Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
वाचकपत्रे शीर्षक ः पालकपणाची सेकंड इनिंग आपली मुले संसाराला लागली की, आपले पालकपण संपते, असे ढोबळमानाने म्हणता येईल. काही जण आता राहून गेलेल्या गोष्टी करायची एकच घाई उडवतात. प्रवास, मैफील, नाटक सिनेमा, छंदोपासना जे जे आठवते ते ते करायला आता फुरसत असते, खिशाची बऱ्यापैकी परवानगी असते. फारशा जबाबदाऱ्या नसतात. पन्नास ते साठ पासष्ट अशा दरम्यानचा हा काळ असतो. याच दरम्यान पालकपणाची सेकंड इनिंग सुरू होऊ शकते.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

  वाचकपत्रे मी आपल्या साप्ताहिक सकाळची स्थापना होण्याच्या अगोदर साप्ताहिक स्वराज्य होते, तेव्हापासून वाचक आहे. यामधील लेख हे विविध विषयांवर सखोल अभ्यास केलेले असल्याने संशोधकालाही लिखाण करताना उपयुक्त ठरतात. आज आपणास मुद्दाम पत्र लिहिण्याचे कारण, की 2 एप्रिल 2016 चा अंक 25 मार्चलाच मिळाला आणि त्यावरील कव्हर स्टोरी, "सह्यमाथ्यावर नियोजन हवे' हा लेख माझे विद्यार्थी डॉ. राम साबळे यांनी अतिशय मुद्देसूद लिहिला आहे.

Monday, April 18, 2016 AT 12:00 AM (IST)

सकाळ साप्ताहिकमध्ये (9जानेवारी2016) च्या अंकापासून सुरू झालेले "मजारामाच्या गोष्टी' हे मृणालिनी वनारसे यांचे नवीन सदर चांगले आहे. या सदरात मनोरंजक उदाहरणे आणि अलंकार असल्यामुळे अत्यंत वाचनीय आहे. हे सदर महितीपूर्ण असून, मला नियमित वाचायला आवडेल. मंदार पारखी, पुणे (ई-मेलद्वारे) सकाळ साप्ताहिकाचा नियमित वाचक आहे. सकाळ साप्ताहिकचे बदललेले स्वरूप चांगले आहे. डॉ.

Monday, February 01, 2016 AT 12:00 AM (IST)

समर्पक मांडणी ंमंगला गोडबोले यांचा "न ऐकणारा समाज' हा (ता. 21 नोव्हेंबर) लेख नेहमीप्रमाणेच छान आहे पण सामान्य वाचकामधला "सामान्य' हा शब्द "कॉमन' या अर्थाने न घेता "सर्वसामान्य' या अर्थाने घेतला आहे. "पेशंट लिसनर' मात्र "चांगला श्रोता', अशा योग्य अर्थाने घेतला आहे. अर्थात, त्यामुळे त्यांचा मुद्दा अतिशय समर्पक मांडला गेला पण त्यांनी काही वेगळा विचार करायला हवा होता. कल्याणी नामजोशी (ई-मेल द्वारे) स्त्री-अर्थाची संकल्पना डॉ.

Monday, December 14, 2015 AT 12:00 AM (IST)

वाचकपत्रे * लघुकथांना मिळाले व्यासपीठ "सकाळ साप्ताहिक'चा वर्धापन दिन विशेष (3 ऑक्‍टोबर 2015) आवडला. अंकातील सहाही कथा वाचनीय होत्या. या निमित्ताने लघुकथांना व्यासपीठ मिळाले. या अंकातील मंगला गोडबोले यांचा "जॅक ऑफ ऑल..?' हा लेख चिंतनीय आहे. आपला पाल्य प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असावा, असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यासाठी मुलांच्या मनाविरुद्ध कलाकौशल्यांचे अनेक क्‍लासेस लावले जातात. "एक ना धड, भाराभर चिंध्या' ही म्हण मग तंतोतंत लागू पडते.

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

साप्ताहिकाचे नवे स्वरूप आकर्षक "सकाळ साप्ताहिका'चे नवे स्वरूप हे अधिक नक्कीच माहितीपूर्ण व आकर्षक आहे. जुना अंक फास्ट फूड सारखा आणि जुना अंक पारंपरिक थाळी सारखा वाटतो. एखाद्या कॉफी टेबल बुक सारखा नवीन अंक पटकन वाचून होतो. त्यामुळे कमी वेळात ज्ञानात  जास्त  भर पडते. काळानुसार बदल हा हवाच आणि तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे.

Saturday, August 20, 2011 AT 12:00 AM (IST)

प्रबोधन आणि परिवर्तन "सकाळ साप्ताहिक'ने गेल्या चोवीस वर्षांत एक उत्तम नवी पिढी घडवली आहे आणि यावर्षी हे साप्ताहिक रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असताना नवा उत्साह, नवी उमेद आणि प्रबोधन व परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. एक संस्कारक्षम साप्ताहिक म्हणून याची गणना प्रथम क्रमांकावर होते. वाचकांना उत्तम आणि प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून "सकाळ साप्ताहिक'ने वाचकवर्गाला प्रगल्भ केले आहे.

Saturday, July 09, 2011 AT 12:00 AM (IST)

मेष - आत्मिक बळ वाढेल. व्यवसायात अवघड कामात यश मिळेल. महत्त्वाकांक्षी योजना सफल होतील. नवचैतन्य सळसळेल. नोकरीत कमी श्रमात यश मिळवण्याचा प्रयत्न कराल. जोडधंद्यातून कामाई होईल. महिलांना खरेदीचा आनंद मिळेल. वृषभ- "मनी वसे ते स्वप्नी दिसे' या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात बराच काळ मनात रेंगाळणारे बेत साकार करण्याची संधी मिळेल. दूरदृष्टीने केलेली गुंतवणूक उपयोगी पडेल. नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल. वरिष्ठ व सहकारी पाठिंबा देतील.

Saturday, July 09, 2011 AT 12:00 AM (IST)

पालक-मुलांमध्ये योग्य संवाद हवा  "सकाळ साप्ताहिक'मधील "मुलांचे करिअर आणि पालकत्व' हा लेख वाचला. अत्यंत योग्य वेळी व योग्य प्रसंगी हा लेख प्रकाशित करून पालक व मुले या दोघांनाही योग्य व विधायक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्नही चांगला आहे. दहावी, बारावीचे निकाल लागले, की अमुक अमुक शाखेला प्रवेश घेण्याचा होरा पालक मुलांच्यामागे लावतात. थोडक्‍यात, पालक आपल्या इच्छा-आकांक्षांचे ओझे मुलांवर लादतात.

Saturday, June 25, 2011 AT 12:00 AM (IST)

स्फूर्तिदायक लेख मी एक शेतकरी असून "सकाळ साप्ताहिक'चा पूर्वीपासूनचा वाचक आहे. हा अंक वाचनीय आणि माहितीपूर्ण असतो. अंकाचे मुखपृष्ठ आणि आतील छायाचित्रेही खूपच सुंदर असतात. अंकाचे स्वरूप आकर्षक असून माहितीसुद्धा चांगली असते. "सकाळ साप्ताहिक'च्या 4 जूनच्या अंकातील माहिती स्फूर्तिदायक वाटली. या अंकातील "दुभंगून जाता जाता' व "कुठे होतो, कुठे आलो' हे लेख खूपच माहितीपूर्ण आहेत. असेच दर्जेदार माहितीचे लेख अंकात समाविष्ट करावेत.

Saturday, June 18, 2011 AT 12:00 AM (IST)

वाचकांच्या आवडी-निवडींना अंकात प्राधान्य "सकाळ साप्ताहिक'चा 28 मे 2011 चा अंक वाचनात आला. बदलत्या काळाबरोबर वाचकांच्या आवडी-निवडीला प्राधान्य देऊन हे बदल केले आहेत. फेकून द्या उणिवा, कशी ओळखाल खोटी नोट, बुकशेल्फ ही सदरे फारच आवडली. वाचनसंस्कृतीच्या वृद्धीसाठी ती निश्‍चितच पोषक आहेत मात्र ज्येष्ठांसाठी एखादे सदर सुरू केल्यास बरे होईल. अंक व अंकातील बदल उपयुक्त आहेत. - श. मा.

Saturday, June 11, 2011 AT 12:00 AM (IST)

वाचकपत्रे नवा अंक संग्राह्य पाहताक्षणीच "सकाळ साप्ताहिक'चा नवा अंक आवडला. उत्सुकतेने चाळून वाचूनदेखील संपवला. अतिशय सुरेख, नावीन्यपूर्ण अंक आहे. विषयाचे वैविध्य व ते विषय सुरेख मांडलेले आहेत. वाचायलाही हा अंक सहज व सुलभ आहे. "कथा यशाची"मधील "निटॉर'चे सर्वेसर्वा सी. ई. पोतनीस व "अनिवासी गाववासी चळवळी'चे नायक प्रदीप लोखंडे यांची यशोगाथा अतिशय प्रेरक आहे. त्यातून एक नवी उमेद मिळाली. ठरवल्यास, निर्धार केल्यास काहीही अशक्‍य नाही.

Saturday, June 04, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: