Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
9/11 च्या निमीत्ताने जवाहिरीच्या योजनेप्रमाणे खिलाफतीस पश्‍चिम आशियातील इतर देशांसहच युरोप, दक्षिण आशियासारख्या इतर "थिएटर्स'मधूनही मिळालेला प्रतिसाद ही एकंदरच जागतिक दहशतवादी चळवळीचे सामर्थ्य अधिक वृद्धिंगत करणारी बाब आहे. अमेरिकेमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यास पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत.

Monday, September 26, 2016 AT 12:00 AM (IST)

"ऍक्‍ट ईस्ट' व्हाया म्यानमार..! भारताच्या ऍक्‍ट ईस्ट धोरणाचे यश बहुतांशी म्यानमारबरोबरील संबंधांवर अवलंबून आहे. तेव्हा म्यानमारचाही नेपाळ होऊ देणे भारतीय नेतृत्वास कदापि परवडणार नाही. भारताचा अत्यंत महत्त्वपूर्ण शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये प्रशासकीय व्यवस्था म्हणून लोकशाहीची पावले अजून स्थिरावत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या देशाचे राष्ट्राध्यक्ष हतीन क्‍याव यांनी गेल्या महिन्यात भारतास भेट दिली.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

सीरि यात चीनचा प्रवेश   सीरियासह इराक व एकंदरच पश्‍चिम आशियामध्ये चिनी धोरणाची व्याप्ती वाढल्यास याआधीच या भागामध्ये असंख्य आव्हानांशी सामना करत असलेल्या अमेरिकन नेतृत्वासाठी ही नवी डोकेदुखी ठरेल. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमध्ये होणाऱ्या जी-20 परिषदेआधी व्हिएतनाम देशास भेट देणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

नव्या धोरणाच्या शोधात...   पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी इतर कोणत्या मार्गांचा अवलंब करता येईल, याचा खल मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चालला आहे. बलुचिस्तान हा या संदर्भातील पर्यायांमधील एक प्रमुख पर्याय आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करताना बलुचिस्तान व पाकव्याप्त काश्‍मीरचा उल्लेख केल्यानंतर भारतीय व पाकिस्तानी माध्यमांसहित जागतिक माध्यमांनीही या नव्या भारतीय भाषेची तत्काळ दखल घेतली.

Monday, September 05, 2016 AT 12:00 AM (IST)

अमेरिकेपुढे समर्थ पर्यायाचा अभाव इसिस, पश्‍चिम आशिया व इराण या तीनही महत्त्वपूर्ण घटकांसंदर्भात हिलरींकडून मांडले जात असलेले धोरण हा ओबामांच्याच धोरणाचा कमी-जास्त फरकाने विस्तार आहे. अर्थातच, त्याचे परिणामही ओबामांच्या धोरणासारखेच असतील! तर दुसरीकडे ट्रम्प यांच्यावर पैसे लावणे हा खरेच मोठा जुगार आहे! अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक प्रखर झाली आहे.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

अमेरिकी परराष्ट्र धोरणांचा तिढा   ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडून राबविण्यात आलेल्या परराष्ट्र धोरणामुळे जागतिक राजकारण अधिक धोकादायक झाले आहे, यामध्ये काहीही शंका नाही. याचप्रमाणे ट्रम्प वा हिलरी यांच्या भविष्यकालीन परराष्ट्र धोरणांचेही आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत दूरगामी परिणाम होतील. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमधील राजकीय प्रचाराची रणधुमाळी आता अधिकाधिक प्रखर होताना दिसत आहे.

Monday, August 15, 2016 AT 12:00 AM (IST)

अमेरिकी परराष्ट्र धोरणांचा तिढा   ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडून राबविण्यात आलेल्या परराष्ट्र धोरणामुळे जागतिक राजकारण अधिक धोकादायक झाले आहे, यामध्ये काहीही शंका नाही. याचप्रमाणे ट्रम्प वा हिलरी यांच्या भविष्यकालीन परराष्ट्र धोरणांचेही आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत दूरगामी परिणाम होतील. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमधील राजकीय प्रचाराची रणधुमाळी आता अधिकाधिक प्रखर होताना दिसत आहे.

Monday, August 15, 2016 AT 12:00 AM (IST)

नवे तुर्की वळण एर्दोगन यांचे आत्तापर्यंतचे धोरण पाहता यापुढे तुर्कस्तानच्या सैन्यामध्ये इस्लामी गटांचा प्रभावच आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. लष्करामध्ये इस्लामी गटाचा प्रभाव वाढल्यास काय होते, याचे ठाम व स्पष्ट उत्तर जगभरातील उदाहरणांमधून मिळाले आहे. जागतिक राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले संवेदनशील भौगोलिक स्थान (जिओस्ट्‍रॅटेजिक पोझिशन) लाभलेल्या मोजक्‍या देशांमध्ये तुर्कस्तानचा समावेश आहे.

Monday, August 08, 2016 AT 12:00 AM (IST)

चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षेस पायबंद? दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कांवरून सुरू झालेल्या संघर्षास चीनकडून मांडण्यात आलेल्या "नाइन डॅश लाइन' भूमिकेची पार्श्‍वभूमी आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील सुमारे 90% क्षेत्र चीनच्या या दाव्यामध्ये येते! दक्षिण चिनी समुद्रावरील चीनच्या दाव्यास कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा स्पष्ट निकाल हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकताच दिला.

Thursday, July 28, 2016 AT 12:00 AM (IST)

बांगलादेशचा प्रवास अंध:काराकडे बांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची भूमिका असली, तरी या देशाचा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्धच्या दिशेकडील प्रवास हा कितीतरी आधीच सुरू झाला आहे.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

दहशतवादाच्या सावटाखाली युरोप एकीकडे इसिसच्या हल्ल्याचे सावट आणि दुसरीकडे लक्षावधी मुस्लिम निर्वासितांच्या येण्यामुळे पायाभूत सुविधांवर येणारा ताण, यामुळे युरोपमधील राजकीय नेतृत्वावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

अफगाणिस्तानचे यक्षप्रश्‍न... अफगाणिस्तानमधील शांतता चर्चेत मुख्य अडथळा ठरल्याने तालिबानी म्होरक्‍या मुल्ला मन्सूरला ठार मारण्यात आल्याचे अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र मन्सूर याच्या मृत्यूनंतर आता अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रश्‍न पुन्हा एकदा प्रखर झाले आहेत.

Monday, June 06, 2016 AT 12:00 AM (IST)

राजकीय संधींचा "पर्शियन' दरवाजा    वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेची तेलाची गरज भागविण्यासाठी इराण हा उत्तम पर्याय आहेच मात्र "तेलपुरवठादार व गरजू आयातदार' इतक्‍यापुरतीच भारत- इराण मैत्री मर्यादित नाही. पश्‍चिम आशियासहितच मध्य आशिया व हिंदी महासागरामधील जागतिक राजकारण सध्या एका निर्णायक वळणावर आहे.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

  ब्राझीलमधील लोकशाहीपुढील आव्हान? रोसेफ यांची वैयक्तिक प्रतिमा अजून तरी स्वच्छ असली तरी आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भातील अशा स्वरूपाच्या प्रकरणांच्या हाताळणीसाठी आवश्‍यक असणारा राजकीय सावधपणा रोसेफ यांनी बाळगला नाही, असे म्हणणे भाग आहे. सुमारे वीस तास चाललेल्या वादळी चर्चेनंतर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष दिल्मा रोसेफ यांच्याविरोधात महाभियोग चालविण्यासंदर्भातील प्रस्तावाचे येथील लोकप्रतिनिधीगृहाने बहुमताने समर्थन केले.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

"आमार शोनार बांगला..'चा अस्त? बांगलादेशमधील वेगाने प्रक्षोभक होत चाललेल्या जनमतास झुगारून ब्लॉगर्सना अप्रत्यक्षरीत्या इस्लामवर टीका करण्याचे स्वातंत्र्य देणे हसीनाच काय, कुठल्याच सरकारला परवडणारे नाही. यामुळेच आजचा बांगलादेश हा एका अत्यंत धोकादायक वादळाच्या दिशेने प्रवास करत आहे. बांगलादेश या देशाचे जगामधील स्थान अत्यंत संवेदनशील आहे.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

  सौदी अरेबियाच्या "अस्तित्वाचा' प्रश्‍न सौदी अरेबियापुढील प्रश्‍न हे केवळ एका राज्यव्यवस्थेपुढील प्रश्‍न नाहीत. त्यांची व्याप्ती ही यापेक्षा कितीतरी प्रचंड आहे. सौदी अरेबियाचे प्रश्‍न हे एका मूल्यव्यवस्थेपुढील प्रश्‍न आहेत.

Monday, May 09, 2016 AT 12:00 AM (IST)

एलएसए'चे स्वागत हवे चीनच्या वाढत्या आक्रमकतेस उत्तर देण्यासाठी प्रभावी व्यूहनीती तयार करण्याचा प्रयत्न भारतीय नेतृत्वाकडून होतो आहे. एलएसएचे मूल्यांकन हे या पार्श्‍वभूमीवर करणे आवश्‍यक आहे. भारत व अमेरिकेमधील "लॉजिस्टिक्‍स एक्‍स्चेंज करारास' दोन्ही देशांनी तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर स्वाभाविकच याची चीनमध्ये प्रतिक्रिया उमटणार, अशी राजनैतिक अटकळ बांधण्यात आली होती.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

भारतभूमीवर अमेरिकन तळ भारत व अमेरिका यांच्यात झालेल्या "लॉजिस्टिक्‍स एक्‍स्चेंज' करारामुळे हिंदी महासागर व दक्षिण पूर्व आशियामधील राजकारणास नवे वळण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जागतिक नेतृत्वाची आकांक्षा असलेल्या भारताची मोठी राजकीय जबाबदारी स्वीकारण्याचीही तयारी असल्याचा स्पष्ट संदेश या करारामधून देण्यात आला आहे.

Monday, April 25, 2016 AT 12:00 AM (IST)

  म्यानमारमध्ये लोकशाही स्थिरावणे आवश्‍यक संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या म्यानमारमधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता सुमारे अर्धशतकापेक्षाही जास्त काळानंतर तीन क्‍याव यांची देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. क्‍याव हे म्यानमारमधील लष्करी राजवटीच्या प्रदीर्घ काळानंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेले देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.

Monday, April 11, 2016 AT 12:00 AM (IST)

इसिसला रोखणे अशक्‍य ?  पश्‍चिम युरोपमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण देश असलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील विमानतळ व मेट्रो स्थानकावर घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 31 नागरिक मृत्युमुखी पडले. या भीषण हल्ल्यात सुमारे 300 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला युरोपमध्ये पसरत चाललेली गेल्या काही महिन्यांमधील तणावग्रस्त परिस्थिती अधिक गंभीर करणारा तर आहेच याशिवाय दहशतवाद्यांनाही या हल्ल्यामुळे अधिक जोम मिळाला आहे.

Monday, April 04, 2016 AT 12:00 AM (IST)

भारत-सौदी संबंधांचा आलेख    जागतिक दहशतवादासंदर्भातील संवेदनशील माहितीच्या देवाणघेवाणीबरोबरच भारत व सौदी अरेबियामधील आर्थिक भागीदारी अधिकाधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनामधूनही मोदींचा आगामी सौदी अरेबिया दौरा उत्सुकतापूर्ण ठरेल.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

अफगाणिस्तान : हवी सावधानता भारताच्या पश्‍चिम आशिया व मध्य आशियाविषयक धोरणामध्ये अफगाणिस्तानमधील भारतीय प्रभाव हा घटक अत्यंत संवेदनशील ठरणार आहे. तेव्हा अफगाणिस्तानमधील परिस्थिती ही आत्तापेक्षा कितीतरी बिघडणार आहे, याची खूणगाठ बांधूनच भारतीय धोरण राबविले जाणे आवश्‍यक आहे.

Sunday, March 20, 2016 AT 12:00 AM (IST)

ओबामांच्या धोरणात अराजकतेचे प्रतिबिंब अध्यक्षीय कारकिर्दीची सुरवात करताना ओबामांनी दिलेले "नव्या सुरवाती'चे आश्‍वासन हे आज एका वेगळ्याच अर्थी प्रत्यक्षात उतरले असून, जवळजवळ संपूर्ण पश्‍चिम आशियात अस्थिरता, हिंसाचार व अराजक युगाचा एक नवा प्रारंभ झाला आहे. ओबामा व अमेरिकेची प्रतिमा कधी नव्हे इतकी डागाळली असून, शत्रूची मने जिंकण्याच्या अयशस्वी प्रयत्नामध्ये पश्‍चिम आशियातील मित्र देशांनाही अमेरिकेने दुखावले आहे.

Monday, February 29, 2016 AT 12:00 AM (IST)

लीबिया, इसिस व "अलिफ लैला'...   युरोप व आशियाला भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेला अशांत व अस्थिर लीबिया हे इसिसचा प्रभाव वाढविण्यासाठी अत्यंत योग्य स्थान ठरू शकेल. इसिसचा प्रभाव वाढत असतानाच जागतिक राजकीय परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिकट होते आहे.

Monday, February 15, 2016 AT 12:00 AM (IST)

सत्तास्पर्धेकडील पश्‍चिम आशिया पश्‍चिम आशियातील स्थिरता धोक्‍यात आणणाऱ्या विविध घटना, या जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान येथून सरकत असल्याचे निदर्शक आहेत. पश्‍चिम आशियात स्थिरता महत्त्वाची असली, तरी ती लोकशाहीच्या चौकटीत बसणारी नसेल, हे मान्य करणे आवश्‍यक आहे.

Monday, February 01, 2016 AT 12:00 AM (IST)

  रशियाशी मैत्रीचा नवा अध्याय जागतिक राजकारण दिवसेंदिवस अधिकाधिक स्फोटक होत असताना भारत व रशियामधील संबंध अत्यंत फायदेशीर ठरू शकतील. परंतु, अमेरिका व रशिया असा तोल सांभाळणे हे भारतासमोरील खरे आव्हान असेल. सीरियामधील संघर्षामुळे जागतिक राजकारण ढवळून निघत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला.

Monday, January 11, 2016 AT 12:00 AM (IST)

समस्या गंभीर करणारी उपाययोजना   सीरियात बाशर अल असद यांनी सत्तेवरून गेलेच पाहिजे, हा पाश्‍चिमात्य देशांचा धोशा सध्यापुरता मवाळ झाल्याने या परिस्थितीत संमत करण्यात आलेला ठराव हा रशियाचा तात्पुरता विजय म्हणावयास हरकत नाही. यामुळे पश्‍चिम आशियामधील रशियाचा प्रभाव अधिक बळकट होईल.

Monday, January 04, 2016 AT 12:00 AM (IST)

सीरियातील संघर्ष शमणारा नव्हे सीरियामधील इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे वाढलेले सामर्थ्य आणि पश्‍चिम आशियामधील सत्तासंघर्ष यांचा अगदी जवळचा संबंध आहे. किंबहुना या सत्तासंघर्षामध्येच इसिसच्या जन्माची बीजे आहेत. सीरियामधील सत्तासंघर्षाचा खरा फायदा दहशतवादी चळवळीलाच होण्याची शक्‍यता जास्त असून, तसे झाल्यास नाटो वा रशिया अशा कोणत्याही गटाला ते परवडणार नाही.

Monday, December 07, 2015 AT 12:00 AM (IST)

जागतिक दहशतवादाचा पुढचा टप्पा फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे काही दिवसांपूर्वी घडविण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा जगभरातील सुरक्षा दलांना गेल्या काही वर्षांपासून भेडसावणारी काळजी अधिक दृढमूल करणारा आहे. तसेच युरोपमधील अशा स्वरुपाच्या हल्ल्यासंदर्भातील हा निव्वळ एक इशारा असण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही.

Sunday, November 29, 2015 AT 12:00 AM (IST)

नवी गुंतवणूक युरोपच्या प्रवेशद्वारातून ! देशांतर्गत परिस्थिती सरकारसाठी आव्हानात्मक असताना व दहशतवाद व हवामान बदल या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ब्रिटनचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्वरितच जी -20 देशांचीही परिषद झाली.

Monday, November 23, 2015 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: