Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
पर्सनॅलिटी बदलणारा... संदीप खरे   पावसाबद्दल मला लहानपणापासूनच प्रचंड वेड आहे. खूप आठवणी आहेत. आम्ही नाना वाड्यात राहत होतो. त्या वेळी पडणाऱ्या पावसाचा पत्र्यावर एक लयबद्ध आवाज यायचा. तो नादच वेगळा वाटायचा.
पाऊस.. माझ्यासाठी सुचेता भिडे-चापेकर पाऊस रिमझिम... झरणारा पाऊस रिपरिप... ठिबकणारा पाऊस मुसळधार...बरसणारा पाऊस धारदार... झोडपणाराही! ... हा पाऊस माझ्यासाठी भावनांच्या साऱ्या छटा घेऊन येतो. जीवनातल्या साऱ्या जाणिवा भरभरून आणतो.
माझ्या वाटेवरचा पाऊस हेमा लेले एक प्रतिभासंपन्न कवयित्री पावसाकडे कशी पाहत असेल, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. "देणाऱ्याने देत जावे..' या वृत्तीने बरसणाऱ्या पावसाशी असलेला भावबंधच जणू कवयित्रीने उलगडून दाखवला आहे. आजवर अनेक वाटा चालले.
बरसे बुंदियॉं सावन की प्रभा मराठे एखाद्या संवेदनशील मनावर जेव्हा सर्जनशील पाऊसधारा पडतात, तेव्हा अंकुरते नवनवीन कल्पनांचे बीज. या बीजाचा "कला'वृक्ष होण्यासाठीही मदतीला येतो तो पाऊसच...
रानातला पाऊस किरण पुरंदरे आज पाऊस येणार आहे असं जर कुणी मला सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं. दिवसभर आभाळ स्वच्छ होतं. कुठेही लहानात- लहानसुद्धा ढग नव्हता. ऊन तापलं होतं. टिपिकल वैदर्भीय उन्हाचे चटके बसत होते.
सृष्टीचं ऋतुचक्र डॉ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर लीड : पावसाळा म्हणजे जीवसृष्टीसाठी आनंदोत्सव. सर्जनाचा, नवजीवनाचा काळ. सारी सृष्टीच पावसाचा पहिला थेंब झेलण्यासाठी सज्ज झालेली असते.
... आणि मी पाऊस होते! श्रुती आवटे मी खिडकीतून बाहेर पाहतेय... मला आजकाल ना सारखं असं वाटतं की, खिडकीशिवाय काही पर्याय नाहीये या आसमंताला न्याहळण्याकरता. कुठलीच स्पेस उरली नाहीये आसमंताला अनुभवण्यासाठी.
आला पाऊस पाऊस..   डॉ. किरण शेटे पावसात व्यायाम कसा करावा? अनेकांना व्यायामाचा प्रचंड "उत्साह' असतो. त्यात पाऊस सुरू झाला, की आयते निमित्तच मिळते. पण पावसातही व्यायाम करता येऊ शकतो. तो कसा करावा, याचे मार्गदर्शन.
पाऊस कधीचा पडतो... प्रवीण दशरथ बांदेकर  पाऊस ओतणाऱ्या ढगांचे आकार जसे प्रत्येकाला वेगवेगळे भावतात, तसंच पावसाचंही असावं किंवा पाऊसही त्या निर्गुण निराकाराचंच एक अनाकलनीय रूप ज्याला जसं जाणवलं त्यानं तसं घ्यावं...
जगण्याचा मंत्र श्रुती करमरकर पाऊस कुणासाठी शृंगार आहे तर कुणा विरहदग्धासाठी आठवणींनी ओघळणारा अश्रू आहे. कुणा अजाण, अल्लड किशोरासाठी तो आहे अवखळ, चंचल खेळगडी तर निष्ठेने धरतीची चाकरी बजावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो आहे त्याच्या निढळाच्या घामाची बिदागी.
 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: