Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
ज्येष्ठ नागरिक ठेव योजना आता दर तिमाहीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अल्प बचत ठेव योजनांच्या व्याजाचा आढावा घेतला जाणार असून वेळोवेळी व्याजात बदल केला जाणार आहे. यानुसार चालू तिमाहीस (1/4/17 ते 30/6/17) साठी सर्व अल्प बचत योजनांचे व्याज दर 10 पैसे इतके कमी केले आहेत. विमुद्रिकरणाने अर्थव्यवस्थेतील वाढलेली रोखता (लिक्विडिटी) विचारात घेता बॅंकाचे व्याज दर सुद्धा गेल्या वर्षात लक्षणीयरीत्या कमी झालेले आहेत.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

गंडभेरुंड - एक गूढ शिल्प   आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही भिंतींवर, भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर! यातील बहुतांश शिल्पे विविध प्राण्यांची, पक्ष्यांची असतात. इतिहासाच्या पुस्तकात या शिल्पांबद्दल फारशी माहिती सापडत नाही, पण थोडेशी शोधाशोध केली तर बरेच काही सापडते.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

लघु वित्त बॅंकांचे महत्त्व . . . . . "आर्थिक समावेशकते'ची (फायनान्शियल इन्क्‍लुजन) व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक गेली दोन वर्षे विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट 2015 व सप्टेंबर 2015, रिझर्व्ह बॅंकेने अनुक्रमे 11 पेमेंट बॅंका व 10 लघू वित्त बॅंकांना (स्मॉल फायनान्स बॅंक) आपला बॅंकिंग व्यवसाय करण्याची अनुमती देऊ केलेली आहे. मागील एका लेखात आपण पेमेंट बॅंकेबाबतची माहिती घेतली.

Monday, March 27, 2017 AT 12:00 AM (IST)

अमेरिकेतील हल्ले... अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर भारतीय वंशाच्या लोकांवर दोन वर्णद्वेषी हल्ले झाले आहेत. त्याविषयी प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांमुळे अनेक भारतीय पालकांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलांची चिंता लागून राहिली आहे. अमेरिकेत भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आहे का? ट्रम्प सत्तेवर आल्यामुळे तो वाढला आहे का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

पोस्टाची पेमेंट बॅेक गणेश व्यं. सावळेश्वरकर पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे. पोस्ट ऑफिस म्हणजे पत्र असेच समीकरण आहे. पत्रांचा इतिहास जितका जुना, तितकाच टपाल व्यवस्थेचा इतिहाससुद्धा प्राचीन आहे. जसा मनुष्यप्राणी लिहिण्यास शिकला तसा त्याने लिहिलेला अक्षरांतील मजकूर दुसऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी त्याला दूताची गरज भासू लागली.

Monday, February 27, 2017 AT 12:00 AM (IST)

"इस्रो'ची विक्रमी कामगिरी "इस्रो'ने 15 फेब्रुवारी 2017 रोजी परत एकदा इतिहास रचला. त्या दिवशी "इस्रो'ने पृथ्वीच्या कक्षेत 104 कृत्रिम उपग्रहांना स्थान दिले. यात भारताचे 3 उपग्रह, तर उरलेले 101 उपग्रह इतर देशांचे होते. PSLV-C37 या यानाने हे उपग्रह केवळ 28 मिनिटांत अवकाशात पोचले आणि एका मागून एक असे या 104 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्याचे काम 90 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केले.

Monday, February 27, 2017 AT 12:00 AM (IST)

सिलिकॉन व्हॅली विरुद्ध ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या आठवड्यातच केलेल्या कामामुळे तंत्रज्ञान कंपन्यांचे कान उभे राहिले आहेत. आता पुढील चार वर्षांत अशा कुठल्या गोष्टींमुळे ट्रम्प आपल्याला अडचणीत टाकतील याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अध्यादेश काढून जगातील सात मुस्लिम देशांतील लोकांना अमेरिकेत येण्यासाठी तात्पुरती मनाई केली आहे.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

आजची स्त्री नेमकी कशी?   एका रिऍलिटी शोवरील प्रसंग.. "कोण होईल मराठी करोडपती' या शोवर एक मुलगी आणि तिची आई सहभागी झाल्या होत्या. आई अल्पशिक्षित आणि मुलगी होमिओपॅथ डॉक्‍टर. शो जसजसा पुढे जात होता, तसतसे सगळे उलगडत होते. मुलगी सटासट उत्तरे देत होती. आई शांत होती मंद हसत, मान डोलावून मुलीला दाद - सपोर्ट देत होती. पण, सुरवातीचे प्रश्‍न संपले आणि तिच्याही नकळत आई सहभागी होऊ लागली.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

आता लक्ष सोन्याकडे नोटाबंदीनंतर सरकार आता आपल्याकडे असलेल्या सोन्याची चौकशी करणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत असल्याचे दिसून येते. अर्थमंत्रालयाने याबाबत एखाद्या व्यक्तीकडे किती सोने असणे आक्षेपार्ह नाही याबाबत स्पष्टीकरण केले आहे. त्यानुसार विवाहित स्त्रीकडील 500 ग्रॅम, अविवाहित स्त्रीकडील 250 ग्रॅम व पुरुषाकडील 100 ग्रॅमपर्यंत असणाऱ्या सोन्याबाबत कसलेही स्पष्टीकरण देण्याची गरज असणार नाही.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

स्मार्ट अार्थिक व्यवहार  नुकतेच आरबीआय व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) ही पेमेंट प्रणाली कार्यान्वित केली आहे. (दि. 11/04/2016 पासून). ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पेमेंट करता येणारी सुविधा आहे. ही सुविधा यशस्वीपणे राबविल्यास आर्थिक क्षेत्रात व प्रामुख्याने बॅंकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Monday, September 26, 2016 AT 12:00 AM (IST)

झिकाची भीती किती योग्य ? अमेरिकेला सध्या निवडणुकीच्या धामधुमीने घेरले असले तरी या निवडणुकीच्या धामधुमीत अजून एक बातमी लोकांचे लक्ष वेधून घेते आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात व पोर्टो रिको या प्रदेशात झिका व्हायरसचा प्रसार झाला आहे. तिथे झिकाची लागण अनेक लोकांना झाल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने झिकाचा जगातील प्रसार पाहून आणीबाणी लागू केली आहे. या व्हायरस अथवा विषाणूचा प्रवास डासामुळे होतो.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

रिझर्व्ह बॅंकेचे नवे सेनापती राजन यांच्या कार्यशैलीचे वारसदार आणि गेली चार वर्षं रिझर्व्ह बॅंकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम करणाऱ्या उर्जित पटेल यांची रिझर्व्ह बॅंकेचे नवे गव्हर्नर म्हणून निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करणाऱ्या माणसाला संधी दिली आहे. राजन यांच्या अनेक धोरणामागे पटेल यांचे संशोधन आणि पेपरवर्क कारणीभूत होते. आता तेच स्वतःच सेनापती म्हणून सूत्रे हाती घेतील.

Monday, August 29, 2016 AT 12:00 AM (IST)

द्रष्टा लेखक -शास्त्रज्ञ मानवाने अंतराळ संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. "नासा'ने गुरू ग्रहाच्या संशोधनासाठी पाठवलेले "ज्यूनो' हे यान गुरूभोवतीच्या कक्षेत फिरू लागले आहे. गुरू, शनी यांसारख्या मोठ्या ग्रहांबद्दल माणसाला पूर्वीपासून फार कुतूहल वाटत आले आहे आणि ते शमवण्याचे प्रयत्न गॅलिलिओसारखे संशोधक सोळाव्या शतकापासून करीत आले आहेत.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

समन्वित दृष्टीचा सहृदयी ज्ञानोपासक ! किती माणसं जोडलीत तुम्ही आणि तीही किती निर्हेतुकपणे ! आज तुम्ही नसताना घरी माणसांचा जो ओघ वाहतो आहे, तोच आपल्या घराच्या खऱ्या समृद्धीची जाणीव आज आम्हाला पुन्हा एकदा करून देतो आहे. तुमचं जे प्रेम आणि सहृदयता आम्ही घरात अनुभवली, त्याच प्रेमाचा आणि सहृदयतेचा स्पर्श आपल्या कुटुंबापलीकडच्या अनेकांनी अनुभवला आहे. तुमची विद्वत्ता तुमच्या माणूसपणाच्या आड कधी आला नाही.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

अतुलनीय प्रतिभेचा संशोधक विसाव्या शतकात मराठीत निर्माण झालेल्या प्रबोधनाच्या भव्यतेत डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या संशोधकांची व विचारवंतांची नावे घेता येतील. वि. का. राजवाडे, श्री. व्यं. केतकर, धर्मानंद कोसंबी, बाबासाहेब आंबेडकर, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर ही त्यातली काही नावे. उपमेचा वापर करायचा झालाच तर यापैकी कोसंबींएवढीच ढेरे यांची कर्तबगारी आहे असे म्हणता येईल.

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

पाऊस, थुपका आणि मोमोज मृणाल तुळपुळे बाहेर पावसाच्या सरी पडत असतात, काळ्या ढगांनी सूर्याला झाकून टाकलेले असते आणि हवेत सुखद गारवा जाणवू लागतो. अशा वातावरणात वडापाव, सामोसे, कांदाभजी असे चमचमीत पदार्थ खायची हुक्की आली तर काही नवल नाही. पावसाच्या सरी पडू लागल्या आणि पुण्यातील एका रेस्टॉरंटची "आमच्याकडे थुपका आणि मोमोज खाऊन यंदाच्या पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करा' अशी जाहिरात वाचनात आली.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

" एनएसजी'साठी आटापिटा! "एनएसजी' म्हणजेच "न्युक्‍लिअर सप्लायर्स ग्रुप' किंवा मराठीत "आण्विक इंधन पुरवठादार राष्ट्रसमूह' यामध्ये भारताला प्रवेश न मिळाल्याच्या बातम्या आणि त्यावर भरपूर चर्वितचर्वण सध्या विद्वत्‌वर्तुळात सुरू आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांवर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मोदी राजवटीने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केलेला असल्याने तो आणखीनच विशेष प्रकाशझोतात आलेला आहे.

Monday, July 04, 2016 AT 12:00 AM (IST)

शैक्षणिक कर्ज का? कोणासाठी?  शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. नवीनवीन शिक्षणसंस्था शहरांत तसेच ग्रामीण भागात सुरू होत आहेत. याचबरोबर शिक्षणाचा खर्चही वाढत चालला आहे. यावर उपाय व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून बॅंका आता एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज देऊ लागल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती. ------------- दिवसेंदिवस शिक्षणाचे महत्त्व वाढतच चालले असून, शिक्षणाचा प्रसारही झपाट्याने होत आहे.

Monday, June 27, 2016 AT 12:00 AM (IST)

खवय्येगिरी  आम्ही अमेरिकेतील एका छोट्या गावात रहात होतो, त्यामुळे आम्हाला काही पदार्थांची फार उणीव भासायची. गाड्यांवरची भेळ, पाणीपुरी, चाट, उडप्यांच्या हॉटेलमधील इडली-डोसा, मिठाईच्या दुकानातील पेढे, बर्फी, रसगुल्ला... असे असंख्य पदार्थ. खरंतर अमेरिकेतील मोठ्या शहरांमध्ये हे पदार्थ अगदी गाड्यांवरसुद्धा उपलब्ध असतात पण आमच्यासाठी मात्र हे सारे दुरापास्त होते. त्यामुळे हे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी ते स्वतः बनवण्याशिवाय पर्याय नव्हता.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

बिबट्या कुठे जाणार? केवळ "साप' असा शब्द जरी उच्चारला तरी आपल्यापैकी अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. सापांविषयीची भीती आपल्या मनात खोलवर रुजली आहे. केवळ सापच नव्हे तर हल्ली, वाघ, बिबट्या, हत्ती, मगर अशा अनेक वन्यप्राण्यांविषयीची आपल्या मनातील भीती आणि तिरस्कार वाढतच चालला आहे. वास्तविक, आपले पूर्वज निसर्गपूजक होते. वन्यप्राण्यांचे महत्त्व जाणून होते.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

अॅमस्टरडॅमचे मराठी संमेलन ऍमस्टरडॅमजवळच्या अल्मलो या गावी 15 ते 17 एप्रिल दरम्यान "युरोपीय मराठी संमेलन' आयोजित करण्यात आले होते. संगीत, नाटक, नृत्याची मेजवानी देणाऱ्या या संमेलनात वैचारिक आदानप्रदानही चांगले झाले. या संमेलनाचा वृत्तांत.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

निर्वासितांसाठी पुलित्झर पत्रकारितेतील सर्वोच्च समजला जाणारा आणि पत्रकारितेचे नवीन मापदंड निर्माण करणारा पुलित्झर पुरस्कार या वर्षी "द असोसिएटेड प्रेस' (एपी) व "रॉयटर्स' या वृत्तसंस्था आणि "न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राला प्रदान करण्यात आला. पुलित्झर पुरस्कारांचे हे शंभरावे वर्ष आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

शालेय शिक्षणापलीकडचे उपक्रम आपली मुलं सुखी व्हावीत असं सगळ्या आई-बाबांना वाटतं पण सुखाची व्याख्या मात्र कुणाला करता आलेली नाही. सुखी होण्यासाठी फक्त संपत्ती आणि भौतिक यश पुरेसं आहे? की आणखी काही हवं? मग आपण प्रचलित व्याख्या घेतो, ती म्हणजे चांगली नोकरी, मोठं घर, परदेश वास्तव्य, मानसन्मान...

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

प्रयत्न तर करूया...! बत्तीस वर्षांची अनिता समुपदेशनासाठी आली होती. ती सांगत होती, ""मॅडम, आमच्या घरी आम्ही तिघेच असतो. मी, माझा नवरा आणि आमचा तीन वर्षांचा मुलगा. नवरा व मी दोघेही आयटी मध्ये जॉब करतो. ऑफिस घरापासून तसे दूर आहे, त्यामुळे सकाळी साडेआठला घरून निघावे लागते. रोजची सकाळ म्हणजे माझ्यासाठी अगदी तारेवरची कसरत असते.

Monday, March 07, 2016 AT 12:00 AM (IST)

अजून त्या मुखड्याच्या मागे... एकूणच बायकांबद्दल समजदारीनं बोलणं आपल्याकडं कमीच होतं. तशी परंपरा आहे. सराव आहे, त्याविषयीची संवेदनशीलता नाही. शिवाय त्याला कुठूनही संस्थात्मक विरोधही होत नाही. तुम्ही कोणत्याही एका अत्यंत छोट्या ज्ञातीसमाजाबद्दल बोला, व्यवसायाबद्दल बोला, लगेच त्यांचे हितसंबंधी कुठून तरी चाल करून येतील, निषेध करतील, मोर्चा काढतील, बदनामी करतील, कोर्टात खेचतील किंवा सरळसरळ मारामारीवर उतरतील.

Monday, March 07, 2016 AT 12:00 AM (IST)

मराठी भाषेचे राजकीय परिमाण विशिष्ट भूप्रदेश, तेथे वास्तव्य करून राहणारे लोक आणि त्या लोकांची भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या अभेद्य अशी त्रिपुटी होय. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्र/ मऱ्हाष्ट्र देश, तेथील मराठे लोक आणि त्यांची मराठी भाषा असे हे त्रिकूट आहे. त्यामुळे त्यातील कोणत्याही पदाची व्याख्या करायची झाल्यास उर्वरित दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदाचा आधार घ्यावा लागतो व प्रसंगी अन्योन्याश्रय या लक्षणरोषाला सामोरे जावे लागते.

Monday, February 29, 2016 AT 12:00 AM (IST)

मराठी भाषेचे राजकीय परिमाण विशिष्ट भूप्रदेश, तेथे वास्तव्य करून राहणारे लोक आणि त्या लोकांची भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या अभेद्य अशी त्रिपुटी होय. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्र/ मऱ्हाष्ट्र देश, तेथील मराठे लोक आणि त्यांची मराठी भाषा असे हे त्रिकूट आहे. त्यामुळे त्यातील कोणत्याही पदाची व्याख्या करायची झाल्यास उर्वरित दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदाचा आधार घ्यावा लागतो व प्रसंगी अन्योन्याश्रय या लक्षणरोषाला सामोरे जावे लागते.

Monday, February 29, 2016 AT 12:00 AM (IST)

विश्वाचा आवाज अल्बर्ट आइनस्टाईन यांनी मांडलेल्या सिद्धांताची पुष्टी बरोबर 100 वर्षांनी झाली आहे. गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्याद्वारे त्यांनी विश्वाचा आवाज ऐकला आहे. त्यामुळे अवकाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. ""गुरुत्वीय लहरी अस्तित्वात आहेत आणि आम्ही गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. गॅलिलिओने पहिल्यांदा दुर्बिणीतून ग्रह बघितल्यानंतर जसा आनंद त्याला झाला होता, तसाच आनंद आम्हाला झाला आहे.

Monday, February 22, 2016 AT 12:00 AM (IST)

  अन्‌ आज आम्हां ब्रह्मांड उमगले... ! थोडीथोडकी नाही, तब्बल शंभर वर्षं लागली अल्बर्ट आइनस्टाईन यांचं एकमेव शिल्लक असणारं भाकीत अखेरीस खरं ठरायला. सोपं अर्थातच नव्हतं हे सिद्ध होणं... पण जगभराने कधी नव्हे ते विश्वाचा पसारा नेटकेपणाने समजून घेण्याच्या या प्रयत्नांत एकी दाखवली... आणि त्याचा परिणाम म्हणून आजवर आवाक्‍याबाहेर असणाऱ्या असाध्य अशा 'गुरुत्वीय लहरीं'चा शोध लावत जगाने स्वतःलाच एक आगळंवेगळं गिफ्ट दिलं... गुरुत्वीय लहरी...

Monday, February 22, 2016 AT 12:00 AM (IST)

फैलाव झिका विषाणूचा... मातृत्व ही सुंदर, सृजनशील अशी कल्पना. प्रत्येक स्त्रीला हवीहवीशी वाटणारी. लहानग्याची चाहूल लागताच त्या मातेचे स्वप्नांचे मनोरे उभे राहू लागतात. पण लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन भागात झिका विषाणूने घातलेल्या थैमानाने मातृत्व हे शिक्षा वाटू लागली आहे. मातेच्या उदरात असलेल्या बाळाला या विषाणूचा डंख झाला, की त्याच्या मेंदूची वाढ खुंटते आणि लहान डोक्‍याचे विकृत बाळ जन्माला येते आहे.

Monday, February 08, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: