Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
जगाच्या पाठीवरील अनेक देशातील मोठ्या गावांना आपण भेट देतो व तेथील प्रेक्षणीय स्थळे बघतो पण त्या गावापासून जरा दूर काही हटके जागा असतात. त्या जागांनी आपले असे एक वेगळेपण जपलेले असते. ते वेगळेपण व्यवस्थित अनुभवायचे असेल तर त्यासाठी एक दिवस पुरेसा असतो. व्हेनिसमधील मुरानो व बुरानो बेटे, डॅन्युब नदीतले मार्गारेट बेट, ऑकलंडजवळील रोटोरुआ व ग्लोवर्म केव्हज ही अशीच काही आगळी-वेगळी ठिकाणे.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

पॉडकास्टिंगचा नव्याने उदय "एस टाऊन' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पॉडकास्टच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे अमेरिकेत पॉडकास्टिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या पॉडकास्टने केवळ एका महिन्यातच 2 कोटी डाऊनलोडचा आकडा पार केला आहे. -------- पॉडकास्ट हा शब्द अनेक लोकांना नवीन असला, तरीही ती संकल्पना अजिबात नवीन नाही व समजायला कठीणही नाही. पॉडकास्ट म्हणजे ध्वनिमुद्रित कार्यक्रम. रेडिओवरील मालिका असे म्हटले तरी हरकत नाही.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वसामान्य माणसाचे जग व्यापायला सुरवात केली आहे. परंतु आपल्यापैकी अनेकांना याची कल्पनाही नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने पुढील वर्षात आपले जग खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. आणि म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय ते समजून घेण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. मानव हा जगातला सर्वांत बुद्धिमान प्राणी. निदान मानवाला तरी तसेच वाटते.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

ऍमेझॉनची नवीन दुकाने ऍमेझॉन म्हटले, की "ऍमेझॉन डॉट कॉम' हे त्यांचे ऑनलाइन स्टोअर डोळ्यांपुढे येते. ऍमेझॉनवरून खरेदी करायची सवय आम्हाला एवढी लागली आहे, की माझा अडीच वर्षांचा मुलगाही ऍमेझॉनवरून मला हे खेळणे खरेदी करून दे, असे म्हणतो! आणि थोड्याफार फरकाने अमेरिकेतील घराघरांत हीच परिस्थिती आहे. परंतु आता मात्र ऍमेझॉनने खरीखुरी दगड-विटांनी बनवलेली दुकाने उघडायचे ठरवले आहे. यातील काही दुकाने तर तयार होऊन लोकांसाठी खुलीही झाली आहेत.

Monday, May 01, 2017 AT 12:00 AM (IST)

डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचे तंत्रज्ञान आयसीसी-आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल गेल्या कित्येक वर्षांपासून डीआरएस-डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम यंत्रणेचा क्रिकेट सामन्यांमध्ये वापर करत आहे. भारत मात्र विविध कारणांमुळे डीआरएसपासून बरीच वर्षे दूर राहिला. अखेर मागच्या वर्षी इंग्लंडबरोबरच्या टेस्ट मालिकेमध्ये भारताने डीआरएसचा वापर करायचे ठरवले. या यंत्रणेचा कणा म्हणजे त्यातील तंत्रज्ञान.

Monday, April 10, 2017 AT 12:00 AM (IST)

डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचे तंत्रज्ञान आयसीसी-आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल गेल्या कित्येक वर्षांपासून डीआरएस-डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम यंत्रणेचा क्रिकेट सामन्यांमध्ये वापर करत आहे. भारत मात्र विविध कारणांमुळे डीआरएसपासून बरीच वर्षे दूर राहिला. अखेर मागच्या वर्षी इंग्लंडबरोबरच्या टेस्ट मालिकेमध्ये भारताने डीआरएसचा वापर करायचे ठरवले. या यंत्रणेचा कणा म्हणजे त्यातील तंत्रज्ञान.

Monday, April 10, 2017 AT 12:00 AM (IST)

सात ग्रहांची सूर्यमालिका लीड अथांग पसरलेल्या विश्‍वातील अब्जावधी ग्रह-ताऱ्यांपैकी कुठे ना कुठेतरी जीवसृष्टी असेलच, अशी माणसाला आशा आहे. या आशेचा किरण अलीकडच्याच एका शोधामुळे मोठा झाला आहे. जीवसृष्टीला अनुकूल असा एखादा ग्रह नव्हे, तर तब्बल सात ग्रहांची एक सूर्यमालिकाच संशोधकांना सापडली आहे. ----------- विश्‍वात आपण एकटे आहोत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मानव गेल्या कित्येक दशकांपासून करत आहे.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

ट्विटरची व्यथा अलीकडेच जाहीर झालेल्या ट्विटरच्या 2016 च्या चौथ्या तिमाहीचे आकडे पाहून वॉल स्ट्रीट निराश झाली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरचा वापर करून जगाचे मनोरंजन करीत असूनही ट्विटरचे आकडे इतके कमी का, असा प्रश्‍न अनेक लोक विचारीत आहेत. ट्विटरचे उत्पन्न 2016 च्या शेवटच्या तिमाहीत सुमारे 71.7 कोटी डॉलर्स इतके होते. 2015 च्या शेवटच्या तिमाहीशी तुलना केली असता हे उत्पन्न फक्त 1 टक्‍क्‍याने जास्त आहे.

Monday, March 27, 2017 AT 12:00 AM (IST)

स्नॅपचॅटचे यश स्नॅप इंक ही कंपनी तंत्रज्ञान वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध स्नॅपचॅट ऍप बनवणाऱ्या या कंपनीने अलीकडेच "न्यूयॉर्क स्टॉक एक्‍सेंज'मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग- किंवा पहिल्यांदा समभाग विक्री करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने या कंपनीची आर्थिक परिस्थिती पहिल्यांदाच लोकांपुढे येत आहे. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्नॅपचॅट हे ऍप दररोज जवळजवळ 16 कोटी लोक वापरतात.

Monday, March 13, 2017 AT 12:00 AM (IST)

माय फ्रेंड केला "माय फ्रेंड केला' नावाची एक बोलकी बाहुली सध्या जगभरात चर्चेत आहे. अलीकडेच जर्मन सरकारने या बाहुलीवर बंदी घातली. ही बाहुली सुरक्षित नसून या बाहुलीचा वापर लोकांवर पाळत ठेवण्यासाठी अथवा हेरगिरी करण्यासाठी केला जाऊ शकतो असे कारण त्या सरकारने दिले आहे. -- ---- ----- केला बाहुली हा आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार आहे. ही बाहुली तुमच्या मुलांशी चक्क गप्पा मारू शकते! या बाहुलीमध्ये एक मायक्रोफोन बसवलेला आहे.

Monday, March 06, 2017 AT 12:00 AM (IST)

ध्वनिमुद्रित पुस्तके ऑडिओ पब्लिशर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार ध्वनिमुद्रित (ऑडिओ) पुस्तकांचा खप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. स्मार्टफोनच्या उदयामुळे ऑडिओ पुस्तकांचा प्रसार सोपा झाला आहे. इलेक्‍ट्रॉनिक पुस्तकांच्या खपाची वाढ मंदावली असताना ऑडिओ पुस्तकांच्या वाढलेल्या खपामुळे प्रकाशकांना दिलासा मिळाला आहे.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

  ऑनलाइन किराणा डिलिव्हरी अमेरिकेच्या बाजारपेठेत सध्या अनेक ऑनलाइन किराणा माल घरपोच देणाऱ्यांनी गर्दी केली आहे. यात इन्स्टाकार्ट, फ्रेश डिरेक्‍ट, यमी डॉट कॉम अशा नवीन कंपन्यांबरोबर ऍमेझॉन आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. "गुगल एक्‍स्प्रेस' आणि "ऍमेझॉन प्राइम फ्रेश'मुळे दूध, अंडी, पाव, फळे, भाज्या आता अमेरिकन लोकांना घरबसल्या ऍप अथवा वेबसाइटवरून मागवता येत आहेत.

Monday, January 16, 2017 AT 12:00 AM (IST)

लढाऊ विमानांचे भविष्य स्टेल्थ चीनने अलीकडेच झुहाई शहरात भरलेल्या एअर शोमध्ये आपले "जे 20' हे विमान जगापुढे उडवून दाखवले. हे लढाऊ विमान पाचव्या पिढीतील विमान मानले जाते. आतापर्यंत पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर विमान तंत्रज्ञान फक्त अमेरिका आणि नाटो देशांकडेच होते. परंतु, चीनने स्वबळावर पाचव्या पिढीतील विमान बनवून ते यशस्वीपणे आपल्या वायुदलात दाखल करून जगाला आपली लष्करी ताकद दाखवली आहे.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

चीनचे वी-चॅट चीनच्या इंटरनेट कंपन्या सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांची नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चीनमध्ये अमेरिकन इंटरनेट कंपन्या आपल्या सेवा हव्या तशा चालवू शकत नाहीत. म्हणूनच गुगलच्याऐवजी चीनमध्ये "बायडू' आहे, फेसबुकच्या ऐवजी "रेनरेन' आहे, ऍमेझॉनच्या ऐवजी "ताओबाओ' आहे, यू-ट्यूबच्या ऐवजी "यूकू' आहे. परंतु, ऑनलाइन मेसेजिंग म्हणजेच व्हॉट्‌स ऍपसारखी म्हणून सुरवात झालेल्या वीचॅटने (मॅंडरीनमध्ये वीशीन) मात्र सिलिकॉन व्हॅलीला बुचकळ्यात टाकले आहे.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

वाचा पुस्तके स्मार्टफोनवर! लोक पुस्तके ई-रीडरवर जास्त वाचायला लागले आहेत, असे आपण आतापर्यंत ऐकत होतो परंतु आता मात्र लोक ई-रीडरपेक्षा स्मार्टफोनवरच पुस्तके वाचायला लागले आहेत! गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या सुप्रसिद्ध निल्सन या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जे लोक ई-पुस्तके खरेदी करतात, त्यातील अर्ध्याहूनही अधिक लोक (54%) ही "ई-पुस्तके' आता "ई-रीडर'वर न वाचता आपल्या स्मार्टफोनवर वाचतात.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

नोट 7 ला श्रद्धांजली! अकरा ऑक्‍टोबर 2016 या दिवशी सॅमसंगने आपल्या नोट 7 या अतिशय लोकप्रिय गॅलेक्‍सी नोट मालिकेतील नुकत्याच बाजारात आणलेल्या नवीन फोनचे उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केली. 19 ऑगस्टला सॅमसंगने नोट 7 अमेरिकेत विकायला सुरवात केली. म्हणजेच बाजारात आणून दोन महिनेही पूर्ण झालेले नसताना सॅमसंगला हा फोन बंद करावा लागला. त्याचे कारणही तसेच गंभीर होते. एकोणीस ऑगस्टला सॅमसंगने आपला प्रीमियम फोन गॅलेक्‍सी नोट 7 लोकांच्या हातात दिला.

Monday, November 28, 2016 AT 12:00 AM (IST)

डीन सायबर हल्ला घरामध्ये नेहमी वापरली जाणारी उपकरणे - एअर कंडिशनर, फ्रिज, वॉशिंग मशिन, प्रिंटर इत्यादी झपाट्याने इंटरनेटला जोडली जात आहेत. परंतु या उपकरणांच्या सायबर सुरक्षेचा पुरेसा विचार झालेला नाही. 21 ऑक्‍टोबरला अमेरिकेवर झालेल्या सायबर हल्ल्याने हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. एकवीस ऑक्‍टोबरच्या सकाळी अमेरिकेच्या पूर्वोत्तर किनाऱ्यावर इंटरनेट नेहमीप्रमाणे काम करत नव्हते.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

गुगलची नवीन उपकरणे गुगलने 4 ऑक्‍टोबरला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनेक नवीन उपकरणांची घोषणा केली. यामध्ये एक महागडा स्मार्टफोन (दोन आवृत्त्या), एक व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट, एक ब्लूटूथ स्पीकर, वायफाय राउटर आणि क्रोमकास्टची नवीन आवृत्ती याचा समावेश आहे. या उत्पादनांची घोषणा करून गुगलेन एकाच वेळी ऍपल, ऍमेझॉन आणि सॅमसंगशी बाजारपेठेत युद्ध पुकारले आहे.

Monday, November 14, 2016 AT 12:00 AM (IST)

माणसाशी संवाद साधणारा "जीबो' माणसाशी बोलू शकणारे उपकरण ही आता काही नवीन गोष्ट नाही. मायक्रोसॉफ्टची कोर्टाना, ऍपलची सिरी आणि ऍमेझॉनच्या अलेक्‍साने मानवाशी संवाद साधायला सुरवात केली आहे. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून कामेही करवून घेऊ शकतो. जीबो ही त्याचीच पुढची आवृत्ती आहे. जीबो अजून बाजारपेठेत आला नसला, तरी इंडिगोगो नावाच्या वेबसाइटवर जीबोचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओ पाहून तब्बल 3.

Monday, October 17, 2016 AT 01:11 PM (IST)

स्वयंचलित कारचा अपघात अलीकडेच घडलेल्या एका घटनेने स्वयंचलित कारच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उठले आहे. टेस्ला कंपनीची कार ऑटोपायलट मोडमध्ये वेगाने जात असताना ती एका ट्रकवर आदळून त्यातील चालकाचा जागच्या जागी मृत्यू झाला. या प्रकरणाची सध्या अमेरिकेची नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशन चौकशी करत आहे. ही घटना 7 मे 2016 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील विलिस्टन शहरात घडली.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

एन्काउंटरमध्ये रोबोचा वापर डॅलस पोलिसांनी अलीकडेच एका एन्काउंटरमध्ये रोबोचा वापर करून एका संशयित गुन्हेगाराला मारले. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पोलिस कारवाईतील हात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. आतापर्यंत यंत्रांचा वापर करून मानवाला मारण्याची कामगिरी सेना करीत असे. ड्रोन्सचा वापर करून अमेरिकन मिलिटरीने अनेक दहशतवाद्यांना मारले आहे.

Monday, August 15, 2016 AT 12:00 AM (IST)

ब्रेक्‍झिटचा तंत्रज्ञान क्षेत्रावरील परिणाम ब्रेक्‍झिट हा शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांत सर्वत्र ऐकला असेल. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनने नुकत्याच घेतलेल्या निर्णयासाठी हा शब्द वापरला जातो. ब्रिटनच्या या निर्णयामुळे आर्थिक जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. जगभरातील सर्व एक्‍सेंजेसमध्ये शेअरचे भाव कोसळले आहेत. ब्रिटनच्या या निर्णयाचा सर्वच क्षेत्रांतील कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

टेक्‍नोसॅव्ही ः वैभव पुराणिक, लॉस एंजलिस विजेवर उडणारी विमाने कारपासून ते विमानापर्यंत अधिकाधिक गोष्टी अंतर्गत ज्वलन करणाऱ्या इंजिनावर चालण्याऐवजी इलेक्‍ट्रिक मोटारवर चालवण्यासाठी जगामध्ये प्रयत्न सुरू आहेत. अर्थातच याचे मुख्य कारण हे अंतर्गत ज्वलन इंजिनामुळे होणारे प्रदूषण हे आहे.

Monday, July 04, 2016 AT 12:00 AM (IST)

टेक्‍नोसॅव्ही ः वैभव पुराणिक, लॉस एंजलिस लोकप्रिय ऍमेझॉन ऍमेझॉन हा शब्द ऐकल्यावर गेल्या शतकामध्ये ऍमेझॉन नदी आठवायची. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी नदी. दक्षिण अमेरिकेतून वाहणारी. पण गेल्या वीस वर्षांत या शब्दाचा अर्थच बदलून गेला आहे. आज ऍमेझॉन म्हटल्यावर आपल्याला आठवते ती ऍमेझॉन कंपनी किंवा ऍमेझॉन डॉट कॉम ही वेबसाइट. 1995 च्या आसपास सुरू झालेल्या या कंपनीत आजमितीला दोन लाखांहूनही अधिक लोक काम करतात.

Monday, June 27, 2016 AT 12:00 AM (IST)

डीप लर्निंग मशिन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हळूहळू जगाचा चेहरामोहरा बदलत आहे. स्वयंचलित कार हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचेच उदाहरण आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षितिजावर सध्या डीप लर्निंग नावाच्या तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक कठीण समस्यांची उकल संगणकाच्या मदतीने करणे आता शक्‍य होणार आहे. हार्डवेअरमध्ये (संगणकीय उपकरणे) झालेल्या प्रगतीमुळे डीप लर्निंगच्या प्रसाराला अधिकच मदत होत आहे.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

वायरलेस चार्जर कधी कधी एखादे तंत्रज्ञान विकसित होण्याकरिता खूप वाट पाहावी लागते. त्या तंत्रज्ञानाची गरज आहे हे लोकांना पटलेले असते परंतु उपलब्ध पर्याय तेवढे चांगले नसतात. वायरलेस चार्जिंगचे असंच काही झालेलं आहे. वायरलेस चार्जिंग आवश्‍यक आहे, याची खात्री मोबाईल फोन उत्पादकांना पटलेली आहे परंतु तंत्रज्ञानाची सध्याची स्थिती त्याच्या वाढीला पोषक नाही.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

बिटकॉइनचा निर्मितीकार कोण? बिटकॉइनच्या जगात गेल्या काही आठवड्यांत खळबळ माजली होती. ऑस्ट्रेलियन संगणकतज्ज्ञ आणि उद्योजक क्रेग व्हाइट याने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बिटकॉइनची निर्मिती करणारा "सातोशी नाकामोटो' म्हणजे मीच असे म्हटले. त्यामुळे नुसत्या बिटकॉइनच्याच नव्हे, तर संपूर्ण तंत्रज्ञान जगतातच खळबळ उडाली. प्रथम अनेक लोकांनी त्याचे म्हणणे मानले.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

बॅंकेच्या शाखांचे भवितव्य एका प्रसिद्ध वृत्तसेवेच्या एका वृत्तानुसार बॅंकांच्या शाखा कमी होतील, पण पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत. अमेरिकन रिझर्व्ह बॅंकेनुसार मोबाईल बॅंकिंग करणाऱ्या लोकांनाही अजून बॅंकांच्या शाखेचा वापर कशा ना कशासाठी करावा लागतोच. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बॅंका अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतात. बॅंकांच्या शाखांशी मध्यमवर्गीयांचा खूप जवळचा संबंध असतो.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

शार्क टॅंक धाडसी गुंतवणूकदार विविध उत्पादनांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत असतात. या गुंतवणूकदारांना कल्पक उद्योजकांबरोबर भेटवणारी "शार्क टॅंक' ही टीव्ही मालिका अमेरिकेत 2009 पासून गाजते आहे. या मालिकेमुळे सर्वसामान्य अमेरिकन माणसालाही व्हेंचर कॅपिटल (धाडसी गुंतवणूक) म्हणजे काय हे आता कळू लागले आहे... --------- सिलिकॉन व्हॅली - अमेरिकेतील नवनिर्मितीचे माहेरघर. तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कंपन्या इथे दररोज जन्माला येत असतात.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

अलेक्‍सा व इको ः बोलता मदतनीस व्हॉइस अथवा स्पीच रेकग्निशन (आवाज ओळखणारे) सॉफ्टवेअर अथवा उपकरण बाजारात येऊन खरेतर काही दशके उलटली आहेत पण खऱ्या अर्थाने स्पीच रेकग्निशन सर्वसामान्यापर्यंत पोचायला मात्र सध्याचे दशक उजाडावे लागले. गुगलचे मोबाइलवर काम करणारे सॉफ्टवेअर, ऍपलची "सिरी' आणि मायक्रोसॉफ्टची "कोर्टाना' ही नावे आता अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी घरोघरी माहिती झाली आहेत.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: