ते मानसिक जास्त असते. कोणाला सांगताही येत नाही पण त्रास सहन करावा लागतो. विकृतांचा हा त्रास इतका आहे, की यातून खुद्द आपल्या राष्ट्रपतींच्या कन्येचीही सुटका झालेली नाही.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

हे कधी थांबणार? स्त्रियांच्या मागचे अत्याचाराचे शुक्‍लकाष्ठ कधी संपणार आहे, संपणार आहे की नाही, कळत नाही. या विषयावर सतत लिहायला लागावे, हे दुर्दैव आहे असा उल्लेख मागच्याच संपादकियात केला होता. हा आठवडाही त्याला अपवाद ठरू नये, याला काय म्हणावे? बलात्कार झालेल्या एका विवाहित तरुणीने नुकतीच मिरज येथे आरोपीच्याच फार्म हाऊसमध्ये आत्महत्या केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नाही, उलट या तरुणीविरुद्धच त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.

Monday, August 15, 2016 AT 12:00 AM (IST)

त्यास आरोग्यसंपदा भेटे। लहान मुलांच्या बाबतीत सगळेच संवेदनशील असतात. प्रत्येक जण त्यांना जपत असतो. पण असे करताना जपण्यापेक्षा आपण त्यांचे अधिक लाड - तेही फाजील लाड तर करत नाही ना, हे बघण्याची वेळ आली आहे. विशेषतः त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत! कारण "पीआरबी' (द पॉप्युलेशन रेफरन्स ब्यूरो) या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील युवा वर्गात आरोग्यासाठी जागृती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यात स्थूलतेचे प्रमाण अधिक दिसते आहे.

Monday, August 01, 2016 AT 12:00 AM (IST)

पोकेमॉन गो जगातील अनेक देशांत सध्या एक मोठे वादळ उठले आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी अशा अनेक देशांतील तरुण आपले स्मार्टफोन घेऊन वेळीअवेळी रस्त्यावर चालताना दिसत आहेत. याचे कारण आहे नुकताच प्रकाशित झालेला एक नवीन गेम - पोकेमॉन गो. पोकेमॉन गो केवळ एका आठवड्यात आयफोनच्या ऍप स्टोअरमधून आतापर्यंत सर्वांत जास्त डाउनलोड झालेले ऍप बनले आहे. जिकडे जाल तिथे एकच चर्चा आहे - पोकेमॉन गो! पोकेमान गो हा एक ऑगमेंटेड रिऍलिटी गेम आहे.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

एवढे क्रौर्य येते कोठून? नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे नुकतीच घडलेली घटना बघता, "एवढे क्रौर्य येते कोठून?' हा प्रश्‍न विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. दारू प्यायलेल्या चार जणांनी एका अल्पवयीन मुलीला अडवून तिच्यावर अमानुष बलात्कार केला. एवढेच नाही, तर त्यानंतर तिची प्रचंड विटंबना केली. ही विटंबना इतकी टोकाची होती, की अमानुषतेने - क्रौर्यानेही शरमेने मान खाली घालावी. पंधरा वर्षांची ही मुलगी कबड्डी खेळायची.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

प्राण्यांची वेदना कळेल? आपली परंपरा, आपली संस्कृती याबद्दल आपण खूप संवेदनशील असतो त्यात अजिबात काही चूक किंवा गैर नाही. पण असे करत असताना आपण त्यात अंतर्भूत असलेल्या सगळ्या गोष्टी पाळतो का, हेही बघायला हवे. सगळेच नसले, तरी आपल्यापैकी अनेक जण तसे करत नसल्याचेच जाणवेल. चेन्नईतील घटना याबद्दलचे अलीकडच्या काळातील खूप बोलके उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यातील क्रौर्य बघून कोणीही संवेदनशील माणूस व्यथित व्हावा.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: