Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
  नव्या प्रवासाची सुरवात कोणतेही चित्र साकारण्याआधी चित्रकाराच्या समोर कोरा कॅनव्हासच असतो. रंगरेषांची दुनिया त्याच्या मनात असते. त्यांना कोणतीही मर्यादा नसते. उत्स्फूर्त, सहज रेषांमधून साकारणारे चित्र हीच त्याची अभिव्यक्ती असते. विचारांचेही तसेच असते. त्यांचा खळखळता मुक्त प्रवाह मानवी जीवन अधिक सुंदर बनवत असतो. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत तो पुढे-पुढे जात असतो. पण हा प्रवाह थांबला की त्याचे डबके होते.

Monday, December 28, 2015 AT 12:00 AM (IST)

सांगा कसं जगायचं? डॉ. अतुल गावंडे हे अमेरिकेतील प्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि लेखक आहेत. हार्वर्डमधील टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात ते प्राध्यापक आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात संशोधन करतानाच 1998 पासून "द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध नियतकालिकात ते नियमित स्वरूपात लेखन करतात.

Monday, December 14, 2015 AT 12:00 AM (IST)

खरा सेक्‍युलरिझम आणि त्याची दिशा स्वातंत्र्योत्तर भारतात जो शब्द सतत चर्चेत राहिला आणि तरीही ज्याच्याविषयी लोकांच्या मनात सतत गोंधळ राहिला, तो म्हणजे "सेक्‍युलर'. मराठीत त्याचे धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव असे अर्थ लावले गेले. राजकारण्यांनी त्याचा एकमेकांच्या विरोधात सोयीस्कर वापर केला. अभ्यासकांनीही त्याचा अर्थ लोकांना समजावून सांगण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत.

Sunday, November 29, 2015 AT 12:00 AM (IST)

लिहिता लिहिता लिहीत जावे...   नील गायमन हे पाश्‍चात्त्य साहित्य जगतात अतिशय गाजलेलं नाव. "सॅंडमन'च्या रूपानं आधुनिक चित्रमालिका साकारताना गायमन यांनी लहानथोर सर्वांसाठी तितकंच सकस लेखन केलं. गद्य, पद्य, भयकथा, विज्ञानकथा याबरोबरच त्यांनी उत्तम गीतं आणि नाटकंही लिहिली. चित्रपटांसाठी लेखन करण्याबरोबरच मुक्त पत्रकारितेतही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

नव्या मैत्रीपर्वाचा अटल संदेश खड्या बोलीतलं हिंदी, मध्येच थोडासा नाट्यमय पॉज घेणं आणि स्वतःच रचलेल्या कवितांची अधूनमधून पेरणी करत समोरच्या श्रोत्यांना संमोहित करणं... माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अशा वक्तृत्वाची मोहिनी भारतीय जनमानसावर दीर्घ काळ होती.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

  जीवनमूल्यांचा ध्रुवतारा   स्टीव्ह जॉब्स यांच्याइतकेच जगप्रसिद्ध ऍपल कंपनीशी जोडले गेलेले एक नाव म्हणजे टिम कुक. जॉब्स यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुक 1998मध्ये ऍपलमध्ये दाखल झाले. या दोघांच्या नेतृत्वाखाली कंपनीने पुन्हा उभारी घेतली. जॉब्स कर्करोगाशी झुंजत असताना कुक यांनी आपल्या यकृताचा भाग त्यांना देण्याची तयारी दर्शवली होती पण जॉब्स यांनी ती नाकारली. त्यांच्या मृत्यूनंतर ऑगस्ट 2011मध्ये कुक ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.

Sunday, September 27, 2015 AT 12:00 AM (IST)

प्रेरक नेतृत्वाचे "सुवर्णवर्तुळ'   सिमॉन सिनेक हे नेतृत्वासंबंधी प्रशिक्षण देणारे ख्यातनाम वक्ते आणि लेखक आहेत. "स्टार्ट विथ व्हाय' आणि "लीडर्स इट लास्ट' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. रॅंड कॉर्पोरेशन, कोलंबिया विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये ते अध्यापन करतात. "टेड टॉक' या "यू ट्यूब'वरील प्रसिद्ध मालिकेसाठी सप्टेंबर 2009मध्ये "थोर नेते कृतीची प्रेरणा कशी जागवतात,' या विषयावर त्यांच्या भाषणाची चित्रफीत तयार करण्यात आली.

Sunday, September 06, 2015 AT 12:00 AM (IST)

  कलामांचे स्वप्न "लोकांचे राष्ट्रपती' म्हणून नावाजले गेलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा प्रत्येक श्‍वास या देशासाठी होता आणि विकसित भारताचे स्वप्न लाखो तरुणांच्या मनात रुजविण्याचा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने ते कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इतका सुंदर आणि अर्थपूर्ण देहान्त क्वचितच कोणाच्या वाट्याला येतो.

Sunday, August 23, 2015 AT 12:00 AM (IST)

नारायण मूर्ती काय म्हणाले?   भारतातील आयआयटी आणि आयआयएससी (भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था) यांनी गेल्या सहा दशकांमध्ये देशाला काय योगदान दिले, असा परखड सवाल इन्फोसिसचे मानद अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी केला. त्यामुळे भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या कामगिरीविषयी ठळक प्रश्नचिन्ह उभे राहिले.

Wednesday, August 05, 2015 AT 01:16 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: