Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
"सौरगट' ही जागतिक नेतृत्वाची संधी पॅरिस येथील जागतिक हवामान बदलासंदर्भातील आव्हानावर उपाययोजना काढण्यासाठी फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे नुकतीच जागतिक परिषद झाली. या परिषदेच्या व्यासपीठावर भारताकडून आंतरराष्ट्रीय सौरगटाची (सोलर अलायन्स) घोषणा करण्यात आली.

Monday, December 28, 2015 AT 12:00 AM (IST)

त्वचा, केसांची निगा प्रत्येक ऋतूमध्ये हवामान बदलानुसार जसा शरीरावर परिणाम होत असतो, तसा तो त्वचा व केसांवरही होत असतो. पावसाळ्यातील ओले, कोंदट वातावरण तरी याला अपवाद कसे असेल? या काळात त्वचा व केसांची कशी काळजी घ्यायची, याबद्दल मार्गदर्शन. ऋतुमानातील बदलाबरोबर होणाऱ्या हवामानातील बदलामुळे जसे वेगवेगळे साथीचे आजार पसरतात, तसेच काही त्वचाविकारसुद्धा विशिष्ट ऋतूंमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.

Monday, July 27, 2015 AT 05:50 PM (IST)

a
< p style='text-align:center font-size:xx-small overflow:auto height:100% '> < a href='http://worditout.com/word-cloud/927197/private/7c772df3cd2cea17206744327cf55f62' title='Click to go to this word& nbsp cloud on WordItOut.com'> & quot Uddhav 1& quot < /a> < br /> Click on the link above to see this word& nbsp cloud at < a href='http://worditout.

Thursday, June 18, 2015 AT 07:18 PM (IST)

छातीत दुखण्याचे जाणवणे विविध प्रकारचे असू शकते. ते तीव्र किंवा सौम्य असू शकते. एखादा चाकू खुपसल्याप्रमाणे अथवा गुद्दा मारल्यानंतर दुखावे असे असते. सतत अथवा ठोके पडल्याप्रमाणे स्पंदनात्मक प्रवृत्तीचे असते, ते एका बोटाने जागा दाखविता येण्याजोग्या जागेत अथवा तळहात ठेवून अंदाजे जागा आखून दाखविता येते. हृदयविकाराची वेदना केवळ छातीतच मर्यादित असेल असे नसते. हृदयविकारात दुखणे छातीवर, जबड्यावर, मानेत अगर पाठीत, क्वचित वरच्या पोटात दाब आल्यासारखे दुखते.

Tuesday, November 04, 2014 AT 07:45 PM (IST)

खोकला ही एक ऐच्छिक आणि प्रतिक्षिप्त (रिफ्लेक्‍स, इच्छेचा भाग नसणारी) अशा दोन्ही प्रकारची क्रिया आहे. आपल्या श्‍वासनलिकांत अडकलेले स्राव काढून टाकून श्‍वासनलिका मोकळ्या व्हाव्यात हा खोकल्याचा हेतू होय. मेंदूकडे संवेदना नेणारी व्हेगस (vagus) शीर श्‍वासनलिकांकडून मेंदूकडे संवेदना नेते. शिवाय बाह्य कर्णाच्या नलिकेकडून आणि अन्ननलिकेच्या शेवटच्या भागातूनदेखील व्हेगस नर्व्हमधून मेंदूकडे संवेदना जातात.

Saturday, June 28, 2014 AT 04:27 PM (IST)

आपल्या रक्तातील लाळ रक्त गोलकांमध्ये हिमोग्लोबिन असते. लाल रक्तगोलकांची संख्या कमी झाली, की रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढ व्यक्तीच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण 13 ग्रॅम प्रति 100 मिलिलिटर्स असे रक्तात असायला हवे. ते प्रमाण 10 ग्रॅम किंवा कमी झाल्यास त्या व्यक्तीला दखलपात्र रक्तक्षय झाला आहे, असे म्हणतात. रक्तक्षय होण्याचे प्रमुख कारण ??? रक्तस्त्राव होत राहणे, हे होय.

Saturday, March 22, 2014 AT 03:54 PM (IST)

रक्तक्षय. रक्तात पांढऱ्या रक्तगोलकांचे प्रमाण वाढलेले असणे आणि शरीरात दाह होत असल्याचे लॅबोरेटरी टेस्टवरून लक्षात येते. तेव्हा आतड्याचा दाह होत असल्याचे लक्षात येते. कोलॉनोस्कॉपी व आवश्‍यक तेथून घेतलेल्या सॅम्पलची बायॉप्सी यांनी निदान निश्‍चित करता येते. अमायनोसॉलिसिलेट आणि कार्टिझोन ही औषधे असणारे एनिमा वापरणे उपयोगी ठरते. तोंडाने वापरण्यात येणारे प्रभावी औषध म्हणजे मेझालॅझिन. हे दीर्घ काळ घेणे इष्ट असते.

Saturday, February 15, 2014 AT 12:00 AM (IST)

जेव्हा मल घट्ट होतो (खडा) मल बाहेर टाकताना कष्ट घ्यावे लागतात. (मलप्रवृत्ती सहन होत नाही.) आणि मलप्रवृत्तीची वारंवारिता संथावते, तेव्हा मलावरोध झाला आहे असे म्हणतात. अनेकदा हा शब्द चुकीने वापरला गेल्याचे आढळते. "शौचाला जाऊन आल्यावरदेखील अजून पोट साफ झाले नसल्याच्या भावनेला "मलावरोध' म्हणतात. हा "मलावरोध' या शब्दाचा चुकीचा वापर असतो.

Saturday, January 25, 2014 AT 12:00 AM (IST)

वयाच्या 20 वर्षांनंतर पुढील तपासण्या करणे इष्ट ठरते. आपली उंची आणि वजन दर महिन्याला नोंदवावी, या काळात उंची कायम राहते. वजनात वाढ अथवा घट होऊ लागल्यास कारण शोधणे आवश्‍यक असते. अकारण वजन वाढण्यामागे शरीरात मेदवृद्धी अथवा पाणी साचणे ही कारणे प्रमुख असतात. आहारात उष्मांकांचा अतिरेक आणि व्यायामाचा अभाव ही मेदवृद्धीची कारणे असतात, तर शरीरात मीठ व पाणी साचण्यामागे हृदय, यकृत अथवा मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड आला आहे का हे प्रथम पाहावे लागते.

Monday, September 09, 2013 AT 05:40 PM (IST)

अन्ननलिकेतील स्नायूंचे विशिष्ट क्रमाने आकुंचन व प्रसरण झाले तरच गिळलेले अन्न पोटात-जठरात जाते. कधी हा क्रम चुकतो. स्नायू भलत्याच ठिकाणी भलत्याच वेळी आकुंचन पावतात. रुग्णाच्या छातीत जोरात कळ येते. अन्न किंवा पाणी गिळले जात नाही. याला इसोफिजियल स्पॅझम म्हणतात. (oesophageal spasm). अन्ननलिकेच्या खालच्या टोकाचे स्नायू असे आकुंचित स्थितीतच राहिले तर अन्न जठरात उतरत नाही. याला ऍकेलिझिया कार्डिया म्हणतात. (achalaasia cardis).

Saturday, July 27, 2013 AT 12:00 AM (IST)

आपल्याला पोटात जाणवणारी अस्वस्थता लोक वा रुग्ण वेगवेगळ्या शब्दांत वर्णन करीत असतात. साधा पोटात झालेला गॅस/गुबारा हे हार्टऍटॅकचं लक्षणही असू शकतं! गॅस झाला म्हणून पोट शेक, ओवा-शेपा दे अशा घरगुती उपायात अडकून पडून वैद्यकीय उपचार लवकर न मिळाल्यामुळे दुखण्याचे गांभीर्य व लक्षणे वाढू शकतात. पोटातला अल्सर-आमांश-अपचन-ऍसिडिटी-बद्धकोष्ठता यांसारख्या विकारांमध्येसुद्धा खूप वेळा पोटफुगी/पोटदुखी/गुबारा/गॅस यांसारखे त्रास संभवतात.

Saturday, July 27, 2013 AT 12:00 AM (IST)

अन्ननलिकेचा कॅन्सर स्त्रियांपेक्षा पुरुषात जास्त प्रमाणात होताना आढळतो. धूम्रपान, अतिरेकी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि गॅस्ट्रो इसोफेनियल रीफ्लक्‍स डिसीझ असणाऱ्या व्यक्तींत हा कॅन्सर होण्याची शक्‍यता वाढते. सुरवातीला फारसा त्रास जाणवणारही नाही, पण जसा आजार वाढतो तसा अन्न गिळण्याला त्रास होऊ लागतो. त्यातही घट्ट पदार्थ घेणे प्रथम त्रासदायक ठरते, नंतर प्रवाही पदार्थ गिळताना सुद्धा त्रास होतो. रुग्णाचे वजन कमी होऊ लागते.

Saturday, July 20, 2013 AT 12:00 AM (IST)

सायकलिंग हा अतिशय चांगला आणि उपयोगी व्यायामप्रकार आहे. सायकलीला पेट्रोल लागत नाही, देखभालीसाठी फार खर्चही लागत नाही आणि प्रदूषण एकदम शून्य! पण या सर्व कारणांशिवायही उत्तम कारण म्हणजे सायकलिंग आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. हात, पाय, पाठ, पोट किंबहुना शरीरातील सर्व स्नायू सायकलिंगमुळे ताणले जाऊन व्यायाम होतो. सायकल चालवत जरा शहराबाहेर गेले, की मनातील मळभ दूर होते आणि ताजेतवाने वाटते.

Saturday, July 20, 2013 AT 12:00 AM (IST)

छाती आणि पोट यांच्यामध्ये एक स्नायूंचा पडदा असतो, त्याला विभाजक पटल (डायफ्रॅम ) म्हणतात. या पडद्यातून अन्ननलिका छातीतून पोटात जठराला जोडली जाते. ज्या मोकळ्या जागेतून अन्ननलिका विभाजक पटलातून जाते ती जागा काही कारणांनी मोठी झाली, तर पोटातून जठराचा काही भाग छातीत वर जातो, याला हयाटस हर्निया म्हणतात. या हयाटस हर्नियामुळे अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला असणाऱ्या झडपेचे कार्य नीट होऊ शकत नाही.

Saturday, July 13, 2013 AT 12:00 AM (IST)

अन्ननलिकेच्या शेवटी असणारी झडप अकार्यक्षम झाल्यामुळे जठरातील आम्लयुक्‍त स्राव वारंवार अन्ननलिकेत येण्याने गॅस्ट्रो-इसोफेजियल - रिफ्लक्‍स डिसीज होऊ लागतो. ही झडप अन्नाचा घास जठरात गेल्यावर बंद होणे आवश्‍यक असते. ती झडप उघडीच राहिली, की जठरातील आम्ल अन्ननलिकेत (उलट्या दिशेने) शिरू लागते. अन्ननलिकेच्या अस्तराचा दाह होतो, छातीत जळजळ होते. जेवणानंतर आडवे पडण्याने त्रास जास्त होतो. त्रास छातीत प्रथम जाणवतो, मग मानेत व हातातदेखील जाणवू लागतो.

Saturday, July 06, 2013 AT 07:46 PM (IST)

दातांनी चावून मऊ केलेला घास तोंडातून अन्ननलिकेत घशातून प्रवेश करतो. असा घास अन्ननलिकेत प्रवेश करताना श्‍वासनलिका (ट्रॅकिया) पूर्णपणे झाकली जाते. त्यामुळे अन्नाचे कण श्‍वासनलिकेत प्रवेश करू शकत नाहीत. अन्ननलिकेतील स्नायू प्रभावी लाटा निर्माण करतात. या लाटांमुळे अन्नाचे घास जठराकडे ढकलले जातात. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला स्नायूंची एक गोलाकार चकती असते. वरून अन्न आले की हे स्नायू शिथिल होतात.

Saturday, June 29, 2013 AT 09:44 PM (IST)

तोंडात होणारा कॅन्सर बहुतेक वेळा तंबाखूच्या सेवनामुळे होतो. तंबाखूच्या सेवनाबरोबरच जर मद्यपान होत असले, तर कॅन्सर होण्याची शक्‍यता बरीच वाढते. तोंडात जखम होणे, गाठ जाणवणे किंवा लालसर चट्टा पडणे ही कॅन्सरच्या सुरवातीची लक्षणे होय. तोंडातील कॅन्सर बरा होण्याचे रहस्य लवकर निदान होण्यात आहे. तोंडात पांढरा किंवा लाल चट्टा पडणे, गाठ जाणवणे अथवा जखम होणे असे काही विकार दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकले, तर त्याच्या कारणांची शहानिशा करणे आवश्‍यक असते.

Saturday, June 22, 2013 AT 07:29 PM (IST)

कानातील यंत्रणा अतिशय संवेदनाक्षम असते. अनेक कारणांनी या यंत्रणेला अपाय होऊ शकतो. कोणतेही औषध आपल्या शरीराला परकीय असा रेणू असतो. या रेणूच्या अतिरेकाने कोणालाही अपाय होणे संभवते. काही व्यक्‍तींमध्ये विशिष्ट अवयवात विशिष्ट रेणूंबद्दल संवेदनाक्षमता वाढलेली असते. अशा व्यक्‍तींमध्ये सर्वसाधारण इतर कोणाला त्रास होणार नाही, इतक्‍या डोसनेसुद्धा अपाय संभवतो. कानातील श्रवणेंद्रियातील मज्जातंतूंना काही औषधांच्या रेणूचा कमी-जास्त प्रमाणात अपाय होतो.

Tuesday, May 28, 2013 AT 04:06 PM (IST)

रनिंग करताना सकाळी उठून केवळ धावणे हे लक्ष्य ठेवून उपयोगाचे नाही. रनिंग हा एक शास्त्रशुद्ध व्यायाम आहे. त्यासाठी योग्य जागा, योग्य बूट, कपडे या सगळ्याची निवडही महत्त्वाची असते. त्यामुळे दुखापती टाळता येतात. रनिंग करताना दुखापत होणे ही सामान्य बाब आहे. त्यामुळे रनिंग करणे व चुकीचे रनिंग केल्यामुळे होणाऱ्या इजांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. रनिंग करण्याआधी, करत असताना व केल्यानंतर काही सावधगिरी बाळगणे गरजेचे असते.

Tuesday, May 28, 2013 AT 03:57 PM (IST)

स्त्रियांमध्ये आढळणारा एक आजार म्हणजेच अनोरेक्‍झिया नर्व्होझा आणि बुलिमिया किंवा भूक जाणे. नर्व्होझा म्हणजे मेंदू (येथे अर्थ मन) च्या कार्यातील दोषामुळे निर्माण झालेले विकार. आपले आदर्श वजन किती असावे, हे बॉडीमास इंडेक्‍स ठरवितो. जेव्हा एखादी व्यक्‍ती वजन कमी करण्याकरिता पथ्य पाळते तेव्हा बॉडीमास इंडेक्‍सकडे लक्ष ठेवून पथ्य पाळण्याची आवश्‍यकता असते.

Saturday, May 18, 2013 AT 07:01 PM (IST)

कानातील गंभीर दोष म्हणजे कानातून मेंदूकडे जाणाऱ्या शिरेवर गाठ येणे हा होय. याला ऍकॉस्टिक न्यूटोमा म्हणतात. एका बाजूला आवाज येऊ लागतो व थोड्याच काळाने त्या बाजूने ऐकणे कमी होऊ लागते. चक्‍कर येते. म्हणजे गोल फिरण्याची भावना जाणवू लागते. चेहऱ्यावरचे स्नायू कमजोर होतात. त्यामुळे चेहरा वेडा-वाकडा दिसू लागतो. मळमळ होते. उलटी येते. हा एक गंभीर आजार असून, लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असते.

Saturday, May 18, 2013 AT 07:00 PM (IST)

कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने केली, की दुखापत होणारच. रनिंग तरी याला अपवाद कसे असेल? रनिंग करताना योग्य तंत्राचा वापर केला नाही, तर गुडघेदुखी, पायदुखी, घोटादुखी असा समस्या संभवतात. त्यामुळे रनिंग सुरू करताना जशी त्याबद्दल योग्य माहिती हवी, तशीच ते योग्य पद्धतीने केले नाही तर होणाऱ्या दुखापतींचीही माहिती हवी. त्याबद्दल- आपल्याला वाटते तितके रनिंग करणे सोपे नसते.

Saturday, May 18, 2013 AT 06:57 PM (IST)

अंगात रक्‍त कमी असले (रक्‍तक्षय) तर तात्पुरता कानात आवाज येऊ लागतो. व्यक्‍ती फिकी दिसते, थकवा येतो, अशक्त होते. तुलनेने माफक श्रमाने धाप लागू लागते. नाडीची गती जलद असते. पाणी वहावे व थांबावे अशा प्रकारचा आवाज येत राहतो. असाच आवाज मानेतील कॅरोटिड रक्‍तवाहिन्यांच्या रोहिणी काठिण्यात येऊ लागतो. मानेतील रक्‍तवाहिनीवर दाब दिल्याने हा आवाज थांबू शकतो. मानेवर व कानाच्या पाळीवर स्टेथोस्कोपने मोठा आवाज ऐकू येतो.

Tuesday, May 14, 2013 AT 07:39 PM (IST)

कानात घंटानाद ऐकू येतो. अन्य प्रकारचे ध्वनीदेखील ऐकू येऊ शकतात. फुग्यातून हवा सुटताना येणारा आवाज, वाहत्या पाण्याचा आवाज, पाणी उकळावयास लागण्यापूर्वी येणारा आवाज, रिकामा शंख कानाशी धरल्यावर येणारा आवाज किंवा हुंकार दिल्यासारखा आवाज, असे विविध प्रकारचे ध्वनी ऐकू येतात. क्वचित गर्जना केल्याप्रमाणे किंवा संगीताच्या सुरासारखादेखील आवाज ऐकू येतो, असे व्यक्‍ती सांगते. असे आवाज एका किंवा दोन्ही बाजूंना ऐकू येणे शक्‍य असते.

Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)

पायरोसिस म्हणजे जठरातील आम्लयुक्त गुळणी छाती व घशात येण्याने जळजळ होणे. छाती आणि पोट यांच्या मधे एक स्नायूंचा विभाजक पडदा असतो. या पडद्याच्या मानेकडच्या भागात छातीच्या पिंजऱ्यातील हृदय, फुफ्फुसे आदी अवयव असतात. दुसऱ्या बाजूला उदराच्या पोकळीतील आतडी, यकृत, प्लिहा, मूत्रपिंडे आदी अवयव असतात. आपण खाल्लेले अन्न तोंडातून घशातून अन्ननलिकेद्वारे पोटाकडे जाते. अन्ननलिका या विभाजक पडद्यातून उदराच्या पोकळीत जाऊन जठरला जोडली जाते.

Monday, April 01, 2013 AT 01:08 PM (IST)

अनेक प्रकारच्या कारणांमुळे जठरातील पाचक रस अन्ननलिकेत जाऊ शकतात. उलटी होण्यापूर्वी अनेकदा मळमळते. तसे आता जाणवत नाही. उलटी काढताना रुग्णाला श्रम होतात. पाचक रस रुग्णाने कोणतेही प्रयत्न न करताच अन्ननलिकेत जाऊ शकतात. हे रस घशापर्यंत गेले तर ते (चुकून) श्‍वासनलिकेत उतरू शकतात. त्यामुळे श्‍वासनलिकांचा व फुफ्फुसाचा दाह होणे संभवते. परिणामी, खोकला येणे, धाप लागणे, कफ तयार होणे असे त्रास होतात.

Saturday, March 23, 2013 AT 12:00 AM (IST)

शरीराचे कोणतेही हाड मोडू शकते. हाडाची स्थिती आणि आघाताची तीव्रता, यावर हाड मोडणार किंवा कसे हे ठरते. हाडाची स्थिती आपल्या आहार, व्यायाम आणि काही अंतग्रंथींच्या स्रावांवर अवलंबून असते. हाडे बळकट राहण्याकरता चांगल्या प्रतीचे पुरेसे प्रथिन, जीवनसत्त्व अ, क आणि ड, कॅल्शियम, लोह यांची आहारात कमतरता नसावी. चांगल्या प्रतीचे प्रथिन उपलब्ध व्हावे, या दृष्टीने तृणधान्ये आणि डाळी, दूध-दुभते यांचे मिश्रण इष्ट असते.

Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)

न्यूमोनिया, टी.बी, फुप्फुसाचा कॅन्सर आणि "पल्मनरी' इन्फेक्‍शन इत्यादी प्रकारच्या आजारांमध्ये कधी कधी उरोपोकळीत एक प्रकारचा द्राव साठतो. त्यालाच "प्ल्यूरसी' असे डॉक्‍टर संबोधतात. आपल्या फुप्फुसावरील आंतरआवरण आणि बाह्यआवरण यात साठलेल्या द्रावाने फुफ्फुसावरील आंतरआवरण आणि बाह्यआवरण यात साठलेल्या द्रावाने फुफ्फुसाच्या आकुंचन-प्रसरणाला अडथळा येतो. सर्वसामान्यांच्या परिभाषेत यालाच "छातीत साठलेले पाणी' असे म्हणतात.

Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)

मानवी शरीरात 50 हजार अब्ज पेशी असतात. प्रत्येक पेशीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा पेशीतच तयार होते. ही उत्पन्न करण्याकरता प्राणवायू आणि अन्नघटक लागतात. हे संपूर्ण शरीरभर पुरवण्याचे कार्य हृदय आणि रुधिराभिसरण संस्था करीत असतात. या संस्थांमधून रक्‍ताचा प्रवाह सतत चालू असतो. असा प्रवास टिकण्याकरता या संस्थेत जागोजागी कमी-जास्त दाब निर्माण केला जातो. या दाबाला रक्‍तदाब म्हणतात.

Sunday, February 17, 2013 AT 06:31 PM (IST)

सकस आणि संतुलित आहार हा आपल्या स्वास्थ्याचा पाया आहे. आजार झाल्यास लवकर बरे होण्याकरता आणि निरामय स्थितीत असल्यास आजार होऊ नये यास्तव योग्य आहार आवश्‍यक आहे. ही गरज प्रत्येक व्यक्तीची वेगळी असू शकते. वय, वजन, लिंग, ऋतुमान, दिनचर्या, अन्नघटकांची ऍलर्जी, शरीराचे आजार, सामाजिक रुची व धार्मिक संकल्पना अशा अनेक गोष्टींचा विचार करून आहार ठरवावा लागतो. कोणताही आहारा ठरविताना पुढील 9 गोष्टींचा विचार करून योजना आखता येते. त्या म्हणजे 1. उष्मांक, 2.

Saturday, February 02, 2013 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: