Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
राकट चेहऱ्याचा, दमदार कलाकार चित्रपटांतील स्टायलिश अभिनयाचं प्रस्थ कमी होऊन खऱ्या, नैसर्गिक अभिनयाला महत्त्व येऊ लागलं होतं, त्याकाळात ओम पुरी चित्रपटक्षेत्रात आले, हे आपल्यासारख्या प्रेक्षकांचं भाग्य.

Monday, January 16, 2017 AT 12:00 AM (IST)

कारवी बहर कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू नये. एवढेच काय तर डोंगर उतारावरून मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत उभी असतात ती हीच कारवीची झाडे.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

सिद्धहस्त लेखक   ज्येष्ठ, वयोवृद्ध पंजाबी लेखक डॉ. गुरदयालसिंह राही यांचं परवा वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. ते पंजाबी भाषेतले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक होते. बातमी वाचताना गेल्या वर्षी घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्यांच्याशी झालेल्या भेटीविषयी... साहित्य संमेलन कुठल्याही राज्यात आणि कुठल्याही भाषेचं असो, त्यात त्या राज्यातल्या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित लेखकांचा सहभाग नसेल, तर ते संमेलन अपूर्ण राहते.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

"निवारा'चा "निर्मल'आधार... पुण्याच्या नवी पेठेतील "डेव्हिड ससून अनाथ पंगूगृह' (निवारा वृद्धाश्रम) या संस्थेच्या सध्याच्या स्वरूपात बदल घडविण्यात अग्रगण्य भूमिका बजाविलेल्या मानद सचिव आणि विश्‍वस्त निर्मला सोवनी या नुकत्याच काळाच्या पडद्याआड गेल्या. मात्र, गेल्या अडतीस वर्षांतील त्यांचे "निर्मल कार्य' प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहील.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

धुक्‍यात हरवलेले साहित्य! प्रथितयश लेखक ना. सी. फडके यांची पत्नी एवढीच खरे तर त्यांची ओळख कधीच नव्हती. तसा कोणाचा समज असेल, तर तो त्यांच्यावरील अन्याय म्हणावा लागेल. कथा - कादंबरी - प्रवासवर्णन असे विविध प्रकारचे विपुल लेखन करणाऱ्या कमलिनी फडके यांची जन्मशताब्दी 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आपल्या आईचे लेकीने चितारलेले शब्दचित्र. जानेवारी 2015 चा महिना, नव्या वर्षाच्या आनंदासोबत एक जाणीव घेऊन आला. माझी आई कमला फडके 1916 मध्ये जन्मली होती.

Monday, August 08, 2016 AT 12:00 AM (IST)

अध्यात्माच्या जवळ जाणारा "बिंदू' भारतीय दृश्‍यकलेला जागतिक पातळीवर सन्मानाचे स्थान मिळवून देणारे आधुनिक भारतीय चित्रकार सय्यद हैदर रझा ऊर्फ एस. एच. रझा अनंतात विलीन झाले. त्यांना लाभलेल्या दीर्घ आयुष्यात त्यांनी असाधारण अशी कलेची तपश्‍चर्या केली आणि आपल्यामागे आपल्या कलेचा फार मोठा ठेवा ठेवून ते गेले. केवळ कलाप्रेमींच्या प्रेमाला पात्र न ठरता त्यांच्या पेंटिंग्जने- कलाकृतींनी कलेची आंतरराष्ट्रीय बाजारपेठही पाहता पाहता काबीज केली.

Monday, August 08, 2016 AT 12:00 AM (IST)

द ग्रेटेस्ट महंमद अली.. . आयुष्यातील प्रत्येक रिंगणात हा बॉक्‍सर महान, "द ग्रेटेस्ट' ठरला. या कर्तृत्वसंपन्न महंमद अलीने व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये अजरामर ठसा उमटविलाच, जीवनातील प्रत्येक कडवट अनुभवांना कणखरपणे सामोरे जात जबरदस्त ठोसे लगावले आणि विजयश्रीही मिळविली.... "आय एम द ग्रेटेस्ट...' अशी आरोळी महंमद अली यांनी बॉक्‍सिंग रिंगमध्ये ठोकली, ती केवळ पोकळ नव्हती किंवा प्रतिस्पर्ध्यांना घाबरविण्यासाठी नव्हती.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

जागतिक स्तरावरचा विज्ञानकथा लेखक आधुनिक मराठी विज्ञानकथा समृद्ध करणाऱ्या आघाडीच्या लेखकांमध्ये लक्ष्मण लोंढे यांचा समावेश आवर्जून करायला हवा. वाचकाच्या मनात विज्ञानाविषयी गोडी निर्माण झाली, तर तो त्या कथेचा आनुषंगिक परिणाम, साइड इफेक्‍ट मानायला हवा, असं त्यांचं स्पष्ट मत होतं... त्या दिवशी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी प्रथम फोन करून लक्ष्मण लोंढे यांनी जगाचा निरोप घेतल्याचं कळवलं.

Sunday, August 23, 2015 AT 12:00 AM (IST)

आधुनिक मराठी विज्ञानकथा समृद्ध करणाऱ्या आघाडीच्या लेखकांमध्ये लक्ष्मण लोंढे यांचा समावेश आवर्जून करायला हवा. वाचकाच्या मनात विज्ञानाविषयी गोडी निर्माण झाली, तर तो त्या कथेचा आनुषंगिक परिणाम, साइड इफेक्‍ट मानायला हवा, असं त्यांचं स्पष्ट मत होतं... त्या दिवशी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी प्रथम फोन करून लक्ष्मण लोंढे यांनी जगाचा निरोप घेतल्याचं कळवलं. गेली काही वर्षं त्यांना अनेक व्याधींनी ग्रासलं होतं.

Saturday, August 22, 2015 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: