Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
कर्करोग रोखण्यासाठी नॅनोडिस्क कर्करोगावर उपचार करण्यासाठी एक नवीन पद्धती शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. या पद्धतीमुळे कर्करोगावर उपचार करणे एखादे इंजेक्‍शन देण्याएवढे सोपे होऊ शकते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक जेम्स मून यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने नॅनोडिस्क ही नवी उपचारपद्धती शोधून काढली आहे. या नव्या पद्धतीमुळे कर्करोगावरील लस तयार करणे शक्‍य होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

हजारो कृष्णविवरे ‘दृष्टिपथात’ एका तारकासमूहाच्या आजूबाजूला हजारो कृष्णविवरे असल्याचा शोध संशोधकांना लागला आहे. एकाच तारका समूहात अशा प्रकारे कृष्णविवरांचे अस्तित्व असण्याची शक्यता शास्त्रज्ञ इतके दिवस नाकारत होते. सरे विद्यापीठातील संशोधकांनी एका मोठ्या तारका समूहाचा (ग्लोबुलर क्लस्टर) शोध लावला आहे. या ग्लोबुलर क्लस्टरच्या मागे हजारे कृष्णविवरे असल्याचा त्यांचा दावा आहे.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

पक्षीही मारतात अंड्यातील पिल्लाशी गप्पा . . . . . . अंडी उबविणारे पक्षी त्या अंड्यांमध्ये असणाऱ्या (अजून न जन्मलेल्या) पिलांशी गप्पा मारतात, असे म्हटले तर खरे वाटेल का? कदाचित नाही. परंतु, संशोधकांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. महिला गर्भवती असली, की ती आपल्या पोटातील बाळाशी गप्पा मारते. त्याच्याशी संवाद साधते. बाळाचे शिक्षण एकप्रकारे ते बाळ पोटात असल्यापासूनच सुरू होते.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

एक शहर नव्यानं वसतंय नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही तुमचे गाव, शहर सोडून दुसऱ्या शहरात कुटुंबासह गेलात, तर सगळ्याच गोष्टी अनोळखी असतात. मुलांना शाळा नवी, रस्ते नवे, मित्र नवे, वातावरण नवे, सगळ्याच गोष्टी वेगळ्या व नव्या वाटतात ... बदलामुळे निर्माण झालेली अस्वस्थता काही दिवस, काही महिने टिकून राहते. अनेक वेळा आपले मन नव्या शहरात रमत नाही. आपल्या मूळच्या गावाकडेच मन ओढ घेते.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

  पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर पेपर   एका साध्या कागदामार्फत पाणी शुद्ध करता येऊ शकते. हा कागद जंतुनाशक असून, ज्या ठिकाणी अत्यंत अशुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते अशा ठिकाणी या कागदाचा उपयोग होऊ शकतो. पाणी शुद्धीकरणाची ही सर्वांत स्वस्त पद्धती असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जगभरातील साधारण २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही, त्यातही आफ्रिकेतील स्थिती भीषण आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

स्मृती जपायचीय? रीट्विटींग थांबवा! सध्याचे युग हे इंटरनेटचे युग म्हटले जाते. अशा युगामध्ये कायम ऑनलाइन अस्तित्व दाखविण्याची धडपड अनेकांची सुरू असते. मायक्रोब्लॉगिंग साइटचा आधार यासाठी सर्वाधिक घेतला जातो. सर्व प्रकारची माहिती क्षणार्धात उपलब्ध होते आणि ती अगदी बोटाच्या टोकावर उपलब्ध असते. पण अशी दुसऱ्याने तयार केलेली किंवा दुसऱ्याकडून आलेली माहिती फॉरवर्ड किंवा रीट्विट केल्याने आपल्याला काहीच फायदा होत नाही. किंबहुना आपल्या स्मृतीवर गंज चढतो .

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

लघुग्रहांचे आघात जीवसृष्टीसाठी उपयोगी मंगळावर सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी लघुग्रह व धूमकेतू आदळले होते. त्यामुळे तेथील वातावरणात जीवसृष्टीला अनुकूल असे बदल झाले, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. धूमकेतू व लघुग्रह आदळल्याने मंगळावर निर्माण झालेली स्थिती बराच काळ कायम होती. आदळलेले हे लघुग्रह पश्चिम व्हर्जिनिया एवढ्या आकाराचे होते, अशी माहिती अभ्यासातून पुढे आली आहे. कोलोरॅडो विद्यापीठातील प्रा.

Monday, April 18, 2016 AT 12:00 AM (IST)

क्षुद्र ग्रहाचे दर्शन पुढील महिन्यात, पाच मार्च रोजी एका क्षुद्र ग्रहाचे दर्शन पृथ्वीवासियांना होण्याची शक्‍यता आहे. पृथ्वीपासून नऊ हजार ते 17 हजार किलोमीटर अंतरावरून हा क्षुद्र ग्रह जाणार आहे. यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने याबाबतची माहिती दिली आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबरोटरीतील शास्त्रज्ञ या क्षुद्र ग्रहाच्या गतीवर लक्ष ठेवून आहेत.

Monday, February 29, 2016 AT 12:00 AM (IST)

विज्ञानवार्ता -तुमच्या हृदयाची धडधड कधी जोरात तर कधी हळू होतेय. ही धडधड वारंवार अनियमित होतेय का, असे असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. तुमचे हृदय काम कसे करते याचा संबंध धडधडीशी आहे आणि हृदयाच्या पेशी कशा वाढतात यावर हृदयाचे काम अवलंबून आहे. एका नव्या संशोधनामुळे हृदयाच्या पेशी कशा वाढतात यावर प्रकाश पडू शकणार आहे. हृदयाच्या वाढीशी संबंधित असलेली दोन प्रथिने संशोधकांना सापडली आहेत.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

रस्ताच करेल बर्फ साफ! शून्याखाली तापमान जाणाऱ्या भागात जर तुम्ही नियमितपणे प्रवास केला असेल किंवा गाडी चालविली असेल, तर बर्फाळ रस्त्यावरून गाडी चालविणे किती धोकादायक आहे याची कल्पना तुम्हाला येऊ शकेल. या धोक्याचा नेमका अंदाज वर्तविणेही सोपे नाही.

Monday, December 28, 2015 AT 12:00 AM (IST)

वनस्पतींतून "प्रकाशक्रांती' जगातील अनेक भागांत नियमित विद्युतपुरवठा होत नाही. अनेक भागांत तर वीज पोचलेलीच नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारातच बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. या अंधारातून मार्ग काढायचा झाला तर केरोसिनचे दिवे जाळण्याचा पर्याय आहे. मात्र, त्याचा धूर आरोग्यासाठी हानिकारच, त्यामुळे हा पर्याय फारसा चांगला म्हणता येणार नाही.

Monday, December 21, 2015 AT 12:00 AM (IST)

सुरेंद्र पाटसकर ---------------- "शुगरफ्री' नको रे बाबा! गोड पदार्थ खावेत की न खावेत? शुगरफ्री म्हणजे साखर नसलेले पदार्थ चांगले, की साखर असलेले? साखरेच्या पदार्थांमुळे दात खराब होतात की नाही? असे अनेक प्रश्‍न गोड पदार्थ समोर आले की अनेकांच्या डोक्‍यात निर्माण होतात. मग सावधगिरीचा उपाय म्हणून साखर नसलेलेच पदार्थ निवडले जातात, अगदी शीतपेयेही साखरविरहित असलेली पिण्याकडे अनेकांचा कल असतो.

Monday, December 14, 2015 AT 12:00 AM (IST)

सोनेच पण पाण्याहून हलके! सोने... 20 कॅरेट शुद्ध... पण अत्यंत हलके... गरमा गरम कॉफीच्या फेसावर, दुधावर इतकेच नव्हे तर अगदी पाण्यावरही तरंगणारे... खरं वाटतं नाहीये? पण संशोधकांनी ही किमया साध्य केली. झुरीचमधील स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील (ईटीएच) संशोधकांनी पाण्यावर तरंगू शकेल इतका हलका सोन्याचा गोळा तयार केला आहे. प्रा. राफेल मेझेंगा यांच्या नेतृत्वाखाली ही किमया साध्य केली आहे.

Monday, December 07, 2015 AT 12:00 AM (IST)

"घाऊक' क्‍लोनिंग "हव्या असलेल्या प्राण्याचे क्‍लोन तयार करून मिळतील,' अशी जाहिरात पुढील वर्षीपासून इंटरनेच्या माध्यमातून जगभरात दिसू लागली, तर आश्‍चर्य वाटणार नाही. कारण जगातील सर्वांत मोठे क्‍लोन सेंटर (खरं तर घाऊक क्‍लोनिंगचा कारखाना) चीनमध्ये उभारण्यात येत आहे. सर्व प्राण्यांचे क्‍लोन येथे तयार केले जाणार आहेत. "क्‍लोनिंग' हा काही आता नवा विषय राहिलेला नाही.

Sunday, November 29, 2015 AT 12:00 AM (IST)

"सुपर बॅटरी'च्या दिशेने आपण रोज वापरत असलेल्या अनेक उपकरणांतील तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे. उपकरणाची जागा कमी होतेय आणि क्षमता वाढतेय, त्याची किंमतही दिवसेंदिवस कमी होत आहे. याला सन्माननीय अपवाद आहे तो बॅटरीचा! बॅटऱ्यांचे आकार बदलले, त्यांचे उपयोग वाढले, मात्र त्यासाठीचे तंत्रज्ञान पाहिजेत्या वेगाने विकसित झाले नाही. बॅटरीमध्ये ऊर्जा साठविण्याची क्षमता मर्यादित आहे. विशेषतः इलेक्‍ट्रिक मोटारींसाठीच्या बॅटरींना क्षमतेची खूपच मर्यादा आहे.

Monday, November 23, 2015 AT 12:00 AM (IST)

हवेतून वीज जसजसे आपण आधुनिक होत चाललो आहोत, तसतसा आपला विजेचा वापरही वाढत चालला आहे. पारंपरिक पद्धतीने वीजनिर्मितीच्या मर्यादाही आता आपल्याला समजल्या आहेत. त्यामुळे अपारंपरिक स्रोतांचा वापर कसा करता येईल, याचा विचार आणि काही प्रमाणात वापरही सुरू झाला आहे. परंतु, पर्यावरणपूरकदृष्ट्या हे पुरेसे नाही. मग काय करता येईल? हवेतूनच वीज मिळाली तर? हो, हे शक्‍य आहे.

Sunday, October 25, 2015 AT 12:00 AM (IST)

विज्ञानवार्ता   पृथ्वीचे "भविष्य' सांगेल  चीनचा महासंगणक  सुरेंद्र पाटसकर ------------ पृथ्वीचे "भविष्य' सांगेल चीनचा महासंगणक जागतिक तापमानवाढीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. नेमके तापमान किती वाढले आणि त्याचा परिणाम पृथ्वीच्या कोणकोणत्या भागात झाला आणि कोणकोणत्या भागात पुढील काळात होण्याची शक्‍यता आहे, याचा अभ्यास सुरू आहे. तसेच हा परिणाम नेमका कसा होणार आहे, याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

शोध परग्रहवासीयांचा  सुरेंद्र पाटसकर पृथ्वी व्यतिरिक्त इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? याचा शोध घेण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहेत. विश्वाचे विराट रूप अजूनही मानवाला कळालेले नाही. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी जेवढे कुतूहल आपल्याला आहे, तेवढेच किंबहुना त्याहून अधिक कुतूहल पृथ्वीला कोणी जुळे भावंड आहे का, यात आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयोग सुरू आहेत.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

अनेक "साय-फाय' चित्रपटांमध्ये उडत्या तबकड्या आपल्यापैकी अनेकांनी पाहिल्या असतील. "यूएफओ'मार्फत (अनआयडेंटिफाईट फ्लाइंग ऑब्जेक्‍ट') परग्रहवासी भारतात येतात, अशी संकल्पना या चित्रपटांत मांडली गेली आहे. आता मात्र अशीच एक तबकडी मंगळावर पाठविण्याची योजना आहे व तीही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'ची! ज्याला रूढ अर्थाने "यूएफओ' म्हटले जाते, त्या आकाराचे एक यान "नासा' तयार करत आहे.

Tuesday, June 24, 2014 AT 04:34 PM (IST)

पृथ्वीच्या भोवती असलेल्या ओझोनच्या थर पातळ झाल्यास तापमानवाढीसह इतर वाईट परिणामांना आपल्याला तोंड द्यावे लागते याची माहिती आता सर्वांना झाली आहे. त्यामुळेच हा थर कायम ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. "सीएफसी' अर्थात क्‍लोरो फ्लुरो कार्बनचा सर्वाधिक फटका ओझोनच्या थराला बसतो, त्यामुळे "सीएफसी'चा वापर जाणीवपूर्वक कमी करण्यात येतो आहे. परंतु, आता आणखी चार वायूंचा घातक परिणाम ओझोनच्या थरावर होत असल्याची बाब पुढे आली आहे.

Saturday, March 22, 2014 AT 04:01 PM (IST)

विज्ञानवार्ता जोडणे केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी नेत्रपटलावरील पेशी थ्री डी प्रिंटरच्या साह्याने तयार केल्या आहेत. प्राण्यांवर तयार केलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत, मात्र मानवावर प्रयोग करण्यापूर्वी अनेक गोष्टींची तयारी आणि पूर्तता करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्रिमितीय छपाई तंत्राने आता चांगलीच झेप घेतली आहे. निर्जीव वस्तूंपाठोपाठ आता शरीराचे अवयव तयार करण्याचे कसब थ्री डी प्रिंटरमुळे साध्य झाले आहे.

Saturday, December 28, 2013 AT 12:00 AM (IST)

इंटरनेटचा चेहरा आता येत्या काही महिन्यांतच बदलणार आहे. चिनी, रशियन आणि अरबीमध्येही "डोमेन नेम' देता येऊ शकतील. इंटरनेटला जास्त व्यापक करण्यासाठी विविध स्थानिक भाषांत आता "डोमेन नेम' देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंटरनेटवरील डोमेन नेमना मंजुरी देण्याचे काम "इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईंड नेम्स अँड नंबर्स' (आयकॅन) ही संस्था करते. वेब ऍड्रेसच्या शेवटी "डॉट'नंतर जे शब्द येतात, त्यांना डोमेन नेम म्हणतात. उदा.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

नाशिक जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आहेत. अजंठा-सातमाळ रांग, त्र्यंबक रांग अशा डोंगररांगा अनेक किल्ल्यांनी मिळून तयार झाल्या आहेत. त्र्यंबक रांगेतील अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, भास्करगड अशा एकापेक्षा एक सरस गडांनी या परिसराची शोभा वाढविली आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त गडकिल्ले असलेला जिल्हा म्हणजे नाशिक. सेलबारी-डोलबारी रांग, त्र्यंबक रांग, पेठ रांग, अजंठा-सातमाळ रांग, अशा विविध गटांमध्ये नाशिक जिल्ह्यातील किल्ले विभागलेले आहेत.

Saturday, September 14, 2013 AT 08:06 PM (IST)

मूत्रपिंड, यकृत, हात, पाय, त्वचा, कान यासारखे अवयव प्रयोगशाळेत तयार करण्याची प्रक्रिया विविध देशांमध्ये सुरू आहे. इतर अवयवांच्या तुलनेत मेंदूची रचना अतिशय क्‍लिष्ट आहे. त्यामुळे तो प्रयोगशाळेत करणे अत्यंत अवघड आहे. परंतु शास्त्रज्ञांनी मटाराच्या एका दाण्याच्या आकाराचा मेंदू तयार करण्यात यश मिळविले आहे. मानवाच्या शरीराचे विविध भाग प्रयोगशाळेत तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Saturday, September 14, 2013 AT 07:59 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: